भारताच्या युकी भांब्री, सुमीत नागल व विष्णू वर्धन यांनी शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र पुरव राजा व अन्वित बेंद्रे यांना एकेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

अग्रमानांकित युकीने अन्वितला ६-३, ६-३ असे हरवले. सुमीतने पुरवचे आव्हान ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले. भारताच्या रामकुमार रामनाथनने स्पेनच्या गेरार्ड ग्रॅनोलर्सवर ७-६ (८-६), ६-४ अशी मात केली. वर्धनने बेलारुसच्या इगोर गेरासिमोवचा ६-४, ७-५ असा पराभव केला.
दरम्यान, भारताचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू युकी भांब्रीची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीत १०५व्या स्थानावर घसरण झाली आहे. साकेत मायनेनीची १६८व्या स्थानावर घसरण झाली आहे.