भारताचे आशास्थान असलेल्या टिंटू लुकाला ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राथमिक फेरीतच पराभूत व्हावे लागले. प्राथमिक फेरीतील तिसऱ्या शर्यतीत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टिंटूने पहिल्या ४०० मीटर अंतरात आघाडी घेतली होती. नंतर तिचा वेग कमी झाला. सहाशे मीटर अंतर पार केल्यानंतर ती तिसऱ्या स्थानावर होती; परंतु शेवटच्या ५० मीटर अंतरात ती सहाव्या क्रमांकावर फेकली गेली. ४०० मीटर अंतर पार करण्यासाठी तिला दोन मिनिटे ०.५८ सेकंद वेळ लागला.

टिंटूच्या गटातून बुचेल सेलिना (स्वित्र्झलड) व वाम्बुल मार्गारेट निरेरा (केनिया) यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळवत पहिली फेरी पार केली. त्यांना अनुक्रमे एक मिनिट ५९ सेकंद व एक मिनिट ५९.६६ सेकंद वेळ लागला. प्राथमिक फेरीत आठ शर्यती घेण्यात आल्या. प्रत्येक शर्यतीमधून पहिले दोन खेळाडू पात्र ठरले.