दिवसेंदिवस माणसांमधली नैराश्येची पातळी वाढत चालली असून ती भयानक रूप धारण करते आहे. आज आपल्या देशातील २० मधली एक व्यक्ती नैराश्येची शिकार आहे. नैराश्य कमी करणाऱ्या गोळ्या घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून फक्त मानसोपचारतज्ज्ञांनी लिहून दिलेल्या नैराश्यावरील औषधांचं प्रमाण पूर्वीपेक्षा १४ टक्क्यांनी वाढलं आहे.. नैराश्याच्या विविध आयामांचा वेध घेणारा, त्याच्यावर मात करण्यासाठी दिशा देणारा लेख.

२८ नोव्हेंबर २०१६. दिल्लीमधल्या १२ वर्षांच्या दुर्गेश कुमारने त्याच्या मित्रांना मेसेज पाठवला, ‘‘मी आता लवकरच मरणार आहे.’’ त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘गेले दोन दिवस त्याला बरं वाटत नव्हतं आणि तो गप्प गप्प होता’, इतकंच त्याच्या कुटुंबात माहीत होतं.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

३० नोव्हेंबर २०१६ ला लष्करामधून निवृत्त झालेल्या ७० वर्षांच्या वृद्धाने सेवानिवृत्तीचे शिल्लक पैसे बँकेमध्ये वेळेत जमा झाले नाहीत म्हणून विष प्राशन करून आत्महत्या केली.

५ डिसेंबरला केरळच्या एका २८ वर्षांच्या विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केली. पत्रात तिने आईवडील आणि आजीआजोबांची माफी मागितली.

६ डिसेंबर २०१६ ला एका १६ वर्षांच्या मुलीने आईवडील जबरदस्तीने लग्न लावून देणार म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिथे तिचे पालक आले त्यांच्याशी भांडण झालं आणि त्या भरात तिने पोलीस ठाण्यामध्येच वरच्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

१० डिसेंबरला एका २२ वर्षांच्या युवकाने नैराश्येच्या भरात मुजफ्फरनगर स्टेशनमध्ये शिरत असणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला.

१९ डिसेंबरला गुजरातमध्ये अहमदाबादेतल्या एका बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. तो प्रचंड तणावाखाली होता असं पत्नीने सांगितलं.

२४ डिसेंबर २०१६. कोलकत्यात ‘तुमच्या मुलीचं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेमप्रकरण आहे म्हणून आम्ही लग्न मोडत आहोत’, असा दूरध्वनी भावी जावयाच्या घरून आला. त्या वैताग, राग आणि नैराश्यात ६२ वर्षांच्या गृहस्थाने पत्नी आणि मुलीला विष देऊन मारलं आणि स्वत: आत्महत्या केली.

१९ जानेवारीला करीमनगरमध्ये एका नववीत शिकणाऱ्या मुलाने आईवडिलांकडे स्मार्टफोन मागितला. ‘दिला नाहीत तर मी जीव देईन’ अशी धमकीही दिली. रात्र झाली तरी तो घरी आला नाही म्हणून शोध घेतला असता तो झाडाला टांगलेला, मृत अवस्थेत आढळला.

दिवस बदलतो तशी तारीख-वार बदलतात. बातम्यांच्या घटनांच्या जागा बदलतात. कृती, कर्म करणाऱ्यांची नावं बदलतात. कृती मात्र त्याच त्या, स्वत:ला मारण्याच्या, आत्महत्या करण्याच्या. कधी गळफास लावून, कधी विष पिऊन, कधी वाहनांसमोर मुद्दाम उडी घेऊन, कधी बंदूक, चाकूसारख्या हत्याराने वार करून, कधी जाळून घेऊन किंवा आणखी काही पद्धतीने जीव देऊन. वर्षांनुर्वष आपण रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर आणि इतरही माध्यमांमधून या साऱ्या मरण्याच्या घटना वाचतो, ऐकतो, बघतो! अलीकडच्या काही वर्षांत तर त्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, आपण त्याबाबतीत पार बधिर झालो आहोत. एखाद्या शीना आणि पीटरच्या कृष्णकृत्यांना प्राधान्य मिळतं म्हणून थोडे जास्त त्यात रेंगाळतो. नाही तर एखाद्या नको असणाऱ्या वस्तूच्या जाहिरातीकडे ज्या निर्विकारपणे आपण पाहतो तेवढय़ाच निर्विकारपणे अनेकदा आत्महत्या आणि खुनांच्या, मारामारी आणि बलात्काराच्या, चोरी आणि दरोडय़ाच्या बातम्या वाचतो आणि पुढे जातो. नेहमीच घडणाऱ्या या बातम्यांच्या बाबतीत आपण ‘हे असंच चालणार’ असं गृहीतही धरत असू कदाचित.

