इंग्लंड विरुद्ध भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला केवळ एक दिवस बाकी राहिला आहे. वानखेडे मैदानावर ८ डिसेंबरला कसोटी सामना रंगणार आहे.

वानखेडेचे पीच फिरकी गोलंदाजाला साथ देणार म्हटल्यानंतर भारतीय चमूत उत्साहाचे वातावरण होते परंतु पीच क्युरेटर यांनी सांगितले की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा तिसऱ्या दिवशी सकाळपासून बॉल टर्न घेईल.

असे म्हटल्यानंतर पीच क्युरेटर्स आणि त्यांच्या पूर्ण टीमवर भारतीय संघाचे व्यवस्थापक रवी शास्त्री हे त्यांच्यावर कडाडले आहेत. मागील वर्षी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केवळ पीच योग्य नसल्यामुळे हार पत्करावी लागल्यानंतर रवी शास्त्री यांनी पीच क्युरेटर्सला फैलावर घेतले होते.

वानखेडेची विकेट अगदी योग्य आहे. पहिल्या दिवशी बॉल टर्न होणार नाही. परंतु हळुहळु फिरकी गोलंदाजांना साथ मिळेल असे सूत्रांनी सांगितले. तिसऱ्या दिवशीपासून फिरकी गोलंदाजांचेच वर्चस्व असेल असेही ते पुढे म्हणाले. रवी शास्त्रींनी पीच क्युरेटर्सला बोलल्यानंतर पुन्हा वानखेडेच्या पीचकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.