लग्न आणि मुलंबाळं हेच स्त्रीचं सर्वस्व, हे मानण्याचे दिवस संपले असं कितीही म्हटलं तरी, जोपर्यंत मुलगी आई होत नाही, तोवर ती सेटल झाली नाही, असंच आपला समाज अजूनही समजतो. मला आधी करियर करायचंय, असं मुलीचं म्हणणं असतं तर पुढचा विचार करून तुझी ‘साइड’ ठरव असं आईचं! मुलीची बारावी होत आली की घराघरांत हे असं शीतयुद्ध चालतं.
वयाच्या २९ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असणाऱ्या मुलीला तू ‘सेटल’ कधी होणार, तू आई कधी होणार, असे प्रश्न विचारले जाणार नाहीत.. अशीच माझी कामगिरी असावी.. टेनिसपटू सानिया मिर्झाच्या या शब्दांनी अनेक तरुणींनी स्वागत केलं. विम्बल्डन विजेतेपद झालं, आत्मचरित्र झालं, पण तू सेटल कधी होणार ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘मी सेटल नाही, असं म्हणायचंय का तुम्हाला?’ असं विचारत सानियानं सडेतोड उत्तर दिलं. हा प्रश्न आपण पुरुष खेळाडूला विचारला नसता, अशी कबुली देत मुलाखतकारानं सानियाची माफीदेखील मागितली. पण त्यातून मुलींच्या करिअरकडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन पुढे आला, हे खरं. ‘मी कितीही ग्रॅण्डस्लॅम जिंकले, कितीही टॉपला असले तरीही मूल जन्माला घालत नाही, तोपर्यंत मी सेटल नाही असंच तुम्ही म्हणणार का?’ सानियाचा हा प्रश्न तिच्या वयाच्या अनेक मुलींना पडलेला असेल. आधी लग्न कधी आणि मग मूल कधी हे प्रश्न सगळ्याच मुलींना विचारले जातात.
असाच एक प्रसंग महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरच्या बाबतीत घडला. प्रसारमाध्यमांमधून तिच्या गरोदर असण्याची चर्चा सुरू झाली आणि तिचं करिअर संपणार का, इथपर्यंत तारे तोडले गेले. ‘मॅटर्निटी लीव्ह घेणार नाही का,’ असा प्रश्न तिला विचारला असता त्यावर तिने ‘माझ्या करियरसाठी मी आत्ता काम करणं गरजेचं आहे. आई होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याचा आणि माझ्या कामाचा एवढा इश्यू करायची गरज नाही. जेव्हा मला वाटेल की मला आरामाची गरज आहे तेव्हा मी नक्कीच आराम करीन. त्या गोष्टीला मीडियाने एवढं डोक्यावर घ्यायची काहीही गरज नाही,’ असं स्पष्ट उत्तर दिलं. करीनाच्या प्रसंगातही मुलीचं करिअर आणि तिचं ‘सेटल’ होणं या दोन भिन्न गोष्टी समजल्या जातात, हे समोर आलं.

कोणत्याही मुलीला तिचं करियर निवडायची वेळ येते तेव्हा लग्न, संसार, मुलंबाळं या सगळ्याचा विचार करून तिने तिचा मार्ग ठरवावा, असं सर्वसामान्यपणे आई-वडिलांचं मत असतं, सांगणं असतं; खासकरून आईचं. मला आधी करियर करायचंय, असं मुलींचं म्हणणं असतं तर पुढचा विचार करून तुझी साइड ठरव असं आईचं! मुलीची बारावी होऊन करियरचा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हापासून घरात चालणारं हे नेहमीचं शीतयुद्ध.

Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षांला असणारी रश्मी गुरव म्हणते, ‘सेटल होणं म्हणजे मी माझ्या स्वत:साठी, घरच्यांसाठी काही करू शकेन एवढी सक्षम होणं. घरच्यांमध्ये फक्त माझे आई, बाबा असतील असं नाही; कदाचित नवरा, मुलंबाळं, सासरचे लोक हे सगळेही असू शकतील. मूळ मुद्दा हा आहे की सेटल होणं म्हणजे सेल्फ सफिशियंट होणं.’ बी. कॉम. झालेली धुळ्याची मानसी म्हणते, ‘आपल्या भविष्यासाठी आपणच हा विचार आधी करणं गरजेचं आहे. उद्या लग्न झाल्यानंतर बदललेल्या शहरामुळे आपल्या करियरवर वाईट परिणाम व्हायला नको असेल तर याचा विचार आजच करायला हवा.’

मात्र मेडिकलला शिकणारी ओवती नाईक चं मत थोडं वेगळं आहे. ती म्हणते, ‘लग्न आणि मुलंबाळं हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असं मी मानते कारण या गोष्टी काही वाईट नाहीत. मला भविष्यात लग्न, संसार करायचा आहे, असं माझं मत असेल तर मी सुरुवातीपासून त्या दृष्टीने विचार केला पाहिजे हे नक्की.’

