इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सेहवागची सुमार कामगिरी झाली होती, पण त्याच्यापेक्षाही वाईट कामगिरी करणाऱ्या गौतम गंभीरला निवड समितीने वगळले. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही सेहवागला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावर धोनीला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘सेहवाग हा एकहाती सामना जिंकवून देणारा सलामीवीर आहे, माझ्या मते त्याला अजून वेळ द्यायला हवा.’’
माझ्या मते सेहवागला थोडा अजून वेळ द्यायला हवा. मी यापूर्वी ही बोललो आहे की, सेहवाग जेव्हा लयीत असतो तेव्हा त्याच्या फलंदाजीवर, फटक्यांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करण्यात येतो. पण जेव्हा त्याच्याकडून चांगली फलंदाजी होत नाही तेव्हा त्याच्या फलंदाजीवर आणि फटक्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, असे धोनी म्हणाला.