४४-वर्धापनदिन विशेष अंक

आविष्कार देशमुख, अविनाश पाटील, तानाजी काळे, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, सचिन कांकरिया, सतीश कामत, संतोष विणके

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

मुलींनी खेळायचे ते टिपरीपाणीसारखे नाजूक खेळ आणि मुलांनी खेळायचे ते अंगातली रग जिरवणारे खेळ ही पारंपरिक समजूत मुलींनी केव्हाच धुडकावून लावली आहे. अलीकडच्या आलेल्या ‘दंगल’ सिनेमाने ते अधोरेखित केलं इतकंच. म्हणूनच ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या खेळांमधल्या ‘गीता-बबिता फोगट’चा शोध घेतला. त्यातून दिसलेलं चित्र निश्चितच आशादायी आहे. मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात पाय रोवून उभं राहण्याची इच्छा आहे, पालकांचं सहकार्यही आहे. आता गरज आहे ती क्रीडा संस्कृती विकसित होण्याची.

05-women-sportperson

मुरगुड. राजकीय पटलावर धोबीपछाड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यातील २० हजार लोकसंख्येचे हे गाव. क वर्गाची छोटेखानी नगरपालिका. पण हे गाव आता तेथील राजकीय दिग्गजांच्या लक्षणीय कामगिरीपेक्षा अधिक लक्षवेधी ठरले आहे ते कुस्तीमुळे. विशेषत महिला कुस्तीमुळे. नंदिनी साळुंखे आणि स्वाती शिंदे या दोन उगवत्या महिला कुस्तीगिरांच्या कामगिरीमुळे मुरगुडची क्रीडापताका देशभर उंचावत चालली आहे. सामान्य कुटुंबांतील या दोघींची कुस्तीच्या आखाडय़ातील उंचावती कामगिरी पाहता आगामी काळात आशियाई, राष्ट्रकुल, ऑलिम्पिक, जागतिक अशा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धातील पदक निश्चितपणे त्यांच्या गळ्यात पडेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

मुरगुडमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. २०११ पासून येथे मुलीही कुस्तीच्या सरावासाठी उतरल्या. सुरुवातील ज्या तिघी-चौघी या पुरुषी म्हणविल्या जाणाऱ्या खेळात उतरल्या, तेव्हा त्यामध्ये नंदिनी व स्वाती या दोघींचा समावेश होता. तेव्हापासून ते आजतायागत या दोन्ही एकमेकींच्या सोबतीने देशभरातील कुस्तीची मदाने गाजवत आहेत.

व्हॉलीबॉल खेळात लौकिक मिळविलेल्या वडिलांची कन्या नंदिनी. ती तिसरीत असतानाच तिचे वडील बाजीराव साळुंखे यांचे निधन झाले. घरचा कर्ता पुरुष कायमचा अंतरला. आई धुणी-भांडी अशी मोलमजुरीची कामे करायची. घरच्या अशा दुर्धर परिस्थितीत नंदिनीने कुस्तीच्या आखाडय़ात २०११ साली प्रवेश केला. तनामनाने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. फळस्वरूप म्हणून सन २०१३-१४ मध्ये कन्याकुमारी येथे झालेल्या उपकनिष्ठ स्पध्रेत ४९ किलो वजनी गटात ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. चंद्रपूर येथे झालेल्या कुस्ती स्पध्रेत ती उपमहापौर केसरी ठरली. गतवर्षी उत्तर प्रदेशात झालेल्या उपकनिष्ठ स्पध्रेत तिने ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले. तत्पूर्वी केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत वय कमी असतानाही रौप्यपदकावर नाव कोरले. पाटणा येथे झालेल्या कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या स्पध्रेत जागतिक स्पर्धा खेळलेल्या दिल्लीच्या पूजा गेहलावतला तिने आस्मान दाखविले होते. राष्ट्रीय स्पध्रेत ती चौथ्या स्थानावर राहिली.

कर्नाटकातील हल्याळ केसरीसाठी झालेल्या स्पध्रेत तिने रेश्मा माने हिला पराभूत करून सर्वाचे लक्ष वेधले. पण अनुभवाने सरस आणि स्थानिक स्पध्रेचा अनुभव असलेल्या स्वाती िशदेने तिला पराभूत केले. राज्यातील खाशाबा जाधव कुस्ती स्पध्रेत तिने सलग चार वेळा सुवर्णपदक मिळविले आहे. सध्या तिची साईच्या वतीने लखनऊ येथील वरिष्ठ गटातील स्पध्रेच्या शिबिरासाठी निवड झाली आहे. बी. ए.च्या द्वितीय वर्गात शिकणाऱ्या नंदिनीला हे शिबीर आशियाई कुस्ती स्पध्रेचे प्रवेशद्वार उघडून देईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रा. दादासाहेब लवटे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रातील झळाळता मोती म्हणून स्वाती िशदे हिच्याकडे पाहिले जाते. अल्पभुधारक शेतकऱ्याच्या घरची ही पोर. तिचे चुलते सुरेश यांना कुस्तीची आवड. त्यांनीच तिला कुस्ती खेळण्यासाठी प्रवृत्त केले. सातवीत असताना तिने मॅटवर येऊन दंड थोपटले. वर्षभर कसून सराव केला आणि तो फलद्रुपही ठरला. पुणे येथे सन २०१२ मध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत ती सुवर्णपदकाची मानकरी ठरताना दिल्ली, पंजाब, हरियाना येथील तगडया स्पर्धकांना लोळवले होते. पदार्पणातच मिळालेल्या या यशानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. पुढच्या वर्षी तिने कन्याकुमारीतील उपकनिष्ठ स्पध्रेत कास्यपदक पटकावले.

तर नंतरच्या वर्षी सोनिपत (हरयाणा) येथे झालेल्या स्पध्रेत ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. हे यश तिला बँकॉक-थायलंड येथे झालेल्या आशियाई उपकनिष्ठ स्पध्रेत सहभागी होण्यास पुरेसे ठरले. या स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली. पण पंजाबमध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पध्रेत तिने रौप्यपदक पटकावले. गतवर्षी दिल्लीत ती वयाने कमी असतानाही वरिष्ठ गटात उतरली. रितू फोगट, रेल्वेची निर्मला देवी असे तगडे स्पर्धक असतानाही तिने चांगला खेळ केला. ती पारितोषिकाची मानकरी ठरली नसली तरी तिचा खेळ जाणकारांच्या नजरेत भरला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंग यांनी स्वाती व नंदिनी या दोघींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. रियो ऑलिम्पिकच्या शिबिरासाठी निवड नसतानाही त्यांना शिबिरात सहभागी होऊन सराव करण्याची अनुमती मिळाली.

खाशाबा जाधव कुस्ती स्पध्रेत सलग तीन वष्रे स्वाती सुवर्णपदकावर नाव कोरत आली आहे. हरयाणात झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पध्रेत ७५ स्पर्धकांचा सहभाग असतानाही स्वातीने कांस्यपदक मिळविले. कर्नाटकातील हल्याळ येथे झालेल्या महान भारत केसरीचा किताब पटकावतानाच स्वातीने एक किलो चांदीची गदा व २५ हजार रुपयांची कमाई केली. प्रतिस्पध्र्यावर सातत्याने आक्रमण करून गुण पटकावणे ही तिच्या खेळाची खासियत. याच जोरावर बी. ए. च्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या स्वातीने राष्ट्रकुल, ऑलिम्पिक या स्पध्रेतील यशाकडे लक्ष पुरविले आहे. हा मजकूर लिहीत असताना हरयाणात होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेसाठी तिची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे डार्फ केटल केमिकल इंडिया या कंपनीने नंदिनी व स्वाती या दोन्ही उगवत्या व कर्तृत्वमान ताऱ्यांना प्रकाशमान करण्याची जबाबदारी घेतली आहे. मानधन, जगभरचा प्रवास, उच्चशिक्षण, आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन हा खर्च ही कंपनी पेलत आहे. यामुळे सामान्य कुटुंबातील नंदिनी व स्वाती यांची कुस्ती क्षेत्रातील कामगिरी वृिद्धगत होत आहे.
दयानंद लिपारे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा