संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्ताने..

महान संगीतकार मदन मोहन यांचा १४ जुल हा स्मृतिदिन. त्याआधी २५ जून हा त्यांचा जन्मदिन असल्यामुळे या १५-२० दिवसांत मदन मोहन यांना श्रद्धांजली वाहणारे अनेक कार्यक्रम मुंबई-ठाणे-पुण्यात होतात. मात्र, १४ जुल हाच ज्यांचा जन्मदिन आहे, त्या गुणी संगीतकार रोशनजींची कुणाला फारशी आठवण होऊ नये याची खंत वाटते. यंदा विशेष म्हणजे १४ जुल रोजी रोशनजींची जन्मशताब्दी सुरू होत आहे. आणि त्यानिमित्त ‘ये इश्क इश्क है इश्क.. एक शाम रोशन के नाम’ हा कार्यक्रम नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

नौशाद, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर यांच्या यशस्वी, देदीप्यमान कारकीर्दीबद्दल आणि मदन मोहन, सचिनदेव बर्मन, सलिल चौधरी या संगीतकारांच्या सांगीतिक प्रतिभेबद्दल भरभरून बोललं जातं, लिहिलं जातं. त्यांच्याइतक्याच प्रतिभावान असलेल्या रोशन यांचं नाव मात्र अभावानेच घेतलं जातं. कदाचित त्यांची चित्रपटसृष्टीतील सर्वात लहान कारकीर्द हे त्याचे एक कारण असू शकेल. सर्वसामान्य रसिकसुद्धा वर उल्लेखिलेल्या ‘ग्लॅमरस’ संगीतकारांची नावे ऐकून असतात. विशेषकरून शंकर-जयकिशन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची. कारण त्यांची शेकडो बरी-वाईट गाणी रेडिओ-टी.व्ही.वर सतत वाजत असतात. रोशनचं नाव मात्र त्यांनी फारसं ऐकलेलं नसतं. ‘निगाहें मिलाने को जी चाहता है..’ ही कव्वाली त्यांना माहीत असते, ‘ना तो कारवाँ की तलाश है..’ या कव्वालीशिवाय त्यांची ट्रीप वा अंताक्षरी पूर्ण होत नाही.. ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं..’ हे गाणं त्यांनी कॉलेजमध्ये असताना कुणाला तरी उद्देशून (कदाचित मनातल्या मनातही!) म्हटलेलं असतं.. ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे गाणं त्यांचं अत्यंत आवडतं गाणं असतं, ‘जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात..’ हे गाणं त्यांना पाठ असतं.. पण या सर्व गाण्यांच्या सुरावटीचा जनक संगीतकार रोशन आहे, हे मात्र त्यांच्या गावी नसतं.

१४ जुल १९१७ रोजी पंजाबमधील गुजरानवाला (आता पाकिस्तानात) जिल्ह्यतल्या एका खेडय़ात जन्मलेल्या रोशन यांना लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली आणि बालवयातच त्यांची संगीतसाधना सुरू झाली. पुढे लखनौ येथील भातखंडे म्युझिक इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांना पं. रातंजनकरांचे आणि पुढे पं. मनहर बर्वे आणि उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचं मार्गदर्शन लाभलं. लखनौच्या आकाशवाणीत काम करीत असताना ते इरा मोइत्रा या गायिकेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी लग्नही केले. इरा यांनी शेवटपर्यंत त्यांच्या सहाय्यकाची भूमिका इमानेइतबारे पार पाडली.

लखनौच्या आकाशवाणीवर त्यांचे जलतरंग- वादन ऐकून केदार शर्मा यांनी १९४८ साली त्यांना मुंबईला आणले, आणि पर्यायाने हिंदी चित्रसृष्टीची दारे उघडून दिली. ‘बावरे नन’ या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातील ‘खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते..’ (गायक- मुकेश आणि गीता दत्त) आणि ‘तेरी दुनिया में दिल लगता नहीं..’ (गायक- मुकेश) या गाण्यांनी ते नावारूपाला आले. अवघ्या १९ वर्षांच्या संगीत कारकीर्दीत त्यांनी ‘हमलोग’ (१९५१), ‘अनहोनी’(१९५२), ‘अजी बस् शुक्रिया’ (१९५८), ‘बरसात की रात’ (१९६०), ‘आरती’ (१९६१), ‘ताजमहल’, ‘दिल ही तो है’ (१९६३), ‘चित्रलेखा’ (१९६४), ‘भीगी रात’ (१९६५), ‘देवर’, ‘बहू बेगम’, ‘ममता’ (१९६६), ‘अनोखी रात’ (१९६८) अशा एकूण ४१ चित्रपटांना संगीत दिलं. १९६३ मध्ये ‘ताजमहल’च्या संगीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. नंतर नावारूपाला आलेले गीतकार आनंद बक्षी आणि इंदिवर यांच्याकडून सर्वप्रथम गाणी लिहून घेणारे रोशनच! मात्र, त्यांचा ओढा शास्त्रीय संगीताकडेच होता. आणि शास्त्रीय संगीताऐवजी आपण सिनेसंगीतात करिअर करण्यासाठी का धडपडतो आहोत, हा प्रश्न त्यांना नेहमी पडे. परंतु त्यांनी आपल्या चित्रपटगीतांत भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि सतार, संतूर, सारंगी आणि बासरी या पारंपरिक वाद्यांचा अतिशय चपखलपणे वापर केला. एकटय़ा ‘यमन’ या सदाबहार रागाचा रोशन यांनी किती सुंदररीत्या वापर केला आहे पाहा- ‘मन रे तू का हे ना धीर धरे’ (चित्रलेखा), ‘तुम अगर मुझको न चाहो तो’ (दिल ही तो है), ‘जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात’ (बरसात की रात), ‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा’ (ममता), ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ (दिल ही तो है), ‘संसार से भागे फिरते हो’ (चित्रलेखा). शिवाय ‘काहे तरसाये जियरा’ (कलावती), ‘ए री जाने ना दूंगी’ (कामोद), ‘लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे’ (भरवी) अशी अनेक गाणी रागदारीच्या सोबतीने त्यांनी खुलविली.