सेटल होणं म्हणजे काय ?
सध्याची तरुणाई खूप पॅशनेट आहे. आपल्या कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. या ‘जेन झेड’ची सेटल होण्याची व्याख्यासुद्धा खूप वेगळी असल्याचं लक्षात येतंय. विशेषत: मुलींना आपापल्या क्षेत्रातील करिअर खुणावत असताना त्यांची ‘सेटल’ होण्याची व्याख्या विचारणं आवश्यक आहे.
– प्राची परांजपे
लवकरात लवकर सेटल व्हावं, म्हणून पूर्वी मिळेल ती नोकरी स्वीकारली जात होती. आज मला कुठल्या क्षेत्रात नोकरी/व्यवसाय करायचाय यावर आणि आपल्या ध्येयांवर तरुणाई ठाम आहे. सुरुवातीची धडपड मुला-मुलींची सारखीच असते. तेव्हा त्यांना समजूनही घेतलं जातं. पण मुलीनं पंचविशी ओलांडली की, प्रथम लग्न आणि त्यांनतर मूल या दोनच गोष्टींबाबत तिला छेडलं जातं. तिच्या बाबतीतले बहुतेक सगळे सल्ले हे भविष्यातली पत्नी, आई म्हणूनच दिले जातात. आई झाल्याशिवाय मुलगी सेटल झाली, असं आपल्याकडे मानत नाहीत. आई-वडिलांना हे वाटत असलं तरी आजच्या पिढीतील मुलींसाठी ही सेटल होण्याची व्याख्या बदलतेय. त्यांना मातृत्त्व ही सहज येणारी एक फेज वाटतेय. याबाबत त्यांना नेमकं काय वाटतं, हे जाणून घ्यायचा प्रयत्न

अजूनही मुलगी असलेल्या घरातून- ‘व्यवस्थित खात जा, नंतर गरोदरपणात त्रास होणार नाही’, ‘लवकर लग्न केलंस तर वेळेवर सेटल होशील’ असे डायलॉग्स ऐकू येतात. एकीकडे तरुणाईच्या बदललेल्या ध्येयांना दाद द्यायची आणि मुला-मुलींसाठी सो कॉल्ड सेटल होण्याचे नियम मात्र वेगवेगळे ठेवायचे, अशी समाजाची रीत दिसते. सानिया मिर्झाच्या निमित्ताने मुलीच्या सेटल होण्याची पुन्हा एकदा नव्याने चर्चा झाली. नव्या पिढीतील मुलगी प्रेग्नन्सी किंवा मूल होणं हा करिअरमधला ब्रेक मानत नाही, तर एक वेगळा टप्पा मानते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गरोदरपणाच्या काळातही ती व्यवस्थित काम करू शकते. अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमसारखे पर्याय देतात. अगदी रोजचा बाजार हाटदेखील तिच्यासाठी सोपा झालाय. त्यामुळे गरोदरपणात घरी बसलेली मुलगी सहसा पाहायला मिळत नाही. थोडक्यात मूल होणं ही आजच्या मुलीला ओघात येणारी गोष्ट वाटते आणि त्याची वेळ ती स्वत: ठरवते, हे महत्त्वाचं.

 

सेटल होणं म्हणजे काय?
‘सेटल’ होणं म्हणजे काय या विषयावर तरुण मुलींशी बोलताना त्यांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन उलगडला. या संवादातील काही प्रातिनिधिक मतं :

7उमा परांजपे : आयुष्यभर स्वत:च्या गरजा स्वत: पूर्ण करता येणं, कोणावरही अवलंबून न राहता जगणं म्हणजे सेटल होणं. माझ्या मते, आपलं ध्येय साध्य करता येणं म्हणजे सेटल होणं.

 

 

8चिन्मयी खरे : सेटल होणं म्हणजे स्वत:च्या पायावर ठामपणे उभं राहणं. कोणत्याही परिस्थितीत स्वत: स्वत:ला मदत करता येण्याएवढं सक्षम होणं. मी सेटल होईन तेव्हा, माझी स्वत:ची काही विशिष्ट सेविंग्ज असली पाहिजेत, जेणेकरून गरजेच्या वेळी इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही.

9सारिका चितळे : मला माझं आवडतं काम करायला मिळतंय आणि मी ते एन्जॉय करतेय. माझ्या आयुष्यातले निर्णय मी ठामपणे घेऊ शकते आहे. मला मनासारखं इन्कम मिळतंय.. म्हणजे मी सेटल झालेय, असं मला वाटतं.

10

 

 

तन्वी बापट : सेटल होण्याची माझी व्याख्या म्हणजे माझ्या बरोबरीनेच माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी मी समर्थ असणं. तेवढी सक्षम होईन तेव्हाच मी सेटल झाले असं समजीन.