बऱ्याचदा व्यक्तीला आधी राग येतो. इतरांचा, परिस्थितीचा, घटनांचा वगैरे! हा राग वाढत गेला आणि जे बिघडतं आहे, जे मनाविरुद्ध होत आहे त्याबाबत आपण काही करू शकत नाही असं वाटू लागलं की हा बाह्य़रूपी राग आतमध्ये, स्वत:कडे वळवला जातो. हळूहळू त्याचं परिवर्तन नैराश्यात, हताशेत होतं. नैराश्य म्हणजे स्वत:कडे वळवलेला थंड राग! बंगळुरूच्या ‘निमहान्स’ या संस्थेने ऑक्टोबर २०१६ मध्ये संपूर्ण भारतभर नैराश्यविषयक सर्वेक्षण केलं. आकडेवारी सांगते की, प्रत्येक २० भारतीयांमध्ये एक व्यक्ती नैराश्येची शिकार आहे!

पण ही माणसं अशी टोकाची भूमिका घ्यायला का प्रवृत्त होतात? ही कुणी परकी, परग्रहावरची नसतात, अगदी आपल्यातीलच. आपल्याच समाजातली, आजूबाजूची, क्वचित कधी ओळखीचीही असतात. माहितीतली, ओळखीची असली तर आश्चर्य वाटतं. वाईट वाटतं. दु:ख होतं. हळहळ वाटते. अनोळखी असली तर ‘अरेरे’ यापुढे आपण फारसं जात नाही. पण ओळखीची वा परकी- माणसं आपल्याच समाजातली आहेत. भारतात २०१६ पूर्वी लोक घेत होते त्यापेक्षा किती तरी जास्त अ‍ॅण्टी डिप्रेसन्ट वा नैराश्य बरं करणाऱ्या गोळ्या घेत आहेत. २०१५ मध्ये लिहिली होती त्यापेक्षा १०.६ लाख जास्त नैराश्यावरील औषधांची प्रिस्क्रिप्शन् डॉक्टरांनी २०१६ मध्ये लिहिली आहेत, असं सर्वेक्षणातली माहिती सांगते. इतकंच नव्हे तर फक्त मानसोपचारतज्ज्ञांनी लिहून दिलेल्या नैराश्यावरील औषधांचं प्रमाण पूर्वीपेक्षा १४ टक्क्यांनी वाढलं आहे. साध्या नैराश्यापासून मोठय़ा डिप्रेसिव्ह डिसऑर्डरच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया नैराश्याची शिकार जास्त होताना आढळतात.

नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. इथं आपण एखाद्दुसऱ्या अपेक्षाभंगाने किंवा अचानक आलेल्या आपत्तीने येणाऱ्या प्रासंगिक निराशेबद्दल विचार करीत नाही, तर त्यातून होणाऱ्या परिणामांकडे पाहत आहोत. हळूहळू नकारात्मक विचारातून, नकारात्मक अनुभवातून येत जाणारी निराशा मनाच्या उमेदीवर, मनाच्या उभारीवर, चैतन्यावर नकारात्मक परिणाम करीत जाते. इतकी की, आपला आत्मविश्वास कमी होत जातो आणि आपण स्वत:ला हतबल, हताश, निराश असल्याचे अनुभवू लागतो. या साऱ्याचा परिणाम आपण आपल्या शारीरिक, मानसिक क्षमता नीट वापरता न येण्याकडे होतो. नैराश्य म्हणजे मनावर जमलेली धूळ!  नैराश्याची, हताशपणाची, हतबलतेची धूळ मनावर चढली की मनाच्या सगळ्याच व्यापार-व्यवहारांवर निष्क्रियता येते. मग काही करावंसं वाटत नाही. झोपून राहावंसं वाटतं, अति झालं तर आत्महत्याही घडते.