रोशन यांनी रफीच्या आवाजातील मधाळपणाचा (‘अब क्या मिसाल दूँ’- ‘आरती’), लतादीदींच्या आवाजातील शास्त्रीय संगीताच्या बठकीचा (‘ए री जाने ना दूंगी’- ‘चित्रलेखा’), आशाजींच्या आवाजातील मादकपणा व पल्ल्याचा (‘निगाहें मिलाने को जी चाहता है’- ‘दिल ही तो है’), सुमनताईंच्या आवाजातील गोडव्याचा (‘शराबी शराबी ये सावन का मौसम’ – ‘नूरजहाँ’), मुकेशच्या आवाजातील दर्दचा (‘बहारोंने मेरा चमन लूटकर’- ‘देवर’) अतिशय उत्तम उपयोग करून घेतला. ‘मैं दिल हूँ इक अरमान भरा’ या ‘अनहोनी’ या सिनेमातील  गाण्यात तलतचा मखमली आवाज त्यांनी पियानोच्या साथीने मस्त खुलवला आहे. ‘दिल जो न कह सका’मध्ये एरवीचा रफीचा मधाळ आवाज सिनेमातील प्रसंगाची गरज म्हणून कडक, आक्रमक लागला आहे. या गाण्यातला वाद्यमेळसुद्धा आक्रमक, जोशपूर्ण आहे. सुरुवातीला ‘अ‍ॅडलिब’ मुखडय़ानंतर बोंगोचे कडक बोल ही जणू पुढच्या ‘आक्रमणा’ची नांदीच वाटते. या गाण्यातील पहिल्या अंतऱ्याआधीच्या म्युझिकमध्ये अ‍ॅकॉर्डियनच्या छोटय़ाशा पीसला जोडून व्हायोलिन्स आणि पाठोपाठ येणारा सॅक्सोफोनचा पीस उत्तम वातावरणनिर्मिती करतो. ‘बहारोंने मेरा चमन लूटकर’ या गाण्याच्या चालीतून गाण्याचा आशय (खंत, हताशपणा, तक्रार, वंचनेचे दु:ख, इ.) छान व्यक्त झाला आहे. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ या गाण्यात रफीसाहेबांच्या धीरगंभीर आवाजाला रोशनजींच्या आश्वासक सुरांची जोड लाभलीय. ‘तुम अगर मुझको न चाहो तो’ हे मुकेशच्या आवाजातलं हलकंफुलकं, पण मिश्कील, गोड गाणं.. ‘जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात’ या गाण्यातील ‘हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी, फूल से गालों पे रुकने को तरसता पानी’ या ओळींनंतर क्षणभर ठेका थांबतो. जणू त्या थेंबाला तिच्या गालावरच रेंगाळायचंय! या ओळी ऐकल्यावर पावसात चिंब भिजलेली, अवखळ, गोड चेहऱ्याची मधुबाला डोळ्यांसमोर आली नाही तरच नवल! लोकांना ‘ताजमहल’मधील ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे गाणं अतिशय आवडतं. पण मला त्याच चित्रपटातली ‘पाँव छू लेने दो फूलों को इनायत होगी’ आणि ‘जो बात तुझ में है तेरी तस्वीर में नहीं’ ही गाणी जास्त आवडतात. या गाण्यांत जी नजाकत, अलवारपणा, अनुनय आहे, तो ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’मध्ये नक्कीच नाही. मात्र, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ या गाण्याचं एक वैशिष्टय़ सांगता येईल, की या गाण्यामध्ये पहिल्या अंतऱ्याच्या

आधी जो म्युझिकचा छोटा पीस ऐकू येतो, तो त्यावेळी नुकताच भारतात आगमन झालेल्या इलेक्ट्रॉनिक ऑर्गनवर वाजला आहे. शास्त्रीय संगीताचे भोक्ते असूनही रोशनजींनी परदेशी वाद्य निषिद्ध मानलं नाही.

लतादीदींनी गायलेल्या ‘रहें ना रहे हम’, आशाजींनी अक्षरश: सोने केलेल्या ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ आणि मन्ना डे यांनी अजरामर केलेल्या ‘लागा चुनरी में दाग’ या गाण्यांबद्दल काय बोलावे! या एकेका गाण्यावर एकेक स्वतंत्र लेख लिहिता येईल. ‘रहे ना रहे हम’ हे गाणं तर मला आशयपूर्ण गीतरचना, उत्कृष्ट चाल, उत्कट, भावपूर्ण गायन आणि उचित असा वाद्यमेळ यामुळे विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट गाणं वाटतं. ‘उद्या या जगात मी असेन किंवा नसेन, पण माझ्या शेकडो गाण्यांतून मी तुम्हाला नक्कीच भेटत राहीन,’ असंच रोशन आणि गीतकार मजरुह यांना तुम्हा-आम्हाला सांगायचे असावे. आणि खरोखरच आज ५१ वर्षांनंतरदेखील या गाण्यातील ताजेपणा, गोडवा, त्यातील आशय कालबा झालेला नाही.

‘जब हम न होंगे जब हमारी खाक पर तुम रुकोगे  चलते चलते

अश्कों से भीगी चांदनी में इक सदा सी सुनोगे चलते चलते

वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे बन के कली, बन के सबा बागे वफा में

रहें न रहें हम..’

या ओळी ऐकल्यावर डोळे पाणावले नाहीत तरच नवल!

जयंत टिळक jayant.tilak@gmail.com