25 September 2017

News Flash

‘रिपब्लिक’ व अन्य माध्यमे..

टीकाकारांच्या मते, अर्णबच्या भाजपधार्जिण्या ‘हिट जॉब’ची ही पहिली चुणूक.

संतोष कुलकर्णी | Updated: May 10, 2017 1:48 AM

‘न्यू दिल्ली टाइम्स’  चित्रपटातील  दृश्य  

प्रश्न विचारण्याच्या माध्यमांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह नको,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.. त्यांचे ते उद्गार खरे ठरावेत, अशी परिस्थिती दिल्लीत नाही; पण मोदीसमर्थकमोदीविरोधकअसे गट पत्रकारांमध्ये पडले आहेत. वैचारिक दुफळी विखारी होत असताना रिपब्लिक टीव्हीचे आगमन झाले आहे..

देशात सध्या एक वेगळा आणि विचित्रच प्रकार अनुभवायला मिळतो आहे. एका वृत्तवाहिनीच्या प्रारंभावरून सामाजिक माध्यमांवर टोकाचे प्रेम आणि तितक्याच तिरस्काराचे जे उधाण आले, ते पाहून अचंबित होण्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाही. ‘रिपब्लिक टीव्ही’ असे त्याचे नाव आणि अर्णब गोस्वामी हे त्याचे मुख्य संपादक. आजपर्यंत अनेक माध्यमे आली, गेली. पण पदार्पणातच इतक्या त्वेषाने कधीही कोणाबद्दल चर्चा झाली नसावी. समर्थकांना अर्णब ‘पत्रकारितेचा खरा आवाज’ वाटतो, माध्यमांतील ‘बाहुबली’ वाटतो; पण टीकाकारांना वाटतो सरकारचा भाट. सरकारने, सरकारसाठी आणि सरकारमार्फत चालविलेले प्रोपगंडा हत्यार अशी रिपब्लिक टीव्हीची शेलकी व्याख्या काही जण करीत आहेत. या टोकाच्या विरोधाची दोन कारणे. एक तर अर्णबचा ‘टाइम्स नाऊ’मधील भाजपला अनुकूल ठरलेला तथाकथित राष्ट्रवादी अजेंडा आणि दुसरे म्हणजे रिपब्लिक टीव्हीची मालकमंडळी. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राज्यसभा खासदार, उद्योगपती राजीव चंद्रशेखर आणि इन्फोसिसचे एक संस्थापक व भाजप विचारधारेशी नाळ जोडलेली असणारे उद्योजक मोहनदास पै हे मुख्य प्रवर्तक. त्यातच अर्णबने रिपब्लिक टीव्ही ‘लाँच’ केला तो लालूप्रसाद यादव आणि तुरुंगात असलेला कुख्यात डॉन महंमद शहाबुद्दीन यांच्यात झालेल्या कथित दूरध्वनी संभाषण संवादाने. ही अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेद्र मोदींना राष्ट्रीय पर्याय होऊ  पाहणाऱ्या नितीशकुमारांना गोत्यात आणणारी बातमी, अशी मते समाजमाध्यमांतून लगोलग मांडली जाऊ लागली. टीकाकारांच्या मते, अर्णबच्या भाजपधार्जिण्या ‘हिट जॉब’ची ही पहिली चुणूक.

एखाद्या पत्रकाराविरुद्ध एवढा रोष दुर्मीळच म्हटला पाहिजे. पण अर्णब प्रकरण हिमनगाचे टोक. त्याखाली धगधगतेय राष्ट्रीय पातळीवरील पत्रकारांमधील थेट वैचारिक दुफळी. उभी फूटच म्हणा ना! यापूर्वी पत्रकारांमध्ये भांडणे, मतभेद, स्पर्धा, असूया नव्हती, असे नव्हे. ती होतीच; पण बहुतांश व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणांतून आलेली. वैचारिक तेढ नव्हतीच, असेही नाही. १९९२चा बाबरी विध्वंस, २००२च्या गुजरात दंगलीने माध्यमांच्या वैचारिक विभाजनाची सुरुवात झालीच होती. पण मोदींच्या राजधानीतील आगमनानंतर मात्र ती तेढ अधिक टोकदार, धारदार आणि विखारी झालीय. या दोन गटांच्या केंद्रस्थानी आहेत मोदी. पहिला गट डाव्यांकडे झुकलेला किंवा उदारमतवादी, तर दुसरा उजवीकडे कललेला आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा. पहिल्या गटातील मंडळी मोदींविरुद्ध आग ओकत असतात. मग या ‘मोदीग्रस्तां’विरुद्ध तितक्याच त्वेषाने ‘भक्त’ मंडळीही तुटून पडतात. मग त्यांच्याविरुद्ध ‘प्रेस्टिटय़ूट’, ‘बाजारू’ असली हिणकस शेरेबाजी केली जाते. ‘एनडीटीव्ही’ हे तर ‘भक्तां’च्या तिरस्काराचे लक्ष्य क्रमांक एक! वैचारिक घुसळण हे खरे तर माध्यमांचे मूलभूत काम. मतभेद स्वाभाविक, अपरिहार्य. पण परस्परांच्या वैचारिकतेचा आदर करण्याची सहिष्णुता आता संपल्यातच जमा आहे.

मध्यंतरी एक वरिष्ठ केंद्रीय सचिव गप्पा मारत होते आणि चर्चा होती नोटाबंदीची. एका पत्रकाराने नोटाबंदीचे समर्थन केले, तेव्हा हे सचिवबाबू सहजपणे उद्गारले, ‘‘अरे, तू भक्त दिसतोस’. याबद्दल कोणी निषेध सोडा, नाराजीही व्यक्त केली नाही. एकदा  राम मंदिराबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या हातातील माइककडे पाहत डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, ‘‘वाटलेच मला. तू एनडीटीव्हीचा असणार.’’ गोव्यात भाजपचेच सरकार येणार, हे स्पष्ट झाल्यानंतर ‘इंडिया टीव्ही’च्या पत्रकाराला मुलाखत देण्यास दिग्विजय सिंहांनी स्पष्ट नकार दिला. रजत शर्माचा ‘इंडिया टीव्ही’ भाजपला अनुकूल मानला जातो. ‘तुम्ही भाजपवाले आहात,’ असे दिग्विजय सिंहांनी या पत्रकाराला सर्वादेखतच सांगितले. असे धडधडीत शिक्के मारले जात असताना त्याचा प्रतिवाद करण्याची नैतिक ताकद खरे तर कामातून यायला हवी. तसेही होत नाही.

राजधानीतील पत्रकारितेवर आतापर्यंत डाव्या आणि उदारमतवादी मंडळींचा दाट प्रभाव होता. म्हणजे तो अजूनही आहे. पण गेल्या काही वर्षांत उजव्या विचारसरणीकडे कल असलेल्या मंडळींचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात वाढला. ‘न्यूज रूम’मध्ये त्याचे प्रतिबिंब स्वाभाविक आणि वैचारिक तेढीचे ते प्राथमिक कारण. मोदींच्या आगमनानंतर त्याला अधिकच खतपाणी मिळाले. स्वत: मोदींना काही पत्रकारांबद्दल अधिक घृणा. ती त्यांनी कधीच लपवून ठेवली नाही. एरवी भाजपवाले माध्यमस्नेही. पण पत्रकारांपासून चार हात लांब राहण्याची सक्त ताकीदच मोदींनी मंत्र्यांना आणि भाजपशासित मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे आतापर्यंत मोकळंढाकळं बोलणारे नेतेही सरकारी कामगिरीचा उदो उदो करण्यापलीकडे तोंड उघडत नाहीत. पूर्वी अरुण जेटलींकडे दररोज पत्रकारांचा अड्डा असायचा. अगदी मोदींविरोधात आगपाखड करणाऱ्या पत्रकारांचीही तिथे ऊठबस असायची. आताही अड्डा असतो, पण त्यात पहिल्यासारखी ‘चमकधमक’ राहिली नाही. काही विशिष्ट पत्रकारांबरोबर न दिसण्यासाठी भाजपचे नेते घेत असलेली काळजी पाहून अचंबित होणेच भाग पडते. नोकरशाही अगोदरपासूनच अंतर राखून. यामुळे सरकारमधील बित्तंबातम्या काढणे जिकिरीचे बनले आहे. भाजपमध्ये तसेच. यापूर्वी पक्षातील गटतट एकमेकांविरुद्ध कंडय़ा पिकवून पत्रकारांचे चांगलेच चोचले पुरवायचे. पण आता प्रत्येकाच्या तोंडाला चिकटपट्टय़ा. बातम्यांच्या उगमस्थानाची सारी कवाडे मोदींच्या सरकारने आणि शहांच्या भाजपने बंद केलीत. ‘विश्वसनीय सूत्र’ हा कल्पवृक्षासारखा स्रोत जवळपास आटलाच. माहितीचा अधिकार, संसदीय समित्यांचे आणि ‘कॅग’चे अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाने अधेमधे मारलेले ताशेरे एवढीच काय ती सामग्री पत्रकारांजवळ उरली आहे. सामाजिक माध्यमांची समांतर यंत्रणा असताना मुख्य प्रवाहातील माध्यमांची गरजच नसल्याचे भाजपचे नेते टेचात सुचवीत असतात.

