ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताला किवींनी धक्का दिला. न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघावर ४५ धावांनी मात केली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १२७ धावांचे समाधानकारक लक्ष्य ठेवले होते. मात्र, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताचा डाव ७९ धावांत गुंडाळला आणि यजमानांना मोठा धक्का दिला.
सामन्याचा नाणेफेक न्यूझीलंडने जिंकून कर्णधार केन विल्यमसनने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच अचूक टप्प्यात गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्यामुळे न्यूझीलंडला २० षटकांच्या अखेरीस केवळ १२६ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, न्यूझीलंडचे हे आव्हान गाठतानाही भारताच्या नाकी नऊ आले. केवळ पन्नास धावांच्या आत भारताचे सात खेळाडू तंबूत दाखल झाले होते. धोनीने अखेरपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यास यश आले नाही. याविजयासह न्यूझीलंडने भारताविरुद्धचा ट्वेन्टी-२० सामन्यांचा विजयी रथ कायम राखला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये चार ट्वेन्टी-२० सामने झाले होते. चारही सामन्यात न्यूझीलंडने विजय प्राप्त केला होता. आजही न्यूझीलंडने इतिहास कायम राखत भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्याचा पाचवा विजय साजरा केला.

(Full Coverage|| Fixtures||Photos)

Live Cricket Updates: India vs New Zealand, World T20 :