बऱ्याचदा व्यक्तीला आधी राग येतो. इतरांचा, परिस्थितीचा, घटनांचा वगैरे! हा राग वाढत गेला आणि जे बिघडतं आहे, जे मनाविरुद्ध होत आहे त्याबाबत आपण काही करू शकत नाही असं वाटू लागलं की हा बाह्य़रूपी राग आतमध्ये, स्वत:कडे वळवला जातो. हळूहळू त्याचं परिवर्तन नैराश्यात, हताशेत होतं. नैराश्य म्हणजे स्वत:कडे वळवलेला थंड राग! बंगळुरूच्या ‘निमहान्स’ या संस्थेने ऑक्टोबर २०१६ मध्ये संपूर्ण भारतभर नैराश्यविषयक सर्वेक्षण केलं. आकडेवारी सांगते की, प्रत्येक २० भारतीयांमध्ये एक व्यक्ती नैराश्येची शिकार आहे! यापूर्वीचं प्रमाण ४० व्यक्तीमध्ये एक व्यक्ती नैराश्याची शिकार होती. शहरांमध्ये राहणाऱ्यांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक आढळतं. इतकं नैराश्य, भीती, चिंता, वैताग, कंटाळा, नैराश्य, दु:ख, हताशपणा, हतबलता कशी निर्माण होते की व्यक्ती स्वत:लाच मारायला-आत्महत्या करायला उद्युक्त होते. या साऱ्यामागे अशा घटनांची रेलचेल बघता नेमकं काय घडतं आहे याचा शोध आणि विचार आपण समाजातल्या साऱ्यांनीच करण्याची वेळ आली आहे.

ताणतणाव अनेक प्रकारचे असतात. नोकरी-व्यवसायातील, पैशांचे, फसवणुकीचे, अपयशाचे,स्वप्नभंगाचे. पण आपण आपल्याच घरातील ताणांकडून सुरुवात करायला हवी. कारण या आघाडीवर शांती, समाधान असेल तर बाह्य़ संकटांचा सामना करायला आपोआपच बळ येतं. आज आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या तक्रारी ऐकू येतात. ‘आमचा मुलगा/ मुलगी अजिबात ऐकत नाहीत.’ ‘आमची मुलं भयंकर हट्टी आहेत. आमच्या आईवडिलांना आम्ही एवढी भावंडं असून अशा समस्या आल्या नाहीत. मग आम्हाला एकच मूल असून किती समस्या आहेत!’ हे असे उद्गार मला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट- समुपदेशक म्हणून जवळजवळ रोज ऐकायला येतात. लग्नाला काही दिवस, काही महिनेच झालेली जोडपी ‘आमचं अजिबात पटत नाही’, ‘जोडीदाराने आधीचं प्रेमप्रकरण सांगितलं नव्हतं’, ‘सासरच्या माणसांशी पटत नाही’, ‘हिला काही काम येत नाही’, ‘याला मला कुठंच न्यायचं नसतं, सगळा वेळ मित्रांबरोबर घालवण्यासाठी हवा असतो’, ‘ही सारखी आईशी/ मैत्रिणींशी फोनवरच बोलत असते’, ‘हा सारखा मोबाइल घेऊन असतो’, ‘ही तिच्या टीव्ही मालिका पाहण्यात दंग असते. मग मीच हॉटेलमधून जेवणाची व्यवस्था करतो’, यासारख्या वेगवेगळ्या तक्रारी असतात.

