ऑगस्ट महिन्यात लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाच्या पदरी अपयश पडले. लंडनमध्ये एकही विजय भारताला साकारता आला नव्हता. पण त्यानंतर चॅम्पियन्स करंडक आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत भारताने आशादायी कामगिरीचे प्रदर्शन केले. लंडन ऑलिम्पिकच्या अपयशातून आता आम्ही सावरलो आहोत, असे मत सरदारा सिंगने प्रकट केले. ‘‘अपयश आम्ही मागे टाकले आहे आणि आता पुढे वाटचाल करीत आहोत. लंडन ऑलिम्पिकनंतर जागतिक हॉकीमधील काही महत्त्वाच्या स्पर्धामध्ये आम्ही चांगली कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक विसरा आणि चांगली कामगिरी करा, असे सांगत एक कर्णधार म्हणून संघाचा आत्मविश्वास वाढवतो,’’ असे तो पुढे म्हणाला.