मिटकॉन सेंटर फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅण्ड स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने ‘सर्टििफकेट कोर्स इन कॅटिरग’ सुरू केला आहे. ही संस्था सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी निगडित कौशल्य निर्मिती कार्यक्रमाला सहकार्य करणारी संस्था आहे.
वाढता कॅटिरग व्यवसाय आणि त्यासाठी आवश्यक भासणारे प्रशिक्षित मनुष्यबळ या बाबी लक्षात घेऊन या प्रशिक्षणक्रमात विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विविध प्रकारचे सूप, चाट मसाला, स्नॅक्स, सामीष अन्नपदार्थ, पंजाबी अन्नपदार्थ बनवायला शिकवतात. त्याचबरोबर विविध अन्नपदार्थातील आवश्यक पोषणमूल्ये, विविध खाद्यपदार्थ निर्मिती, कॅटिरग व्यवस्थापन, मेन्यू नियोजन आणि डेकोरेशन, परवाने आणि नियम, कर्ज आणि सवलती, विपणन, वेळ आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींची माहिती देतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणक्रमाला प्रवेश घेता येतो. प्रशिक्षणाचा कालावधी- दीड महिने.
हे प्रशिक्षण घेतल्यावर संबंधित उमेदवार कँटिन, फास्ट फूड जॉइंट्स, स्नॅक्स सेंटर आदी व्यवसाय सुरू करू शकतात तसेच विविध लहान-मोठय़ा समारंभामध्ये कॅटिरग सेवा पुरवू शकतात.

पत्ता- मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड टेक्निकल कन्स्लटन्सी ऑर्गनायझेशन) सेंटर फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅण्ड स्किल डेव्हलपमेंट, ३३/१,
छत्रपती शिवाजी क्रीडा कॉम्प्लेक्स, ऑक्ट्रॉय नाक्याजवळ,
बालेवाडी, पुणे- ४११०४५
ईमेल- msdc@miconindia.com
वेबसाइट-http://mitcontraining.com/

Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती