नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

माणसांसारखंच ब्रॅण्डचंही नशीब असतं. माणसाच्या आयुष्यासारखे चढ-उतार उत्पादनंही पाहतात. लोकप्रियतेच्या शिखरावरून एकाच क्षणी बंदीच्या खोल गर्तेत आणि तिथून परत नव्याने स्वत:चे दिमाखदार स्थान पटकावत लोकांच्या मनात घर करून राहणं सोपं नाही. एकाच वेळी खूप लोकप्रियता आणि त्याच वेळी पराकोटीची निंदा या दोन्ही गोष्टी अनुभवणंही सहज नाही. पण हे सारं काही वाटय़ाला येऊनही ब्रॅण्ड म्हणून ठाम उभं राहणं ज्या उत्पादनाला जमलं आहे ते उत्पादन म्हणजे मॅगी.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

हे नाव इतकं पाश्चिमात्य वळणाचं की भारतीय घरात स्थान मिळवताना संघर्ष नावापासूनच होता तरीही ते भारतात रुळलं. या मॅगीचा प्रवास रोचक आहे.

स्वित्र्झलडमध्ये राहणाऱ्या ज्युलियस मायकल मॅगी यांच्यापासून ही कहाणी सुरू होते. वडिलांच्या मालकीची मिल ज्युलियस चालवू लागले तो काळ औद्योगिक क्रांतीच्या आसपासचा. या मिलमध्ये धान्य-कडधान्यं यांचं पीठ तयार होत असे. या काळात स्त्रिया नव्याने कार्यरत होऊ  लागल्या होत्या. आपल्या मिलमध्ये काम करणाऱ्या महिलांकडे पाहता ज्युलियसच्या ध्यानात आले की या स्त्रिया घरच्यांसाठी स्वयंपाक बनवण्यात बहुतांश वेळ खर्च करतात. भविष्यात मोठय़ा प्रमाणावर स्त्रिया घराबाहेर पडणार त्यांना असा एखादा पर्याय देता आला पाहिजे ज्यामुळे कमी खर्चात कमी वेळेत पौष्टिक आहार त्या बनवू शकतील. ज्युलियस यांचा डॉक्टर मित्र फ्रिडोलीन स्कलर याच्या मदतीने त्यांनी याबाबतीत विचार सुरू केला. पीठ उत्पादन तर होत होतेच, पण अन्य पदार्थाचा विचार दोघांनी केला. त्यात काही इन्स्टंट सूप होती. वेगवेगळे सॉस होते आणि नंतर नुडल्सचं उत्पादन सुरू झालं. यात धान्य-कडधान्यं, भाज्या, फळं या साऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. भाज्या, फळे या साऱ्यांचा वापर करताना स्वस्त पण पौष्टिक अन्नाचा विचार मॅगी यांनी केला होता. १९४७ मध्ये नेस्टले कंपनीने मॅगी यांची ही कंपनी विकत घेतल्यावर नेस्टले कंपनीच्या विश्वासार्हतेमुळे मॅगी हे नाव अनेक देशांमध्ये पसरले. भारतात मॅगी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नुडल्स काही देशात ‘मॅगी मी’ नावाने विकल्या जातात. इंडोनेशिया, मलाया या देशात मी (ेी)  या शब्दाचा अर्थ होतो नुडल्स. भारतात ८०च्या दशकात मॅगी नुडल्सचं वारं टीव्ही जाहिरात माध्यमातून आपल्या घरात शिरलं. शेवया किंवा नुडल्ससदृश पदार्थ भारतीयांना नवे नव्हते, पण अन्य काही आशियाई देशांसारखी नुडल्स संस्कृती भारतात नव्हती. त्यामुळे इथे नुडल्स हा प्रकार रुजवताना वेगळ्या पद्धतीच्या जाहिरातींचा विचार मॅगीला करावा लागला. या जाहिरातींमध्ये मध्यमवर्गीय गृहिणीला मेट्रोपोलिटन गृहिणीच्या रूपात सादर केलं गेलं. टु मिनिट नुडल्स ही मॅगीची ओळख इतकी ठासून सांगितली गेली की त्यातून होणारी वेळेची बचत हा मुद्दा सतत चर्चिला गेला. अशा इन्स्टंट फूडचे तोटे प्रभावीपणे समोर येऊ  लागण्याचा एक काळ होता तेव्हा ‘टेस्ट भी हेल्थ भी’ हे घोषवाक्य आले. आपण जे काही खात आहोत ते पौष्टिक आहे अशी समजूतच त्यातून घातली गेली.

मॅगी म्हटल्यावर प्रामुख्याने नुडल्स आणि नंतर मग सॉस किंवा सूप इ प्रकार आपल्या नजरेसमोर येतात. त्यामुळे मॅगी या ब्रॅण्डमधला नुडल्स हा हुकमी एक्का. तो मात्र मध्यंतरी त्यातील शिस्याच्या घातक प्रमाणामुळे बंदीला सामोरा गेला. भारतात मॅगीवर बंदी येणं ही एक बातमी झाली. ब्रॅण्ड चर्चेत तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या अस्तित्वाबद्दल ग्राहकाला काही देणं घेणं असतं. मॅगीबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा होऊनही मॅगी नुडल्सशी अनेक ग्राहक कायमचे जुळलेले राहिले हे या उत्पादनाचं सगळ्यात मोठं यश आहे.

आज भारतासह अनेक देशांत मॅगीचा व्याप विस्तारलेला आहे. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड आपल्या नुडल्स घेऊन भारतात आले. मात्र जे यश जो विश्वास मॅगीने प्राप्त केला तो खचितच कुणाला मिळाला असेल. गडद पिवळा रॅपर आणि त्यावर लाल अक्षरातली मॅगी ही अक्षरे दुरूनही आपण ओळखतो इतकंच नाही तर खरेदीला गेल्यावर नकळत असंख्य ब्रॅण्ड्समधून बरोबर तेच पाकीट उचलतो.

आई घरात नसताना, स्वयंपाकाचा पहिला प्रयोग करून पाहताना, दोस्तांच्या बॅचलर पार्टीत, रात्री जागून असाईनमेंट्स पूर्ण करताना, थकून आल्यावर पोटात काही ढकलून झोपताना मॅगीच हवी असं म्हणणारे असंख्य आहेत. त्यातल्या दोन मिनिटांची करामत चवीइतकीच भारी आहे. खरंतर मॅगीला खास म्हणावी अशी चवही नाहीच. पण तरी ते जे काही त्या घसरत्या गुंडाळ्यांमधून समोर येते त्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली मंडळी मॅगी खाणे योग्य की अयोग्य याच्या पल्याड गेलेली असतात, याच जोडीला मॅगी बिलकूल आवडत नाही अशांचा टक्काही मोठा आहे.

कपाळावर बसलेला दोषाचा ठपका दूर करून पुन्हा त्याच गतीने, त्याच ठामपणे विश्वास निर्माण करणे भल्याभल्यांना जमलेले नाही. मॅगी मात्र याला अपवाद ठरते. हा काही पौष्टिक आहार नाही, पण आपल्यातल्या सामान्यपणालाही ठणकावून वठवता येणे हेच या उत्पादनाचे खास वैशिष्टय़. काही गोष्टी कठीण असतात म्हणून त्यांचं आकर्षण असतं तर काही गोष्टी सोप्या, सहज असतात म्हणून आवडतात! मॅगीसारख्या !

viva@expressindia.com