पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. याशिवाय त्यांनी आपल्या भाषणात महान हॉकीपटू ध्यानचंद यांचीही आठवण करून दिली. २९ ऑगस्ट १९०५ हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱया या महान हॉकीपटूचा जन्म दिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद कोण?
ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ साली राजपुत घराण्यात झाला. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली.

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यान सिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती.

जर्मनीचा हुकमशहा हिलटरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता.
हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.