सांघिक उपविजेतेपदासह भारताची एकंदर १५ पदकांची कमाई

मंगोलियातील उलनबाटोर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि शरीरसंपदा स्पध्रेत भारतीय संघाने ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकंदर १५ पदकांची कमाई करताना सांघिक उपविजेतेपद पटकावले. भारताच्या यशात महाराष्ट्र, भारतीय रेल्वे आणि मणिपूरच्या शरीरसौष्ठवपटूंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
IPL 2024 The List of Mumbai and Maharashtra Players which team has the most
IPL 2024: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई-महाराष्ट्राचा टक्का सर्वाधिक, पाहा कोणत्या संघात आहेत सर्वाधिक खेळाडू

महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना जागतिक स्पध्रेत पदके मिळवता आली. महेंद्र चव्हाणने ९० ते १०० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. रोहन धुरीने ८५ किलोखालील वजनी गटात रौप्य पदक कमावले, तर रोहित शेट्टीने ९० किलोखालील वजनी गटात कांस्य पदक मिळवले.

भारतीय रेल्वेच्या देवेंदर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या भारतीय चमूतील दिनेश सिंग, रिशिकांत सिंग, अरमबम बॉबी (सर्व मणिपूर), वेंकटेशन जयप्रकाश (भारतीय रेल्वे), महेंद्र चव्हाण (महाराष्ट्र) यांनी सुवर्णपदकांना गवसणी घातली. सरितादेवी (मणिपूर), मित्तल सिंग (दिल्ली), रोहन धुरी (महाराष्ट्र) विनय कुमार पांडे (भारतीय रेल्वे) यांनी रौप्य पदके पटकावली आहेत. याचप्रमाणे ममता देवी युमनाम (दिल्ली), गोपू श्रीनिवास (आंध्र प्रदेश), एन. सबरे सिंग, राम निवास (भारतीय रेल्वे), रोहित शेट्टी (महाराष्ट्र), हिबजूर रेहमान (दिल्ली) या खेळाडूंनी कांस्य पदके मिळवली.