आपल्यातील प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळा असतो आणि त्यामुळेच अद्वितीय असतो. मात्र, आपल्या व्यक्तिमत्त्वातील हा सकारात्मक वेगळेपणा प्रत्येकाने जाणायला हवा आणि जोपासायला हवा. तुमच्याच वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात, ते पारखून बघा. तुमचे ज्ञान, क्षमता, अनुभव, नैसर्गिक देणं यापैकी कुठल्या ना कुठल्या बाबतीत तुम्ही इतरांहून नक्कीच सरस असता.. काहींमध्ये कला असते, काहींमध्ये नेतृत्वगुण असतो, काहींमध्ये समस्या-निवारणाची क्षमता असते, काहींमध्ये क्रीडाकौशल्य असतं तर काही उत्तम श्रोते असतात. अशा विविध गुणांपैकी, कौशल्यांपैकी काही कौशल्यं तुमच्यामध्ये नक्कीच असताच, त्यांचा शोध घ्या. या गुणांना घासूनपुसून लख्ख करा.

मूलभूत गुणांचा उपयोग
’आपल्या व्यक्तिमत्त्वातील अद्वितीय पैलूंचा काळजीपूर्वक उपयोग करून घ्यायला हवा. आपल्याला या गुणांवर आपल्या भविष्याची- करिअरची इमारत उभारता येते. अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने आपल्याच लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे या गुणांचा योग्य उपयोग करणे राहून जाते.
’आपण इतरांपेक्षा वेगळे कसे हे ध्यानात घेताना आपली तुलना इतरांशी करू नये, कारण अनेकदा सहाध्यायी अथवा सहकाऱ्यांमध्ये तुमच्यासारखीच कौशल्ये व क्षमता असतात आणि त्यामुळे तुम्ही इतरांहून वेगळे कसे हे जाणणे अधिक अवघड होऊन बसते. त्यामुळे सहाध्यायी अथवा सहकारी यांच्याशी तुलना
करणे गैर ठरते.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

आपले वेगळेपण कसे जाणाल?
’ पूर्वीचे सहकारी, आधीचा बॉस, शिक्षक हे तुमच्याबाबत काय म्हणत होते याचा विचार करा. तुम्ही अमूक एक गोष्ट खूपच छान केली, असा उल्लेख कधी त्यांच्या मनात आला होता का? त्यांनी त्याबद्दल कधी तुमची प्रशंसा केली होती का, हे नक्की आठवून बघा.
’ तुम्हाला तुमच्या कुठल्या गुणांचा अभिमान वाटतो? कुठल्या गुणांमुळे तुमचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण झाले असे तुम्हाला वाटते? याचा खोलवर विचार केल्यावर आपण इतरांपेक्षा वेगळे कसे हे तुमचे तुम्हालाच लक्षात येईल.
’आयुष्यात कुठल्या गोष्टींमध्ये आपण यशस्वी ठरलो, असे तुम्हाला वाटते, त्यांची नोंद करा. त्या घटनांमध्ये तुम्ही कोणत्या क्षमतांचा उपयोग केलात, हेही आठवा.
’आयुष्यात ज्या आव्हानांना सामोरे गेलात त्या वेळी तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कुठल्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग झाला,
हेही आठवा.
’तुमच्या व्यक्तिमत्त्वातील त्रुटी ओळखा. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कमकुवत गोष्टींचा विचार करता, तेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक वास्तववादी होतो.
’तुमच्या आयुष्यात कुठल्या समस्या वारंवार उद्भवल्या त्यांची प्रामाणिकपणे नोंद करा. यामुळे स्वत:ला जाणून घ्यायला मदत होते.

मुलाखतीत व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण कसे सिद्ध कराल?
अनेकदा मुलाखतीच्या वेळेस इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही वेगळे कसे हे स्पष्ट करा, असा प्रश्न विचारला जातो.
या प्रश्नाला सामोरे जायचे साधेसोपे
टप्पे आहेत.
’ कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहात हे आधी लक्षात घ्या. कंपनीचे प्रोफाइल लक्षात घ्या. कंपनीला उमेदवारांकडून कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत, याचा अंदाज बांधा.
’ तुमची बलस्थाने कोणती याची यादी बनवा. या बलस्थानांमध्ये हस्तांतरणीय कौशल्यांचा- उदा. वेळेचे व्यवस्थापन, संवादकौशल्ये, आंतरवैयक्तिक कौशल्ये, वाटाघाटी आणि सॉफ्ट स्किल्स आदींचा उल्लेख नको. मात्र, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत अद्वितीय कौशल्यांचा- उदा. सकारात्मक दृष्टिकोन, सक्रियता आदींचा उल्लेख करायला हवा. तुमच्या अशा बलस्थानांकडे मुलाखतकार महत्त्वाची कौशल्ये म्हणून बघतो.
’प्रेरणा असलेले कर्मचारी कंपनीला प्रिय असतात. मुलाखतकाराच्या कोणत्याही प्रश्नाचे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
’तुमची उत्तरे आणि उत्तर देण्याची शैली यामुळे तुम्ही इतरांपासून वेगळे आहात, हे पुरते स्पष्ट होते.