याउलट यूपीए सरकारमध्ये होते. एक मंत्री दुसऱ्याबद्दल, अगदी पंतप्रधानांविरोधातही खुलेआम बोलायचा. बिनधास्तपणे बातम्या पुरवायचा. पेरायचा. प्रतिकूल नाराज नोकरशाहीदेखील तेच उद्योग करायची. अशा स्थितीत ‘ल्युटेन्स’ दिल्लीतील काही मूठभर पत्रकारांचा मोठा रुबाब निर्माण झाला नसता तरच नवल होते. एखाद्याला मंत्री करण्यासाठी त्यांचे ‘नेटवर्किंग’ कामी यायचे, खातेवाटपात त्यांच्या शब्दाला मान असायचा. (संदर्भ : नीरा राडिया ध्वनिफिती). पण मोदी राजवटीत ‘डायरेक्ट अ‍ॅक्सेस’ हीदेखील लांबचीच गोष्ट. इतक्या प्रतिकूल राजवटीची बहुतेकांना सवय नाही. या सर्व अंत:प्रवाहांचे राजधानीतील माध्यम व्यवहारांमध्ये टोकदार प्रतिबिंब पडते.

काही मोजके अपवाद सोडल्यास माध्यमांत सरकारविरोधी धार दिसत नाही. काही माध्यममालकांना राज्यसभेवर पाठविले, काहींच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष केले, काहींशी व्यक्तिगत संबंध चांगले, काहींची भाजपशी वैचारिक बांधिलकी, तर काहींना सरकारशी अनावश्यक पंगा घ्यायचा नाही. हितसंबंधांसाठी बडय़ा माध्यमसमूहांचे व्यवस्थापन कायमच सरकारधार्जिणे राहणार असते. त्यामुळेच सत्तापालटानंतरही बडेपणा कायम राहू शकतो. पण धडधडीतपणे बहुतांश माध्यमांनी पत्करलेली शरणागती अनेकांना अस्वस्थ करते आहे. ‘वाकायला सांगितले असताना माध्यमे स्वत:हून सरपटत होती,’ अशी गाजलेली टिप्पणी लालकृष्ण अडवाणींनी आणीबाणीत केली होती. अनेकांना त्याची पुन्हा आठवण होते. या सर्वामुळे माध्यमे मोदींच्या हातातील बाहुले आणि बटीक झाल्याची भावना अनेकांमध्ये आहे. त्याला खतपाणी मिळते ते मोदी राजवटीच्या माध्यमांकडे पाहण्याचा निकोप नसलेल्या दृष्टिकोनाने. तीन वर्षे पूर्ण होत आली; पण देशाच्या पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले नाहीत. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती बऱ्यापैकी ‘स्टेज मॅनेज्ड’ वाटाव्यात इतक्या मिळमिळीत होत्या. नाही म्हणायला मोदी पत्रकारांसाठी ‘दीपावली मीलन’ आयोजित करतात. पण तिथेही प्रश्न विचारण्याची संधी नसते. ते येतात, फक्त ते आणि शहा बोलतात, एखाद्याला चिमटा काढतात, सेल्फीसाठी तळमळणाऱ्या झुंडीला एकदाचे खूश करतात आणि निघून जातात..

