साऱ्या अफवांना पूर्णविराम देत आयपीएल प्रशासकीय समितीने नवव्या हंगामाचा एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सऐवजी राजधानीतील फिरोझशाह कोटला स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांच्या सामन्यांसाठी विशाखापट्टणम्ची निवड केली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे सामने धरमशालाऐवजी मोहालीत होणार आहेत. पहिला क्वालिफायर सामना आणि अंतिम सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
Untitled-26