जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याची नॉर्वेमध्ये रविवारी उत्तेजक औषध सेवन चाचणी होणार आहे. मलेशियाचा हा खेळाडू उत्तेजक सेवनाच्या पहिल्या चाचणीत दोषी आढळला असल्यामुळे त्याची पुन्हा चाचणी होणार आहे.
मलेशियाच्या क्रीडाधिकाऱ्यांनी वेई हा दोषी आढळल्यासंबंधीचे कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र त्यांचा एक बॅडिमटनपटू दोषी आढळल्याचे मान्य केले आहे. मलेशियन प्रसारमाध्यमांनी वेई हा दोषी असल्याचे वृत्त यापूर्वीच दिले आहे.