भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विशेष फॉर्ममध्ये नसला तरी काल न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातील एका प्रकारामुळे धोनी सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आला आहे. या सामन्यात धोनीने यष्टीरक्षणाच्या अद्भूत कौशल्याने सर्वांनाच चकित करून सोडले. एरवीही धोनीची फलंदाजी आणि संघ नेतृत्त्वाच्या अनोख्या शैलीचे कौतूक करण्याच्या नादात त्याच्याकडे असणाऱ्या यष्टिरक्षणाच्या कौशल्याकडे साफ दुर्लक्ष झाले, असा आक्षेप अनेक क्रिकेट समीक्षकांकडून घेण्यात येतो. भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने यष्टीरक्षणाच्या अनेक नव्या क्लृप्त्या शोधून काढल्या. काही महिन्यांपूर्वीच क्रिकेट विश्वचषकात धोनीच्या चपळ यष्टीरक्षणामुळेच भारताने बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला होता. काल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही धोनीच्या या कौशल्याचा प्रत्यय आला. या सामन्यातील ४६व्या षटकात रॉस टेलरने फाइन लेगला फटका मारुन दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण धवल कुलकर्णीने तेवढ्याच तत्परतेने धोनीकडे चेंडू फेकला. त्यानंतर धोनीने ज्याप्रकारे चेंडू स्टम्पवर अचूकपणे फेकला, ते पाहणे म्हणजे नक्कीच एक दुर्मिळ योग होता. धवल कुलकर्णीने फेकलेला चेंडू धोनीच्या हातात आला तेव्हा त्याची स्टम्पकडे पाठ होती. मात्र, धोनीने पाठमोरा उभा राहूनच हातात आलेला चेंडू स्टम्पवर फेकला. विशेष म्हणजे चेंडूही अचूकपणे स्टम्पवर जाऊन आदळला. त्यावेळी टेलर क्रिझमध्ये पोहचलाच नव्हता. धोनीने वळून चेंडू स्टम्पवर फेकायला वेळ घेतला असता तर टेलर नक्कीच क्रिझमध्ये पोहचला असता. त्यामुळे केवळ धोनीच्या चलाखीनेच टेलरला थेट तंबूत परत जावे लागले. धोनीच्या या करामतीने मैदानावरील खेळाडू आणि मैदानाबाहेरील प्रेक्षक दोघेहीजण अवाक झाले होते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धोनीच्या रांचीत भारतीय संघाचा पराभव, किवींनी मालिकेत साधली २-२ अशी बरोबरी

मात्र, या सामन्यात भारतीय संघाला १९ धावांनी पराभव स्विकारावा लागला. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक ५७ धावांची खेळी साकारली, तर विराट कोहलीने ४५ धावा केल्या. किवींकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट आणि नीशाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडने या विजयासाठी पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचवा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.


IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श