एका किश्शाची राजधानीत चांगलीच चर्चा आहे. एका प्रख्यात इंग्रजी वर्तमानपत्रात उत्तर प्रदेश निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला अनुकूल असणारे वार्ताकन येत असल्याने भाजपमध्ये धुसफुस होती. त्याविरुद्धची आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मोदींनी त्या वर्तमानपत्राच्या एका मोठय़ा ‘बिझनेस समिट’ला उपस्थित राहण्यास ऐन वेळी नकार दिला. मोदींचा इशारा समजून अन्य मंत्र्यांनीही काढता पाय घेतला. हा एक प्रकारचा थेट संदेशच होता. असाच प्रकार राज्यसभा टीव्हीच्या पत्रकाराचा. तो केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांचा बाइट घ्यायला आला. तो त्यांनी दिला तर नाहीच; पण जाताना त्याला सुनावले, ‘‘अजून चार- पाच महिने.. त्यानंतर तुमचाही टीव्ही आमच्याच हातात येईल.’’ या विधानाचा संदर्भ म्हणजे उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारींचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपेल आणि राज्यसभा टीव्हीचे नियंत्रण ‘आमच्या’ हाती येईल! असे वाटण्याचे कारण म्हणजे डॉ. अन्सारींच्या नियंत्रणाखालील राज्यसभा टीव्ही आपल्याला अनुकूल नसल्याचे ठाम मतच सरकारने करून घेतले आहे. एका सरकारी माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असेल तर प्रतिकूल वार्ताकन करणाऱ्यांबद्दल निकोप दृष्टिकोन अवघडच. माध्यमांबद्दल या सरकारच्या आवडीनिवडी अतिशय तीव्र (स्ट्राँग लाइक्स अ‍ॅण्ड डिसलाइक्स) आहेत. कारण सोपे आहे. टीका सहन करण्याएवढा उदारमतवादी ‘डीएनए’ या सरकारचा नाही किंवा तशी बुद्धिप्रामाण्यवादी बांधिलकीदेखील नाही.

आणीबाणीत दीपस्तंभ ठरलेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहा’चे संस्थापक कै. रामनाथ गोएंका यांच्या स्मृत्यर्थ पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या सोहळ्यात मोदी मुख्य पाहुणे होते. ‘प्रश्न विचारण्याच्या माध्यमांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह नको,’ असे ते तेव्हा म्हणाले होते. ते आणि त्यांच्या सरकारचा माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदारमतवादी असता, तर हे म्हणणे वाया गेले नसते. माध्यमांचे खुपणारे प्रश्न या सरकारला सहन होतात का, हा खरा प्रश्न आहे. .

