scorecardresearch

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारत

‘रिओ ऑलिम्पिक २०१६’ मध्ये भारताच्यावतीने यंदा आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल करण्यात आले आहे. पाच ऑगस्टपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत भारताकडून १५ खेळांसाठी एकूण १२१ खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिकमधील रोमांच तुम्हाला येथे नियमितपणे पाहता येईल आणि त्याबाबतचे ताजे अपडेट्स जाणून घेता येतील. सन १९०० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि पदार्पणातच दोन रौप्य पदकांची कमाई केली होती. भारताकडून आतापर्यंतच्या ऑलिम्पिक सहभागांपैकी लंडनमध्ये आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदके कमावली होती. यामध्ये दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता. विजय कुमार(रौप्य), सुशील कुमार(रौप्य), गगन नारंग(कांस्य), सायना नेहवाल(कांस्य), मेरी कोम(कांस्य) आणि योगेश्वर दत्त(कांस्य) यांनी पदकांची कमाई केली होती. याआधी बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने तीन पदकांची कमाई केली होती. यात एक सुवर्ण पदकाचा देखील समावेश होता. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आजवर हॉकीमध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे. भारताच्या हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ११ पदकांची कमाई केली आहे. यात ८ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यंदा भारत ऑलिम्पिकमध्ये कोणते नवे विक्रम रचणार, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला येथे पाहता येतील.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×