वेगळा विचार, आगळ्या कल्पना जोपासा..
ज्या व्यक्ती इतरांहून वेगळा विचार करतात, ती पथदर्शक ठरतात. तो विचार बदल दर्शवणारा असतो, समस्यांचे निवारण करणारा असतो. त्याकरता अचाट कल्पना सुचणे आवश्यक आहे आणि त्या अमलात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. हे करताना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागतो, याची खूणगाठही मनात बाळगायला हवी.
अफलातून कल्पना सुचण्याकरता तुम्हाला त्या त्या क्षेत्रातील पारंपरिक चौकट मोडून विचारांना मुक्त वाट द्यावी लागेल. त्याकरता पुढील गोष्टी साहाय्यभूत ठरतील-
निरीक्षणशक्ती वाढवा – महान कल्पना कधीच पोकळीत जन्म घेत नाहीत. मेंदूला चालना मिळण्याकरता नव्या आणि सर्जनशील पद्धतीने विचार करायला हवा. त्याकरता वस्तू, गोष्टी, घटना, व्यक्तींचे सततचे निरीक्षण उपयुक्त ठरते.
नेहमीच्या वर्तुळापलीकडे नेटवर्किंग करा – नेहमीचे मित्रमंडळ आणि सहकारी यांच्याशी आपले साचेबद्ध बोलणे होत असते. त्यापल्याडच्या विषयांची अद्ययावत माहिती मिळावी, स्वतंत्र दृष्टिकोन विकसित व्हावा, याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींमधला वावर वाढवा. स्वत:शी सतत संवाद करा.
वाचन वाढवा – सर्जनशील विचार आणि नव्या कल्पनांचा उगम हा पुस्तकांच्या सान्निध्यात होणे अधिक शक्य असते. पुस्तकांमुळे आपले विचार विस्तारायला मदत होते आणि त्यातूनच नव्या कल्पना सुचतात.
इंटरनेटद्वारे ऑनलाइन विश्वाच्या संपर्कात राहा – वेगवेगळ्या माहितीपूर्ण वेबसाइट शोधणे आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे आवश्यक असते. जगभरातील कानाकोपऱ्यात नवे काय सुरू आहे, याची माहिती वेबसाइटच्या दुनियेद्वारे होत असते.
विचारांची नोंद ठेवा – तुमच्या भावना, विचार, पूर्वानुभव या साऱ्या गोष्टींची नोंद ठेवणे नव्या विचारांसाठी, नव्या कल्पनांसाठी साहाय्यभूत ठरू शकते. याची नियमित नोंद ठेवल्याने आपले विचार विकसित करण्याची, सुनियोजितपणे मांडण्याचीही सवय जडते.
ध्यानधारणा – जर तुमच्या मनात विचारांची गर्दी असेल, तणावाचे, काळजीचे सावट असेल तर तुम्हाला नव्या कल्पना सुचणे अवघड जाईल. तुम्हाला नव्या कल्पना सुचण्यासाठी अवकाश मिळायला हवा. शांतपणा मिळायला हवा. ध्यानधारणेने तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ शमतो आणि तणाव निवळतो. नव्या कल्पनांवर, नव्या विचारांवर, भविष्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.

वेगळेपण आणि करिअर निवड
लोकांनी तुमचे उत्पादन अथवा सेवा विकत घ्यावी, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते उत्पादन / सेवा इतरांहून वेगळी आणि अधिक दर्जेदार असणे अत्यावश्यक आहे. करिअरची निवड करतानाही तुम्ही इतरांहून ज्या कौशल्यात सर्वोत्तम आहात, ते क्षेत्र निवडायला हवे तर करिअरमध्ये यश संपादन करणे सुकर होते. जर तुम्ही तुमच्या मूलभूत गुणांच्या आधारे अभ्यासक्रम आणि करिअर निवड केलीत तर त्यात यश मिळवणे सोपे होते.

– अपर्णा राणे