एखादी भक्कम इमारत उभी करायची असल्यास तिचा पाया तितकाच भक्कम असणं गरजेचं मानलं जातं. कबड्डीच्या खेळात चढाईपटूंसोबत बचावपटूंचाही तितकाच महत्वाचा वाटा असतो. किंबहुना आता कबड्डीच्या बदललेल्या रुपात बचावपटू हा संघाचा आधारस्तंभ मानला जातो. प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या पाटणा पायरेट्सच्या संघाने यंदाच्या हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. यंदा आपल्या संघात बचावाची खास जबाबदारी पाटण्याच्या संघ व्यवस्थापनाने दोन मराठमोळ्या शिलेदारांवर सोपवली आहे. सांगलीचा सचिन शिंगाडे आणि मुंबईचा विशाल माने हे यंदा पाटण्याच्या संघाचे बचावपटू म्हणून मैदानात उतरताना दिसतील.

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वानिमित्त मुंबईच्या विशाल मानेने यावेळी खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधला.

MLA Abhimanyu Pawar request to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding contract recruitment in MPSC Pune
एमपीएससीत कंत्राटी भरती नको…; भाजपच्या कोणत्या आमदाराने केली मागणी?
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Efforts to provide clean and abundant water through existing scheme instead of costly new scheme
सांगली : खर्चिक नव्या योजनेऐवजी विद्यमान योजनेतून शुध्द व मुबलक पाणी देण्याचे प्रयत्न
rpi leader ramdas athawale slams maha vikas aghadi
“मी असताना राज ठाकरेंची गरज काय?” मनसेला महायुतीत घेण्यावरून रामदास आठवलेंचा सवाल
विशाल आणि सचिन शिंगाडेवर पाटण्याच्या बचावाची जबाबदारी
विशाल आणि सचिन शिंगाडेवर पाटण्याच्या बचावाची जबाबदारी

लागोपाठ दोन विजेतेपदं पटकावलेल्या संघाने यंदा बचावासाठी माझी निवड केली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असल्याचं विशाल माने म्हणाला. सध्या पाटण्याचा संघ नोएडा येथे सराव करतोय. प्रो-कबड्डीची पहिली ३ पर्व विशाल माने यू मुम्बासोबत होता तर चौथे पर्व बंगाल वॉरियर्स संघाचा भाग होता. यू मुम्बाच्या संघात असताना उजवा कोपरा सांभाळणारा सुरिंदर नाडा, डावा कोपरा सांभाळणारा मोहित चिल्लर आणि मधल्या जागेवर जीवा कुमारसोबत मराठमोळा विशाल माने हे आतापर्यंत बचावपटूंच सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन होतं. अनेक मोठमोठ्या संघांच्या चढाईपटूंना या चौकडीने सहज बाद केलं होतं.

मात्र, चौथ्या पर्वात ही चौकडी तुटली आणि विशाल माने बंगालच्या संघाचा भाग झाला. पण संघ बदलले असले तरीही आम्ही सर्व खेळाडू आजही एकमेकांच्या संपर्कात असल्याचं विशाल मानेने सांगितलं. आजही अनेक वेळा अनुप कुमार आपल्याला खेळात सुधारणा करण्याच्या टिप्स देतो. मध्यंतरीच्या काळात माझी कामगिरी खालावली होती, त्यावेळी अनुप कुमारने स्वतः माझ्यापाशी येऊन, ”देख माने, जो मॅच खतम हो गई उसे भुल जा! आगे की सोच”. असा सल्ला दिला होता. एखादे आई-वडील आपल्या मुलाला जसं हात धरुन चालायला शिकवतात, तसं अनुप कुमार एक कर्णधार म्हणून तुमच्याकडून चांगला खेळ करवून घेतो. त्याचमुळे आजही अनुपचा सल्ला आपला खेळ सुधारायला उपयोगी पडत असल्याचं विशालने मोठ्या मनाने मान्य केलं आहे.

यंदाच्या पर्वात विशाल मानेवर जबाबदारी मोठी असणार आहे. बचावात त्याची साथ देण्यासाठी महाराष्ट्राच्या सांगलीचाच सचिन शिंगाडे त्याच्यासोबत आहे. ”महाराष्ट्राच्या संघात असतानाही मी आणि सचिन एकत्र डिफेन्स करायचो. त्यामुळे आमच्यातला ताळमेळ हा उत्तम आहे. त्यातच आम्ही दोघही आपापले आधीचे संघ सोडून पाटणा संघात नव्याने आल्यामुळे यंदा आमच्यावर जबाबदारी असणार आहे. पाटणा संघाने याआधीच्या दोन्ही पर्वांमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यंदाही त्याच तोडीचा खेळ करुन पाटणा पायरेट्सला विजय मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचं”, विशाल मानेने सांगितलंय.

उत्कृष्ट बचावपटू असलेला विशाल आजही चढाईत कच्चा आहे. अनेक वेळा संघातले चढाईपटू बाद झाले की विशाल माने फार प्रतिकार न करता आपली विकेट फेकतो, हे मैदानात दिसून आलं आहे. आपल्या या कच्च्या दुव्याची विशालला पुरेपूर जाणीव आहे. ”होय, रेडींग डिपार्टमेंटमध्ये मी थोडा अजुनही कच्चा आहे यात वाद नाही. मोक्याच्या वेळी संघाला गुण मिळवण्याची गरज असते तेव्हा ते माझ्याकडून मिळवले जात नाही. मात्र यंदाच्या हंगामापासून आपण रेडींगचाही खास सराव करत असल्याचं”, विशाल मानेने सांगितलं आहे.

आतापर्यंत प्रो-कबड्डीत कोणत्या बचावपटूचा खेळ आवडला असं विचारलं असताना विशालने त्वरित मनजीत चिल्लरचं नाव घेतलं. सुरुवातीचे काही पर्व बंगळुरु संघाचा भाग असलेल्या मनजीतने नंतर पुणेरी पलटण संघाचं नेतृत्त्व केलं. मनजीतच्या नेतृत्त्वात पुण्याच्या संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच उल्लेखनीय होती. मनजीतचा खेळ हा एखाद्या आदर्श बचावपटूसारखा असल्याचं विशाल मानेचं म्हणणं आहे. थाय होल्ड, डॅश, अँकल होल्ड यासारखे एकाहून एक फंडे मनजीतच्या भात्यात आहेत. कोणताही आडपडदा न ठेवता मनजीतने आपल्याला खेळ सुधारण्यासाठी काही टिप्स दिल्याचं विशालने सांगितलं. आपला बचाव भक्कम करण्यासाठी मनजीतने विशालला काही खास कुस्तीचे डावपेच शिकवले असून त्यावर काम करण्याचाही सल्ला दिला आहे.

यंदाच्या हंगामात चार नवीन संघांचा प्रो-कबड्डीत समावेश झाल्यामुळे हा हंगाम अधिक रंगणार यात काही शंका नाही. त्यात पटणा पायरेट्सने गेल्या दोन पर्वात चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्यामुळे नवीन साथीदारांच्या जोडीने मुंबईचा मराठमोळा विशाल माने पटणा संघाला विजेतेपदाची हॅटट्रीक करवुन देतो का हे पाहावं लागणार आहे.