मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर झालेल्या नव्या हंगामातील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रां़  प्रि़  स्पध्रेत लुईस हॅमिल्टनने वर्चस्व गाजवल़े  
अपेक्षेप्रमाणे मर्सिडीजचा त्याचा संघ सहकारी निको रोसबर्गकडून त्याला कडवी झुंज मिळाली़  हॅमिल्टनने अवघ्या १.३६ सेकंदांच्या फरकाने रोसबर्गला हरवून २००८नंतर येथे पहिल्यांदा जेतेपद पटकावले आणि विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीने  सुरुवात केली़   हॅमिल्टनने एक तास ३१ मिनिटे व ५४.०६७ सेकंदांची वेळ नोंदवली़  रोसबर्ग (१: ३१: ५५.४२७ ) आणि वेटल (१:३२:२८.५९०) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिल़े

पुन्हा जेतेपद पटकावण्याचा आनंद अविश्वसनीय आह़े  नेहमीप्रमाणे निकोने कडवी झुंज दिली़ सेबॅस्टियननेही त्याचा खेळ उंचावला़
– लुईस हॅमिल्टन

८ मर्सिडीज संघाचा हा सलग आठवा विजय आह़े गत वर्षी ऑगस्टमध्ये बेल्जियम येथे रेड बुलच्या डॅनिएल रिकीआडरेने त्यांना पराभूत केले होत़े  
७ लुईस हॅमिल्टनने गेल्या आठ शर्यतींपैकी सातमध्ये बाजी मारली आह़े  त्याने १४९ ग्रां़  प्रि़  स्पर्धापैकी ३४ जिंकल्या आहेत़