धरणीधर मिश्रा व यश चावडा यांनी आयकॉन चषक मानांकन टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. ओम दळवी ट्रस्टतर्फे महाराष्ट्र पोलीस मोटार ट्रान्स्पोर्ट टेनिस जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे.
तृतीय मानांकित धरणीधर याने प्रसन्ना बागडे याचा ७-० असा धुव्वा उडविला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला तसेच त्याने अचूक सव्‍‌र्हिसेसचा कल्पकतेने उपयोग केला. चौथ्या मानांकित यश चावडा याने साहिल पावडे याचे आव्हान ७-२ असे संपुष्टात आणले. सिद्धार्थ सार्थक याने उपांत्य फेरीत स्थान मिळविताना राकेश झडपे याला ७-२ असे हरविले. ख्रिस्तियान कमिंग्जने साहिल हुडा याच्यावर ७-१ अशी मात केली. दुहेरीत आदित्य चौगुले व यश अग्रवाल यांनी यशस्वी वाटचाल राखली. त्यांनी सतीश ओलसे व सोमनाथ पवार यांना ७-२ असे हरविले.