रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत फूटबॉलचे सामने ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. महिला फूटबॉल स्पर्धेचे हे प्राथमिक फेरीचे सामने असणार असून, ५ ऑगस्ट रोजी मुख्य स्पर्धेचा उदघाटन समारंभ होणार आहे. ब्राझीलच्या मारकाना स्टेडियमवर उदघाटन सोहळा रंगणार आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता (भारतीय वेळ- पहाटे साडेचार) स्पर्धेचा शुभारंभ होईल.
ऑलिम्पिकच्या पहिल्या पदकाचा निकाल हा तिरंदाजी खेळाचा हाती येणार आहे. त्यानंतर सायकलिंग, तलवारबाजी, जुडो, नेमबाजी, जलतरण आणि वेटलिफ्टिंगचे ऑलिम्पिक पदकासाठीचे खेळ सुरू होतील. भारताकडून जितू राय, अपूर्वी चंडेला आणि अयोनिका पौल हे १० मीटर एअर रायफल स्पर्धेची ६ ऑगस्ट रोजी रिओच्या राष्ट्रीय तिरंदाजी सेंटरमध्ये सुरूवात करतील, तर याच दिवशी १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेसाठी गुरूप्रीत सिंग आपले नशिब आजमवताना दिसेल.
६ ऑगस्ट रोजी भारताचा हॉकी संघ देखील ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसेल. भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध असणार आहे.
वेट लिफ्टिंगमध्ये सायखोम मिराबाई चानू ही ४८ किलो वजनीगटात भारताकडून वेट लिफ्टिंगच्या मॅटवर उतरेल.
ऑलिम्पिकच्या ऍथलेटिक्स वर्गवारीतील स्पर्धा ही १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. महिलांच्या १०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेने याची सुरूवात होणार आहे.
रिओ ऑलिम्पिक २०१६ स्पर्धेचा समारोप २१ ऑगस्ट रोजी होणार असून, स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनंतर साडेचार वाजता) मारकाना स्टेडियमवर स्पर्धेची सांगता होईल.
Events Schedule
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|