पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आंनदला अझरबैजान येथील शामकीर बुद्धिबळ स्पध्रेत दुसऱ्या डावातही बरोबरीवर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या मॅक्सिमे व्ॉचिएर-लाग्राव्हे याने  आनंदविरुद्धची लढत अनिर्णित राखली.
 आनंदला दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळ करावा लागला.  आनंदने डावाची सुरुवात अप्रतिमरीत्या केली. त्याच्या डावपेचांमधून सुटका काढताना व्ॉचिएरला कठीण गेले. आनंदने अप्रतिम कौशल्य दाखवून टप्प्याटप्याने प्याद्यांची अदलाबदल सुरूच ठेवली. व्ॉचिएरने  ४७चालींनंतर त्याने सामना बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.