दुजाभाव होणाऱ्या गरीब अ‍ॅथलेटिक्सपटूंसाठी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावेन असा विश्वास धावपटू द्युती चंद हिने व्यक्त केला. कटू इतिहासाला बाजूला सारत दमदार पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे द्युतीने सांगितले.

द्युती हिला दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तिच्या शरीरात पुरुष संप्रेरके असल्याचे कारण देत बंदी घातली होती. त्यामुळे तिला राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहावे लागले होते. द्युतीने ल्युसान येथील क्रीडा लवाद न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले. तिला या न्यायालयाने निदरेष ठरविल्यानंतर तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पुन्हा सुरुवात झाली.

Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
journalism fellowships scholarships in journalism fellowship for the future of journalism
स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

द्युती म्हणाली, ‘आतापर्यंत जीवनात मी अनेक संघर्षांना आत्मविश्वासाने सामोरे गेली आहे. जेवढी स्पर्धा चुरशीची होईल, तेवढी माझी कामगिरी सर्वोत्तम होईल. जीवनात प्रत्येकाला चढउतारांना तोंड द्यावे लागते. पूर्वी माझ्या जीवनात काय घडले याचे मी पुन्हा पुन्हा उगाळत नाही. त्या इतिहासावर मी आता पूर्णविराम केला आहे. कोणताही खेळाडू संभाव्य कामगिरीबाबत अंदाज व्यक्त करीत नाही. मी मात्र माझ्या कामगिरीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे’.