santosh.kulkarni@expressindia.com

First Published on May 10, 2017 1:47 am

Web Title: republic tv media rights narendra modi
 1. R
  raj
  May 21, 2017 at 1:55 pm
  'राजधानीतील पत्रकारितेवर आतापर्यंत डाव्या आणि उदारमतवादी मंडळींचा दाट प्रभाव होता. म्हणजे तो अजूनही आहे ' हे एक बरोबर विधान केले आहे, आणि कुबेर,केतकर,जैन आदी लोकसत्ता पत्रकार मांदियाळी ह्याच वर्गातले ! मुळातच ह्यांची पत्रकारिताखाज म्हणजे आपण लिहिले तसेच 'पक्षातील गटतट एकमेकांविरुद्ध कंडय़ा पिकवून ह्या पत्रकारांचे चांगलेच चोचले पुरवायचे '. केंद्रात तसेच राज्यात भाजपा सत्तेवर येताच ही अशी भ्रष्ट नेत्यांच्या जिवावर चालत असलेली रमणीय कंपूगिरी पत्रकारिता बंद झाली ह्याचे श्रेय नक्कीच मोदिनाच! त्यानीच तर सिद्ध केले आहे की निस्वार्थ राजकीय नेत्याना आपले कार्य अश्या हुजरया .पत्रकाराना भीक न घालता यशस्वी करता येते, तेव्हा आपण ह्यावरून जरा चांगला धडा घ्या, आणि लालू,मुलायम,राहुल, राणे,राज,उद्धव अश्या भम्पक नेत्यांचे बिंग फोडण्याचे महान कार्य करावे. आता नव्या रिपब्लिक चॅनेलवरून प्रसिद्ध झालेले लालू-श्हाबुद्दिन संभाषण हे नक्कीच भयानक आहे.
  Reply
  1. C
   Chetan
   May 13, 2017 at 2:19 am
   रामनाथ गोएंका यांच्या स्मृत्यर्थ पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या सोहळ्यात मोदी मुख्य पाहुणे होते. That time you self proclaimed, secular reporter boycotted him. Why? You yourself think why this situation has come. You yourself will get answer of it.
   Reply
   1. V
    Vijay
    May 12, 2017 at 11:28 pm
    "यापूर्वी पक्षातील गटतट एकमेकांविरुद्ध कंडय़ा पिकवून पत्रकारांचे चांगलेच चोचले पुरवायचे." "एखाद्याला मंत्री करण्यासाठी त्यांचे ‘नेटवर्किंग’ कामी यायचे, खातेवाटपात त्यांच्या शब्दाला मान असायचा. (संदर्भ : नीरा राडिया ध्वनिफिती). पण मोदी राजवटीत ‘डायरेक्ट अ‍ॅक्सेस’ हीदेखील लांबचीच गोष्ट. इतक्या प्रतिकूल राजवटीची बहुतेकांना सवय नाही."??? संतोष कुलकर्णी, हे तोंड वर करून सांगायला लाज नाही वाटत? इतक्या खुलेपणाने पत्रकारितेची लाज काढणारा पत्रकार दुर्मिळ म्हटला पाहिजे. अर्णब करतो आहे ते योग्यच आहे. फक्त त्याला डिबेट नीट "कंडक्ट" करता येत नाही. मासळी बाजार वाटतो. तेवढे सोडले तर पुरावे मांडून बोलणारा तो एकमेव पत्रकार आहे. आणि मोदीसमर्थकांना "भक्त" वगैरे म्हणणाऱ्या पत्रकारांना ‘प्रेस्टिटय़ूट’, ‘बाजारू’ वगैरे म्हटले तर काहीही चूक नाही. ते आहेतच त्या लायकीचे.
    Reply
    1. M
     Madan Jain
     May 12, 2017 at 2:24 pm
     Please, Santosh do you think Loksatta is neutral. It is anti MODI and in line with rented media and anti national. When pres utes justify anti national activities, you do not utter a word. All you journalists have lost your moral rights to teach the common man. Thank you. We will decide who we will support. The nation has been systematically misled dry by Congress and we face danger from Pak & China. Your solution to it is cause more division in the nation. Shame on you and your so called intelligent editor!
     Reply
     1. M
      milind
      May 12, 2017 at 1:23 pm
      तुमचा हा लेख आणि भीती म्हणजे समजयची परिस्थिती छान होत आसल्याचे प्रतीक आहे. कारण पहिले फक्त तुमच्या सारखे चाॅटू जे लिहायचे लोकांना ते खरे वाटायचे पण आता काय झाले आहे की इंटरनेट मुळे लोकांना खरे काय ते काळत आहे. तुम्ही ज्या बातम्या चुकीच्या देता किवा लपवून ठेवता त्या फेसबूक वर मिळतात नि तुमचा भोपळा फुटतो... खरेतर याचे दुख झाले आहे तुम्हाला. आझदी ब्रिगेडची बाजू घेणे, पाकची बाजू घेणे ,एका धर्मची बाजू ऊचलून धरणे आसे केले की लोक पकडून धुत आहेत तुम्हाला.... मग ते सर्वा भक्त होतात तुमच्यासाठी....पण आता हेच होणार तुम्ही फार दिवस मुर्ख बनवू नाही शकत. अर्नब नि टाइम्स नाउ , ज़ी न्यूज़ हे आधीच समजले म्हणून त्यांनी खरी पत्रकारिता सुरू केली. म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे.