# आशिष नेहरा क्लिन बोल्ड, न्यूझीलंडची भारतावर ४७ धावांनी मात.

# भारताची विजयाची आशा मावळली, कर्णधार धोनी बाद. भारत ९ बाद ७९.

# भारताला आठवा धक्का, अश्विन बाद.

# सतराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीचा खणखणीत षटकार. भारत ७ बाद ७३.

# शेवटच्या चार षटकांत भारताला ६१ धावांची गरज.

# महेंद्रसिंग धोनीची एकहाती लढत, पण दुसऱयाबाजून साध मिळण्याची गरज.

# भारताला विजयासाठी ४५ चेंडूत ७५ धावांची गरज.

# टीम इंडियाची सातवी विकेट, रवींद्र जडेजा शून्यावर बाद; भारत ७ बाद ५०.

# कोहलीपाठोपाठ हार्दिक पंड्या देखील माघारी, भारत ६ बाद ४२.

# भारताचा डाव कोसळला, विराट कोहली यष्टीरक्षक करवी झेलबाद. भारत ५ बाद ३९.

# पावर प्लेच्या सहा षटकांमध्ये भारताच्या केवळ २९ धावा.

# धोनी आणि कोहलीवर संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी.

# पाच षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद २६.

# चौकार लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर युवराज झेलबाद, भारताला चौथा धक्का.

# युवराज सिंगकडून चौकार, भारत ३ बाद २६

# भारताला चांगल्या भागीदारीची गरज, कोहली आणि युवराज मैदानात.

# चौथ्या षटकात ९ धावा, भारत ३ बाद २१

# कोहलीकडून दोन दमदार चौकार, भारत ३ बाद २०

# भारताची बिकट अवस्था, रैना स्वस्तात बाद; भारत ३ बाद १२

# भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा धावचित बाद. भारत २ बाद १०

# विराट कोहली मैदानात दाखल, पहिल्या चेंडूवर एक धाव.

# भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद. नॅथन मॅक्क्युलमच्या गोलंदाजीवर पायचित.

# रोहित शर्माने संघाचे खाते उघडले, पहिल्या चेंडूवर एक धाव.

# सामन्याच्या दुसऱया डावाला सुरूवात.

# भारताचे सलामीवर रोहित आणि धवन मैदानात दाखल.

# India keep New Zealand to 126/7 in Nagpur. (Anderson 34; Bumrah 1/15, Raina 1/16, )

# शेवटच्या षटकात १५ धावा, न्यूझीलंडचे भारतासमोर १२७ धावांचे आव्हान.

# शेवटच्या षटकात नेहराच्या गोलदांजीवर न्यूझीलंडच्या फलंदाजांची फटकेबाजी.

# न्यूझीलंडचा सातवा गडी बाद, नेहराने न्यूझीलंडच्या रोंचीला केले धावचित बाद.

# १९ व्या षटाकात ८ धावा, न्यूझीलंड ६ बाद ११३ धावा.

# गेल्या ९ षटकांत न्यूझीलंडकडून केवळ दोन चौकार.

# भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं आहे. शेवटच्या दोन षटकांचा खेळ शिल्लक, न्यूझीलंड ६ बाद १०२

# भारताला सहावे यश, मिचल सँटेर झेलबाद; जडेजाला मिळाली विकेट. न्यूझीलंड ६ बाद ९८

# बुमराहच्या गोलंदाजीवर अँडरसन क्लिन बोल्ड; न्यूझीलंड ५ बाद ८९

# रैनाच्या तिसऱया आणि सामन्याच्या १४ व्या षटाकात केवळ ३ धावा. न्यूझीलंड ४ बाद ७८.

# १३ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद ७५.

# भारताला चौथे यश, रैनाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण; रॉस टेलर धावचित बाद.

# अश्विनची चार षटके संपली, सामन्याच्या ११ व्या षटकात केवळ चार धावा, न्यूझीलंड ३ बाद ५९

# दहाव्या षटकात न्यूझीलंडच्या धावसंख्येचे अर्धशतक (अँडरसन- २६*, रॉस टेलर- ७*)

# ९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ४९. (अँडरसन- २५*, रॉस टेलर- २*)

# न्यूझीलंडला तिसरा धक्का, सुरेश रैनाने काढली विकेट. केन विल्यमसन बाद; न्यूझीलंड ३ बाद ३५.

# फलंदाजी पाव्हर प्लेच्या पहिल्या सहा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद ३३ धावा.

# भारताला दुसरे यश, कॉलीन मुन्रो माघारी; न्यूझीलंड २ बाद १३

# पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्तिलचा आर.अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार आणि दुसऱयाच चेंडूवर विकेट.

# न्यूझीलंडचा संघ-
NZ XI- MJ Guptill, KS Williamson*, C Munro, LRPL Taylor, CJ Anderson, GD Elliott, MJ Santner, L Ronchi†, NL McCullum, AF Milne, IS Sodhi

# भारताचा संघ-
IND XI – RG Sharma, S Dhawan, V Kohli, MS Dhoni*†, SK Raina, Yuvraj Singh, HH Pandya, RA Jadeja, R Ashwin, JJ Bumrah, A Nehra

# न्यूझीलंडच्या संघात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीचा समावेश नाही.

# न्यूझीलंडने नाणेफेक जिंकला, फलंदाजीचा निर्णय.

# जामठा स्टेडियमवर प्रेक्षकांच्या प्रवेशास सुरूवात, रॉस टेलरची मुलाखत.

# भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी जामठा स्टेडियमच्या दिशेने रवाना.

# भारताच्या महिला संघाचा बांगलादेशवर ७२ धावांनी विजय.

# बांगलादेशच्या महिला संघाच्या पाच विकेट्स, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल.

# भारत वि. न्यूझीलंड सामन्याआधी नागपूरच्या जामठा स्टेडियमबाहेर क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला.

# बांगलादेशची तिसरी विकेट, रुमाना अहमद बाद; बांगलादेश ४ बाद ४४

# भारताच्या महिला संघाला तिसरे यश, बांगलादेश ३ बाद ३७ धावा.

# नागपूरच्या स्टेडियमबाहेर क्रिकेट रसिकांमध्ये भारत वि. न्यूझीलंड सामन्याची उत्सुकता.

# अंबाती रायुडूने दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा.

# बांगलादेशच्या महिला संघाच्या दोन खेळाडू स्वस्तात तंबूत, बांगलादेश २ बाद २९

# महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताचे बांगलादेशसमोर १६४ धावांचे आव्हान. भारताकडून मिताली राजच्या ४२, तर हरमप्रित कौरकडून ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान.


# जामठात भारताला जिंकू देणार नाही- केन विल्यमसन

NZ players in Mumbai

# फोटो गॅलरी: भारत- न्यूझीलंडचा ‘नेटाने’ सराव…

india-nz-pti

# सामन्यासाठी नागपूरात अनुकूल वातावरण.

# मंगळवारी भारतीय संघाने नागपूरच्या स्टेडियमवर सराव केला

विजयाची मालिका कायम ठेवू -कोहली

Nagpur: India's Virat Kohli speaks at a press conference after a practise session at VCA stadium in Nagpur on Monday. PTI Photo (PTI3_14_2016_000204B)