30 May 2016

वासिम जाफरला पितृशोक

मुंबईचा सर्वात अनुभवी फलंदाज वासिम जाफर याचे वडील अब्दुल कादर जाफर यांचे दीर्घ आजाराने

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | February 1, 2013 5:20 AM

मुंबईचा सर्वात अनुभवी फलंदाज वासिम जाफर याचे वडील अब्दुल कादर जाफर यांचे दीर्घ आजाराने वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अब्दुल जाफर यांनी ‘बेस्ट’मध्ये बसचालक म्हणून नोकरी केली होती. तीन दिवसांपूर्वी मुंबईला रणजी करंडक जिंकून देण्यात जाफरने मोलाची कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या जाफरने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. वानखेडे स्टेडियमवर ६ फेब्रुवारीपासून होणाऱ्या इराणी करंडक स्पर्धेतील शेष भारत संघाविरुद्धच्या सामन्यासाठी जाफरची मुंबी संघात निवड झाली आहे.

First Published on February 1, 2013 5:20 am

Web Title: waseem zafar father passed away
टॅग Waseem-zafar