ही सगळी जवळची नाती, आईवडील-मुलं, सासू-सासरे, सून/जावई, पती-पत्नी, आजी-आजोबा अशी एकाच घरात राहणारी एका कुटुंबातली माणसं. घरात गेलं तर घर अत्याधुनिक गॅजेटस् आणि फर्निचरने सजलेलं असतं, मात्र नात्यांचे रंग उडालेले असतात. प्रेम, दया, शांती, क्षमा, सहकार्य, औदार्य, आपुलकी, माया, जिव्हाळा या साऱ्यांवर कोरडेपणाची, दुराव्याची, वैतागाची, रागाची, मत्सराची, द्वेषाची, ईर्षेची, स्वार्थाची एक घट्ट काजळी धरलेली असते. माणूस हा ‘मनुष्य-प्राणी’ आहे. तो ‘समाजप्रिय प्राणी’ आहे. पण प्राण्याचे हिंसक, क्रूर, आक्रमक श्वापदभाव प्रयत्नपूर्वक कमी करीत आपण आपलं ‘माणूसपण’ जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सैराट, घातक भावनांना- मद, मोह, मत्सर, दंभ, क्रोध, काम या षड्रिपूंना आवर घालत स्वत:ला संस्कारित करण्याचा प्रयत्न केला. बुद्धीचा वापर करून जगण्याच्या सर्वच अंगांना भिडत वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रगती केली. विज्ञानाची कास धरताना आपण कुठे कमी पडलो नाही. पण त्याच विज्ञानाचे आनंद, सुखसोयी आणि सुविधा उपभोगताना त्यांच्या अतिरेकाने आपण स्वत:ला आणि कुटुंबाला आणि समाजालाही दुरावत चाललो आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही.

भारतात २०१६ पूर्वी लोक घेत होते त्यापेक्षा किती तरी जास्त अ‍ॅण्टी डिप्रेसन्ट वा नैराश्य बरं करणाऱ्या गोळ्या लोक घेत आहेत. २०१५ मध्ये लिहिली होती त्यापेक्षा १०.६ लाख जास्त नैराश्यावरील औषधांची प्रिस्क्रिप्शन् डॉक्टरांनी २०१६ मध्ये लिहिली आहेत, असं सर्वेक्षणातली माहिती सांगते. इतकंच नव्हे तर फक्त मानसोपचारतज्ज्ञांनी लिहून दिलेल्या नैराश्यावरील औषधांचं प्रमाण पूर्वीपेक्षा १४ टक्क्यांनी वाढलं आहे. साध्या नैराश्यापासून मोठय़ा डिप्रेसिव्ह डिसऑर्डरच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया नैराश्याची शिकार जास्त होताना आढळतात.

जमिनीत बी पेरलं आणि त्याचा विचार सोडून दिला तर निसर्गाच्या कृपेने त्याचं झाड होईलही, पण नक्की कसं असेल ते सांगता येणार नाही. पण पेरलेल्या बीची नीट काळजी घेतली तर त्याचं रोप-झाड आणि वृक्षही छान बहरतो. हे सगळं आपल्याला माहीत आहे. मग माणसांचं आपण काय करतो? त्यांची आपण प्रेमाने, काळजीपूर्वक जोपासना का करीत नाही? इतरांचं सोडा, स्वत:ची शरीर-मनाची जोपासना आत्मीयतेने का करीत नाही? का आत्महत्येपर्यंत स्वत:ला नेतो? विचार केला तर साध्या साध्या गोष्टी, पण पुष्कळ परिणाम करणाऱ्या गोष्टी लक्षात येतात. कोणताही नातेसंबंध निर्माण व्हायला, प्रस्थापित व्हायला आणि बहरायला विकसित व्हायला वेळ लागतो. ‘शेअर आणि केअर’ हा कोणत्याही नातेसंबंधांचा प्राण असतो. पण मी, माझं, मला आणि माझ्यापुरतं हा विचार आपल्या मनात इतका घट्ट रुजलाय. तो जरा मुळातून हलवायला हवा गदागदा! ‘आपण, आपलं, आपल्याला’ हे तिथं रुजायला हवं!

आपली वस्तू दुसऱ्याला देणं लांबच, आपण आपले अनुभवसुद्धा दुसऱ्यांना सांगत नाही. ‘वेळ नाही’, ‘मला मजा येत नाही’, ‘मला दुसरीकडे जायचंय’, ‘तुम्हीच करा, तुम्हीच जा’, ‘सॉरी, मला जमणार नाही’ अशा कामाच्या, वेळ नसण्याच्या किंवा रस नसण्याच्या सबबी सांगून आपण अनेकदा कौटुंबिक, सामाजिक कार्यक्रमांना बगल देतो. आपल्याला आपल्या माणसांचं प्रेम असतं. बी पेरलंच आहे. पण त्याला सूर्यप्रकाश, मातीचा कस, पाणी, खत हे घातलं तर ते बहरणार. तसं नात्याला वेळ द्यायला पाहिजे. एकत्र भेटीगाठी, कार्यक्रम केले पाहिजेत. तर अनुभवांची देवाणघेवाण होईल.  त्यातून चांगल्या-वाईट आठवणी निर्माण होतील. या आठवणी आपल्या जगण्याची मुळं आणखीन घट्ट रुजवतील.