      Reply
      1. S
       Sandeep Patil
       May 11, 2017 at 6:44 pm
       I am surprised to see below thing "..याउलट यूपीए सरकारमध्ये होते. एक मंत्री दुसऱ्याबद्दल, अगदी पंतप्रधानांविरोधातही खुलेआम बोलायचा. बिनधास्तपणे बातम्या पुरवायचा. पेरायचा. प्रतिकूल नाराज नोकरशाहीदेखील तेच उद्योग करायची. अशा स्थितीत ‘ल्युटेन्स’ दिल्लीतील काही मूठभर पत्रकारांचा मोठा रुबाब निर्माण झाला नसता तरच नवल होते. एखाद्याला मंत्री करण्यासाठी त्यांचे ‘नेटवर्किंग’ कामी यायचे, खातेवाटपात त्यांच्या शब्दाला मान असायचा. (संदर्भ : नीरा राडिया ध्वनिफिती). पण मोदी राजवटीत ‘डायरेक्ट अ‍ॅक्सेस’ हीदेखील लांबचीच गोष्ट. इतक्या प्रतिकूल राजवटीची बहुतेकांना सवय नाही. या सर्व अंत:प्रवाहांचे राजधानीतील माध्यम व्यवहारांमध्ये टोकदार प्रतिबिंब पडते...." That means people were using reporters to pressurize PM and other ministers. Is this what you want to happen again ? Also media should not be leftist or rightist. You should tell us what is happening. We will decide whether it is good or bad. Do not impose your opinion are us.
       Reply
       1. गोपाल
        May 11, 2017 at 3:12 pm
        महाराष्ट्रातील एक वर्तमानपत्र गांधी घराण्याची तळवे चाटून तुमच्या उरावर बसले ते तुमच्या पेक्षा जास्त गुणवत्ता वान होते काय प्रश्न धारदार असावेत पण सत्य असावेत तुमच्या विचारांच्या विरोधात आहेत म्हणून त्यांच्या द्वेषाचा वारसा तुम्हीच मोदींना दिलात आता बोम्बाल्ण्याचा अधिकार तरी तुम्हाला आहे काय वास्तविक तुम्हाला जे स्वन्तान्त्र्य घटनेने दिले आहे तेच त्यानाही दिले आहे त्याचा तुम्ही आदर केला असता तर तुमच्या विचारणा अर्थ होता पण आता तर हे केवळ भू ह्या सदरात मोडेल सर्व गांधीवादी काँग्रेसी पैसेवार पोसल्या जातात अनेक पत्रकार गांधी घराण्याची चापलुसी करून मोढ्या पदावर पोहचलेत V V गिरी पासून आठवा EXPRESS चा अंक चाप्लूसाच्या नावाने पुरणार नाही त्या विषयी कधी काही बोलणार काय रामनाथ जी चे नाव घेण्याचा अधिकार तुम्ही घालविला आहे सारे गांधी भारत रत्न आणि आंबेडकर /पटेलांचे काय
        Reply
        1. S
         Saurabh
         May 11, 2017 at 3:08 pm
         "याउलट यूपीए सरकारमध्ये होते. एक मंत्री दुसऱ्याबद्दल, अगदी पंतप्रधानांविरोधातही खुलेआम बोलायचा. बिनधास्तपणे बातम्या पुरवायचा. पेरायचा. प्रतिकूल नाराज नोकरशाहीदेखील तेच उद्योग करायची. अशा स्थितीत ‘ल्युटेन्स’ दिल्लीतील काही मूठभर पत्रकारांचा मोठा रुबाब निर्माण झाला नसता तरच नवल होते. एखाद्याला मंत्री करण्यासाठी त्यांचे ‘नेटवर्किंग’ कामी यायचे, खातेवाटपात त्यांच्या शब्दाला मान असायचा. (संदर्भ : नीरा राडिया ध्वनिफिती). पण मोदी राजवटीत ‘डायरेक्ट अ‍ॅक्सेस’ हीदेखील लांबचीच गोष्ट." I am shocked to see that journalism has stooped to such a level that Journalists think the above mentioned things is real journalism. I can't imagine any worse tragedy for Journalism than this. People voted Modi Govt into power to stop all the things mentioned above and we are happy that its being done. I won't take away writer's or editor's freedom of label me भक्त if they feel so, as the comment is pro Govt.
         Reply
         1. D
          dinesh
          May 10, 2017 at 10:50 pm
          ृदय साहित्यकारांना अवार्ड वापसी करायला भाग पाडणारे शासन
          Reply
          1. A
           arun
           May 10, 2017 at 10:06 pm
