31 May 2016

युवराज सिंग ‘नॅशनल जिओग्राफिक’वर

क्रिकेटपटू युवराज सिंग आता क्रिकेटबरोबर मनोरंजन उद्योगात काम करणार आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज

प्रतिनिधी | December 8, 2012 5:59 AM

क्रिकेटपटू युवराज सिंग आता क्रिकेटबरोबर मनोरंजन उद्योगात काम करणार आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज सिंग कसोटी क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर विजय मिळविणारा युवराज आता अशा प्रकारे सकारात्मकदृष्टय़ा विचार करून वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांवर मात करणाऱ्या आणि आयुष्यात पुढे जाणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीच्या ‘द अनब्रेकेबल्स’ या कार्यक्रमाद्वारे तो छोटय़ा पडद्यावर येत आहे. मी कर्करोगातून बरा झालो. परंतु, माझ्यापेक्षा जगभरातील अनेक जण काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अडचणी पार करीत, संघर्ष करीत जगतात, आयुष्यात उभे राहतात. आपण कल्पना करू शकणार नाही अशा प्रसंगांचा सामना करतात. त्यांच्याविषयी लोकांना टीव्हीवरून पाहायला, ऐकायला आवडेल. अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आपली निवड करण्यात आली हे भाग्यच आहे, अशी प्रतिक्रिया युवराजने यासंदर्भात व्यक्त केली.

First Published on December 8, 2012 5:59 am

Web Title: yuvraj singh to host unbreakables on national geographic