दिवाळीत साऱ्या कुटुंबाने एकत्रितपणे केलेला कंदील, कुटुंबातल्या साऱ्यांनी एकत्र केलेले सण, उत्सव, मॉर्निग वॉक, एखाद्या संध्याकाळी गच्चीवर केलेली भेळ- रोज रात्री तरी एकत्र घेतलेलं जेवण आणि त्या वेळी मारलेल्या गप्पा- ठरवलं तरी किती काय काय करता येईल! मजेच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असल्या तरी आता अलीकडे मजा घेण्याची, आनंद घेण्याची क्षमताच आपण संकुचित करून टाकलीय. आपली मजा, मोबाइल वा टीव्ही गेम्स, लाइक्स, मालिका, चित्रपट, वरवर आनंद साजरा करणाऱ्या पार्टी अशामध्ये आपण अडकवून टाकलीय. त्या आपल्या मजेला रानावनात मोकळं सोडायला हवं.

नात्याला छान करायचं असेल तर प्रेमाबरोबरच आदरही करायला हवा व्यक्तींचा! आदर करताना आपण त्या व्यक्तीचं अस्तित्व आवडत असल्याचं सांगतोच, पण त्या व्यक्तीला आपल्या मनात एक सन्मानाचं स्थान असल्याचंही दर्शवतो. आपण इतरांशी प्रेमाने, आदराने आणि माणुसकीने वागू लागलो की त्याचं प्रतिबिंब त्यांच्या मनात उमटतं- त्यांचीही वागणूक सुधारते. बिघडलेल्या नातेसंबंधांत हे एकदम होणार नाही. पण संयम ठेवला, वागण्यात एका पद्धतीचं सातत्य ठेवलं तर हळूहळू ऋ ण नातेसंबंधही धन होतात – किमानपक्षी तटस्थ तरी होतात. एकदा एका स्नेह्य़ांबरोबर जात असता अचानक समोर नामवंत व्यक्ती आली. स्नेह्य़ांनी माझी ओळख करून दिल्यावर त्यांनी हसत म्हटलं, ‘‘मी यांचा शत्रू’’. व्यवसायात त्या दोघांची स्पर्धा होती हे मला माहीत होतं. मी काही म्हणायच्या आत स्नेही त्या नामवंतांना म्हणाले, ‘‘तो दर्जा मी अजून तुम्हाला दिलेला नाही. मी तुम्हाला मित्रच समजतो.’’ क्षणात मळभ जाऊन लख्ख ऊन पडल्यागत वाटलं!

नात्यामध्ये स्वार्थ आला, स्वामित्वाची भावना आली, मान-अपमान आले की नातं बिघडायला वेळ लागत नाही. कोणतंही नातं पैशांनी तोलता येत नाही. आपण प्रेम केलं, काळजी घेतली, मदत केली, स्वत:ला कोणत्याही प्रकारे खर्ची घातलं तरीही नात्यातली दुसरी व्यक्ती आपली गुलाम नसते आणि आपण त्या व्यक्तीचे मालक नसतो. प्रेम असेल तर नात्यातला नकार, झिडकारणं, विरोध, नापसंती, विचारातला किंवा कृतीतला वेगळेपणाही त्याच प्रेमाच्या ताकदीवर स्वीकारता आला पाहिजे आणि निभावताही आला पाहिजे. चर्चेतून, संवादातून दोघांच्या पसंतीचा मार्ग काढता येतो. पांढऱ्या आणि काळ्यामध्ये दोघांच्या पसंतीची कुठली तरी

‘ग्रे शेड’ शोधल्यास सापडू शकते आणि पराकोटीचा मतभेद असला तर एकमेकांबद्दल सदिच्छा ठेवून वेगळं होणं, थोडं लांब जाणं चांगलं!

