वेस्ट हॅमने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलला पराभवाचा धक्का दिला. १९६३नंतर लिव्हरपूलच्या अ‍ॅनफिल्ड मैदानावर जिंकण्याचा पराक्रम वेस्ट हॅमने नावावर केला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन खेळाडूंना लाल कार्ड दाखवण्यात आलेल्या या सामन्यात लिव्हरपूलला हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
आतापर्यंत झालेल्या तीन लढतीत लिव्हरपूलने अभेद्य बचावाचे दर्शन घडवताना प्रतिस्पर्धी संघाना गोल करण्यापासून रोखले. मात्र वेस्ट हॅमने सुरुवातीपासून आक्रमणावर भर देत वर्चस्व गाजवले. अर्जेटिनाच्या मॅन्युएल लॅन्झिनीने प्रीमिअर लीग स्पर्धेतील पदार्पणाच्या लढतीत तिसऱ्याच मिनिटाला गोल केला. २९व्या मिनिटाला लॅन्झिनीने दिलेल्या पासवर मार्क नोबेलने सुरेख गोल केला. दुखापत वेळेत दिआफ्रा साखोने गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत अर्सेनेलने न्यूकॅस्टल युनायटेड संघावर १-० असा संघर्षमय विजय मिळवला. अर्सेनेलच्या फॅबरिको कलोसिनीने केलेल्या स्वयंगोलच्या बळावर न्यूकॅस्टलने विजय साकारला.