           अर्णबजीना या क्षेत्रात स्थिरावायचय. आता शिरकाव तर करता आलाय. पुढे रंग बदलता येतो. रजत शर्माची वाहिनी म्हणजे मोदींच्या आरती संग्रहाचीच पुस्तिका वाटते. वैचारिक घुसळण, प्रगल्भता, तटस्थता, हे शब्द तर कोणत्याच वाहिनीवर दिसत नाहीत. वेगवेगळ्या विचारांच्या ६/८ लोकांना चर्चेला बोलावून घातलेला गोंधळ म्हंजे चर्चा असंच चित्र सर्व वाहिन्यांवर दिसतं. त्यामुळे आपण ही बातमी आधी दिली या स्पर्धेत, " शक्यता " हाच बातमीचा पाया झालाय. या बातम्यांची विश्वसनीयता संपलेली आहे, कारण वाचकही आता विचारी आणि सजग झालेला आहे. हेच कारण सर्व वृत्तपत्रांच्या खपवाढीवर परिणाम करणारं झालंय. त्यात खात्रीच्या बातम्या असतात, आणि एक संपादकच मत मांडत असतो, त्यामुळे वाचकांच्या प्रबोधनात भर पडत असते. किंवा विरोध करता येतो. ३ वर्षांनी अर्णब कुठे असतील माहीत नाही.
           Reply
           1. D
            dhananjay
            May 10, 2017 at 9:26 pm
            pressituites are screaming
            Reply
            1. M
             makarand
             May 10, 2017 at 4:17 pm
             atyanta ekangi lekh. davyana udarmatvadi vagaire mhanna manje jara atich hotay. tumcha kadun dusari apeksha pan nahi. aso. baki hya lekhat SUMAR KETKAR cha nav kuthech nahi aal. hyachach artha tumhi sudha ha lekh neutral nasun ek party mhanun lihila aahe.
             Reply
             1. एक वाचक
              May 10, 2017 at 2:41 pm
              स्वातंत्र्यानंतर माध्यमांची सारी मालकी डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींकडे होती. शासन दरबारी देखील वेगवेगळ्या पदांवर डाव्या विचारसरणीच्या मातब्बरांचा राबता होता. त्यामुळे राष्ट्रवादी विचारांची अथवा संबंधित पत्रकारांची कधी दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. ते बिचारे अल्पसंख्यांकच राहीले. एक चांगले उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एक मुल होते. त्याला सर्वजण मतिमंदच म्हणायचे. त्याचे विचार कोणी ऐकित नसत. त्याला देखील वाटायचे आपण मतिमंद आहोत. परंतु अचानक एक दिवस त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. कांही सुज्ञांनी त्याच्यामधील व्यंग्य कमी करण्यासाठी त्याच्या विचारांना उत्तेजन दिले. तो बोलु लागला. तो मुक्त होवु लागला. त्याचे विचार सर्वांना समजु लागले, पटु लागले. त्यामुळे त्याला कायम मतिमंद म्हणणा-यांची गैरसोय झाली. कारण तो सुद्धा इतरांसारखा सामान्य होता. त्यामुळे त्याला मतिमंद म्हणणारे व त्याची बाजू घेणारे असे दोन वर्ग निर्माण झाले, तरी त्याची जबाबदारी आधीच्या प्रस्थापितांचीच असली पाहिजे. कारण विचारांतील भेद त्यांनीच निर्माण करुन ठेवला होता. त्यामुळे विरोध करा पण व्यक्तिद्वेष करु नका.
              Reply
              1. R
               rajendra
               May 10, 2017 at 2:12 pm
               संतोषभौ, 'राजधानीतील पत्रकारितेवर आतापर्यंत डाव्या आणि उदारमतवादी मंडळींचा दाट प्रभाव होता. म्हणजे तो अजूनही आहे ' हे एक बरोबर विधान केले आहे, आणि कुबेर,केतकर,जैन आदी लोकसत्ता पत्रकार मांदियाळी ह्याच वर्गातले ! मुळातच ह्यांची पत्रकारिताखाज म्हणजे आपण लिहिले तसेच 'पक्षातील गटतट एकमेकांविरुद्ध कंडय़ा पिकवून ह्या पत्रकारांचे चांगलेच चोचले पुरवायचे '. केंद्रात तसेच राज्यात भाजपा सत्तेवर येताच ही अशी भ्रष्ट नेत्यांच्या जिवावर चालत असलेली रमणीय कंपूगिरी पत्रकारिता बंद झाली ह्याचे श्रेय नक्कीच मोदिनाच! त्यानीच तर सिद्ध केले आहे की निस्वार्थ राजकीय नेत्याना आपले कार्य अश्या हुजरया .पत्रकाराना भीक न घालता यशस्वी करता येते, तेव्हा आपण ह्यावरून जरा चांगला धडा घ्या, आणि लालू,मुलायम,राहुल, राणे,राज,उद्धव अश्या भम्पक नेत्यांचे बिंग फोडण्याचे महान कार्य करावे. आता नव्या रिपब्लिक चॅनेलवरून प्रसिद्ध झालेले लालू-श्हाबुद्दिन संभाषण हे नक्कीच भयानक आहे, त्याचे जरा खोलात जाऊन शोधपत्रकारिता करावी !
               Reply
               1. R
                rajendra
                May 10, 2017 at 1:54 pm
