शरीरावर टॅटू गोंदवून अथवा रंगवून घेण्याचे वेड युवावर्गात वाढत चालले आहे. ज्यांची चित्रकला उत्तम आहे आणि टॅटू रंगवण्याचे अथवा गोंदवण्याचे कौशल्य ज्यांच्यापाशी आहे, अशा कलाकारांना गेल्या काही वर्षांत टॅटूचे एक नवे क्षेत्र करिअर म्हणून खुले झाले आहे.
या विषयातील कौशल्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्थेत रीतसर प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेमार्फत चालविला जाणारा हा ‘टॅटू मेकिंग कोर्स’ नियमितरीत्या घेण्यात येतो. या प्रशिक्षणाचा कालावधी १५ दिवसांचा आहे. या प्रशिक्षणात पर्मनंट टॅटू, टॅटू डिझायिनग, टॅटू लìनग, टेम्पररी टॅटू आदी बाबींचा समावेश आहे.
या प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. एका बॅचमध्ये एकूण ३० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या प्रशिक्षणाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान १६ वष्रे आहे. या प्रशिक्षण काळात टॅटू साहित्य पुरवले जाते. पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या कर्जाबाबतचे मार्गदर्शनही संस्थेतर्फे केले जाते.
संस्थेचा पत्ता- सी. बी. कोरा ग्रामोद्योग संस्था, िशपोली गाव, गावदेवी मदान, महापालिका शाळेजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ९२.

– सुरेश वांदिले