आपल्यालाच कळतं, आपलंच बरोबर असतं, आपण म्हणतो तेच व्हायला हवं, आपणच फक्त शहाणे या भ्रमातून स्वत:ला बाहेर काढलं तर आपली सदसद्विवेकी बुद्धी सांगते- इथं कुणीच सर्वज्ञ नाही आणि कुणीच परिपूर्ण नाही. म्हणून तडजोड करीत जमवून घेणं हे सर्वच नात्यांमध्ये गृहीत धरलेलं असतं. तडजोड करण्यासाठी मनाची लवचीकता लागते. लवचीक मन परिस्थितीत, माणसांमध्ये, कामामध्ये, वयामध्ये, स्थलांमध्ये, ऋ तूंमध्ये झालेले बदल हेरून त्याच्याशी लवकर जुळवून घेतं. झालेल्या बदलांशी उपलब्धींचं चांगलं समायोजन करू शकतं.

कामावर निघताना आयत्या वेळी मुलाने, ‘‘तुला टीचरने आज बोलावलं आहे,’’ हे सांगितलं तर ‘जमणारच नाही’ किंवा ‘आधी नाही का सांगायचं’ या नकारात्मक प्रतिसादांमध्ये वेळ आणि एनर्जी न घालवता ‘कसं जमवता येईल’ यावर विचार केंद्रित केला तर मार्ग सुचण्याच्या शक्यता वाढतात. ताण-तणाव स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर आणि कामावर परस्पर नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करतात हे सत्य सर्वानाच माहीत आहे. पण ताण-तणावांचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आपण काही करतो का? घरातल्या सगळ्यांनी रात्रीच्या जेवणाच्या आधी एकत्र बसून केलेलं ५ मिनिटांचं दीर्घ श्वसन विलक्षण परिणामकारक ठरतं. करून पाहा! हळूहळू मन शांत होत जातं. रोजचा ताण कमी होतो. पुढे ढकलला जात नाही. एकत्र बसून न बोलता केलेली ही साधी कृती नात्यांमध्ये एक सुंदर बंध निर्माण करते. या पाच मिनिटांत टीव्ही, मोबाइल, नेट सारं काही पूर्ण बंद करायचं. अगदी सायलेंट मोडवरही नको. एका खोलीत जमिनीवर काही अंथरून साऱ्यांनी मांडी घालून बसावं. खोलीत एक निरांजन लावावं आणि दिवा बंद करावा. काही न बोलता दीर्घ श्वसन करावं. दिवसातून एकदा पाच मिनिटांचं घरातल्या सर्वानी एकत्र बसून केलेलं हे सोपं साधं दीर्घ श्वसन ही शरीर मनाचं आरोग्य सुधारतं. शिवाय नातेसंबंधांचा पोतही श्रीमंत करतं.

मला खूपदा आश्चर्य वाटतं, माणसं इतरांचं जाऊ द्या स्वत:चंही ऐकत नाहीत. कोणत्याही संवादात ऐकणं आणि बोलणं दोन्ही महत्त्वाचं. कोणत्याही नातेसंबंधात भाव-भावना, मतं, विचार प्रकटीकरणासाठी संवाद आवश्यक ठरतो. संवादातून माणूस कळतो.

ताण-तणावांचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने आपण काही करतो का? घरातल्या सगळ्यांनी रात्रीच्या जेवणाच्या आधी एकत्र बसून केलेलं ५ मिनिटांचं दीर्घ श्वसन विलक्षण परिणामकारक ठरतं. करून पाहा! हळूहळू मन शांत होत जातं. रोजचा ताण कमी होतो. पुढे ढकलला जात नाही. एकत्र बसून न बोलता केलेली ही साधी कृती नात्यांमध्ये एक सुंदर बंध निर्माण करते. या पाच मिनिटांत टीव्ही, मोबाइल, नेट सारं काही पूर्ण बंद करायचं. अगदी सायलेंट मोडवरही नको. एका खोलीत जमिनीवर काही  दिवा बंद करावा. काही न बोलता दीर्घ श्वसन करावं. दिवसातून एकदा पाच मिनिटांचं घरातल्या सर्वानी एकत्र बसून केलेलं हे सोपं साधं दीर्घ श्वसन ही शरीर मनाचं आरोग्य सुधारतं. शिवाय नातेसंबंधांचा पोतही श्रीमंत करतं.