                संतोषभौ, 'राजधानीतील पत्रकारितेवर आतापर्यंत डाव्या आणि उदारमतवादी मंडळींचा दाट प्रभाव होता. म्हणजे तो अजूनही आहे ' हे एक बरोबर विधान केले आहे, आणि कुबेर,केतकर,जैन आदी लोकसत्ता पत्रकार मांदियाळी ह्याच वर्गातले! मुळातच ह्यांची पत्रकारिताचोचले म्हणजे आपण लिहिले तसेच 'पक्षातील गटतट एकमेकांविरुद्ध कंडय़ा पिकवून ह्या पत्रकारांचे चांगलेच चोचले पुरवायचे '. केंद्रात तसेच राज्यात भाजपा सत्तेवर येताच ही अश्या नेत्यांच्या जिवावर चालत असलेली रमणीय कंपूगिरी पत्रकारिता बंद झाली ह्याचे श्रेय नक्कीच मोदिनाच ! त्यानीच सिद्ध केले आहे की निस्वार्थ राजकीय नेत्याना आपले कार्य अश्या हुजरया पत्रकारना भीक न घालता यशस्वी करता येते, तेव्हा आपण ह्यावरून जरा चांगला धडा घ्या,आणि लालू,मुलायम,राहुल,राणे, राज,उद्धव अश्या भम्पक नेत्यांचे बिंग फोडण्याची खरी शोधपत्रकारिता करावी !!
                Reply
                1. R
                 Rajendra Awate
                 May 10, 2017 at 11:34 am
                 republic chi lokpriyata baghun yana potshool zala ahe.
                 Reply
                 1. V
                  vikram
                  May 10, 2017 at 11:27 am
                  Foolish artical.Most of these so called secular reporters were getting hefty payments from NGO's run by foreign persons.Due to Modi's action all this payment has stopped . Secondly the common Indian people are now more open to media & outside world & hence they are totally rejecting the Fake news & that is main problem of this Secular ( fecular ) media. For example Media spent Hours & hours on Dadry kil ( which was wrong ) but now a signal channel indicated the Living burning of Hindu boy at Pune. So now the hypocrisy of Media is getting exposed & that is the right thing for the nation.
                  Reply
                  1. G
                   Girish
                   May 10, 2017 at 11:13 am
                   ya davyachi jalaleli disate...modi ni yanchi mast marun thevali aahe....hahahaha
                   Reply
                   1. समीर देशमुख
                    May 10, 2017 at 10:01 am
                    फडतुस, देशविरोधी, हिंसेचे समर्थन करणारी(लाल क्रांती) अशी डावी विचारसरणी ही उदारमतवादी विचारसरणी आहे हे वाचूनच या लेखकाची बौद्धिक पात्रता कळते. मुळात उदारमतवाद डाव्यांना किती पटतो ते क्युबा, चीन, उत्तर कोरीया सारख्या देशात जाऊन अनुभवायला पाहीजे. जर इतक लांब जावे वाटत नसेल तर आपल्याच देशात केरळ, नक्षलग्रस्त भागा मध्ये डाव्यांच्या विरोधात मत मांडणाऱ्यांना डायरेक्ट स्वर्गदर्शन घडवले जाते यातच या डाव्यांचा उदारमतवाद कोणत्या लेव्हलचा आहे तो दिसतो. आतापर्यंत मेडीया मध्ये कुबेर(अकलेने भिकारी), बरखा, राजदीप या डाव्या बाजूला झुकलेल्या मंडळींनी काय दिवे लावलेत ते आपण पाहतच आहोत. सध्या सोशल मेडीया, quora सारख्या अभ्यासु साईट्स मुळे या ढोंगींची सोंगे उघडी पडत आहेत हेच यांचे खरे दुखणे आहे. आधीच्या काळात लोक यांच्यावर पुर्ण विश्वास ठेवायचे पण आमची पिढी(शेखुलर व जिहादी वगळता) यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही लगेच 10 ठिकाणी एखाद्या घटनेबद्दल काय सांगितले जाते ते पहातो. Quora वर तर जवळपास सर्व भागातील लोक असल्याने तेथील 'खरी परिस्थिती' कळते जे हे डाव्या विचारसरणीचे महाभाग लपवून ठेवतात.
                    Reply
                    1. D
                     dhananjay
                     May 10, 2017 at 8:29 am
                     no comment don't worry For a long time Leftist were taking advantage now rightist are in command, so nothing to worry, churning will provide good result
                     Reply
                     1. Load More Comments