फलंदाजाला सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे एखाद्या गोलंदाजाने अचूक रिव्हर्स स्विंग टाकण्याची. इम्रान खान, वकार युनूस ते अलीकडच्या काळातील जहीर खान असे काही मोजकेच गोलंदाज या जगाच्या पाठीवर आहेत की ज्यांना रिव्हर्स स्विंग चेंडू टाकण्याचे गमक माहित होते. याचे कारण म्हणजे या बॉलची क्लिष्टता इतकेच नव्हे तर तुमच्या शैली सोबतच खेळपट्टी, हवा, चेंडूची चमक इत्यादी गोष्टींचीही साथ तुम्हाला मिळायला हवी. त्यामुळेच रिव्हर्स स्विंग हा सर्वार्थाने एक विलक्षण बॉल ठरतो.

स्विंग बॉल म्हणजे जलद बॉल आपल्या चेंडूची दिशा अचानकपणे बदलतो. आउट स्विंग आणि इनस्विंग हे त्याचे प्रकार आहेत. आउटस्विंग म्हणजे बॉल फलंदाजाच्या समोर पडतो आणि तो विकेटच्या बाहेर जातो. तर इनस्विंग म्हणजे बॉल विकेटच्या बाहेर पडतो आणि तो विकेटच्या आत घुसू पाहतो. बॉलवर असणाऱ्या शिलाईवरुन फलंदाजाला हा अंदाज मिळतो की हा इनस्विंग आहे की आउट स्विंग.
रिव्हर्स स्विंग म्हणजे एखादा आउट स्विंग वाटणारा बॉल त्याची नैसर्गिक दिशा बदलून इनस्विंग होतो किंवा इनस्विंग वाटणारा बॉल त्याची नैसर्गिक दिशा बदलून आउटस्विंग होतो, यालाच रिव्हर्स स्विंग म्हणतात.

arbaaz khan sohail khan on relationships
“एका ठराविक काळानंतर…”, अरबाज खानचं नात्यांबद्दल स्पष्ट मत; सोहेल खान म्हणाला, “एखाद्याचा इगो दुखावणं…”
Taapsee Pannu broke silence on secret wedding with Mathias Boe
बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “माझा जोडीदार…”
aai kuthe kay karte fame milind gawali
“संध्याकाळची मालिका दुपारी पाहिली जाईल का?”, ‘आई कुठे काय करते’च्या नव्या वेळेबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले…
sukh mhanje nakki kay asta fame actor sanjay patil welcome baby girl
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झाला बाबा; होळीच्या सणाला दिली गुडन्यूज; म्हणाला, “आमच्या आयुष्यात…”

बॉलची शिलाई पाहून फलंदाजाने अंदाज घेतलेला असतो आणि तो खेळणार असतो. जर तो इनस्विंग पडणार आहे असा अंदाज घेऊन तो उभा असतो आणि त्या बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज असतो. परंतु तो बॉल इनस्विंग नसून रिव्हर्स स्विंग असेल तर तो विकेटच्या बाहेर जाईल आणि बॅटचा स्पर्श होऊन स्लीपमध्ये किंवा यष्टीरक्षकाकरवी तो झेलबाद होईल. त्याचप्रमाणे जेव्हा फलंदाज बॉल आउटस्विंग असल्याचा अंदाज घेतो तेव्हा फलंदाज विकेटच्या समोर येऊन तो बॉल खेळण्यासाठी थोडा बाहेर येतो. जर हा बॉल रिव्हर्स स्विंग ठरला तर तो सरळ विकेटमध्ये घुसू पाहतो म्हणजे फलंदाज एकतर पायचीत होतो किंवा तो क्लीनबोल्ड. असा हा घातक रिव्हर्स स्विंग फलंदाजांना धडकी भरविण्याचे काम करतो. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये वसीम अक्रमचे रिव्हर्स स्विंग हे विश्वचषकाला कलाटणी देणारे ठरले होते.

* रिव्हर्स स्विंग कसा टाकतात?

रिव्हर्स स्विंग टाकणे ही एक कला आहे. त्याबरोबरच सातत्य आणि सराव या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉल जुना असला पाहिजे. म्हणजे साधारणतः ४० षटके जुना बॉल असेल तर रिव्हर्स स्विंग हा योग्य पडतो. ४० षटकानंतर बॉल जुना होऊन त्याची एक बाजू ओबडधोबड होते तर दुसरी बाजू ही चकचकीत असते. रिव्हर्स स्विंग टाकायच्या वेळी बॉलची शिलाई जितकी सरळ ठेवून तो जास्तीत जास्त बॉलरच्या पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न करावा. त्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ज्या दिशेला चकाकी असेल त्या दिशेला बॉल स्विंग होतो. नॉर्मल स्विंगमध्ये याच्या अगदी उलट होते. गोलंदाजाने एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे बॉलला सुरुवातीपासूनच नीट ठेवणे. जी चकाकी असणारी बाजू आहे तिला सतत आपला हात लागता कामा नये अन्यथा घाम लागून ती बाजू देखील जीर्ण होईल आणि स्विंग होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिलाई सरळ ठेवून बॉल सरळ रेषेत टाकायचा असेल तर तुमचे मनगट वळता कामा नये, जर बॉल टाकण्याच्या नादात मनगट वळाले तर रिव्हर्स स्विंग होणार नाही.

* रिव्हर्स स्विंग कसा खेळतात?

रिव्हर्स स्विंग खेळण्यासाठी फलंदाजाला जवळ चांगली दृष्टी असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा गोलंदाज अॅक्शन घेतो तेव्हाच बॉलच्या शिलाईची दिशा कोणती आहे? त्याच्या अॅक्शनवरुन त्याची गती किती असेल हे ठरवणे आणि बॉलची चमकदार बाजू कुठल्या दिशेला असेल हे ओळखणे. बॉलची चकाकणारी बाजू कुठल्या दिशेला आहे हे ओळखून खेळणारे फलंदाजच यामध्ये यशस्वी झाले आहेत. वकार युनूस असा गोलंदाज होता की त्याची अॅक्शन सर्व बॉलसाठी सारखीच होती. अॅडम गिलख्रिस्ट, अरविंद डिसिल्वा, ब्रायन लारा आणि मार्टिन क्रो यांची नजर एकदम अचूक होती. त्यांना गोलंदाजी करणे हे आपल्यासाठी नेहमी आव्हानात्मक होते, असे वकार युनूस यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिले आहे.

* कुणी लावला रिव्हर्स स्विंगचा शोध?

रिव्हर्स स्विंगचा शोध इम्रान खान किंवा सरफराज खान यांनी लावल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु सलीम मीर यांनी या बॉलचा शोध लावला आहे. त्यानंतर त्यांनी हा स्विंग सरफराज खान यांना शिकवला. सरफराज यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या चेंडूचा वापर केला. त्यानंतर इम्रान खान, वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी हा चेंडू केला.

* रिव्हर्स स्विंगचे विज्ञान?

हवेचा दबाव आणि दिशा वापरुन बॉलची दिशा ठरवणे हेच स्विंगचे सार आहे. बॉलची शिलाई स्थिर ठेवणे, बॉलला चकाकी देणे, बॉलची गती आणि बॉलरची अॅक्शन याचा मेळ बसला की स्विंग उत्तम होतो.