साद-प्रतिसादातून नातेसंबंधाला गती देता येते. संवाद, सुसंवाद करायचा असेल तर संवाद ‘जाणतेपणी’ करायला हवा. जाणणं हा मनाचा धर्म आहे, असं ज्ञानेश्वर म्हणतात. दुसरी व्यक्ती भावनिक स्तरावर काय अनुभवते आहे हे कळण्यासाठी आपल्या जाणिवा तीव्र हव्यात. मग देहबोली, भाषेचा वापर, आवाजाची तीव्रता आणि टोन, डोळ्यांमधला प्रकाश यासारख्या साऱ्या बारकाव्यांना लक्षात घेत आपण आपला संवाद प्रभावीपणे सुसंवादात परावर्तित करू शकतो. त्यासाठी आपल्यातला ‘मी’ विस्तारत ‘आपण’ झाला पाहिजे. खरं म्हणजे माणूस म्हणून आपलं साऱ्या माणूसजातीवरच प्रेम हवं! तसं प्रेम असेल तर सहवासाने शब्द उच्चारण्याआधी त्या व्यक्तीची भावना आपल्याला कळू शकते. दुसऱ्याविषयी काळजी असणं ही माणुसकीची एक सुंदर भावना आहे.

आपण आपल्या स्वत:शी काय बोलतो, काय सांगतो, स्वत: स्वत:शी काय संवाद साधतो त्याला प्रचंड महत्त्व आहे. एकदा एका गृहस्थांना मनात नेहमी येणारे नकारात्मक विचार लिहायला सांगितलं. चार दिवसांनी अचानक त्यांच्यावर त्या विचारांचा संवादाच्या रूपात वर्षांव केला. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांना ते असह्य़ झालं आणि ते एकदम उठून उभे राहिले. त्यांना म्हटलं, ‘‘काय झालं? काय वाटतंय?’’ ते म्हणाले, ‘‘खरं सांगतो, थोबाडीत मारावंसं वाटतं.’’ त्यांच्यासमोर त्यांनीच लिहिलेला कागद ठेवत म्हटलं, ‘‘रोजच्या रोज अगणित वेळा तुम्ही स्वत:ला मनातल्या मनात हे असं थोबाडीत मारता! तुमचं स्वत:वर इतकंसंही प्रेम नाही का?’’ थोडय़ाच दिवसांत त्यांच्यात लक्षणीय सकारात्मक फरक झाला! स्वत:वर प्रेम असलं तर ते प्रेम स्वत:च्या आत्महत्या करून नाश करू देणार नाही, नैराश्यात ढकलणार नाही, तर जगण्याची आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा देईल. कुटुंबात, नात्यांमध्ये प्रेम असेल तर या प्रेरणेला एक भक्कम आधार मिळेल. हे प्रेम स्वार्थी असेल तर नकार पचवणं अपयश झेलणं कठीण करेल. पण स्वत:वरचं डोळस प्रेम मतभेद, नकार, त्रुटी, अपयश यांच्याकडे एक जगण्यातला न आवडणारा अनुभव म्हणून बघायला शिकवेल. तिथं मान, अपमान, अहंकार इत्यादी येणार नाही.

आपलं मन संस्कारित झालं की जिवंत झऱ्यातून पाण्याचे उमाळे फुटावेत तसे मनातले सगळे सत्त्वभाव वागण्यात दिसतील. हे जीवन सुंदर आहे – त्यातल्या सुख-दु:खासकट, त्यातल्या समस्या-संकटांसकट, त्यातल्या यश-अपयशासकट! कारण ते आपण जगतो आहोत आणि ते जगणं सकारात्मक करण्याची, सुधारण्याची विलक्षण ताकद आपल्या मन- बुद्धीत आहे. गरज आहे ती ही ताकद जाणीवपूर्वक कृतीत आणण्याची! मग कोणतीही समस्या आपला कडेलोट करणार नाही!

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.)
अंजली पेंडसे – manobal_institute@yahoo.co.in