गाजलेल्या चित्रपटगीतांमागचा आवाज प्रत्यक्ष ऐकताना, त्या गीतांमागच्या कथा उलगडताना आणि त्या कथांबरोबर एका प्रथितयश गायिकेचा प्रवास उलगडताना त्या गप्पांचे साक्षीदार असणं, हा अनुभव खूप वेगळा असतो. गप्पांच्या ओघात ऐकायला मिळणाऱ्या गीतांमुळे कान आणि मन तृप्त करणारा हा अनुभव मुंबईत रुईया महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने अनेकांना मिळाला. साधना सरगम यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि व्यक्तिमत्त्वातला विनम्रपणा अनेकांना भावला तर पहला नशा, आओ ना अशा गाण्यांची झलक कुठल्याही वाद्यवृंदाशिवाय ऐकतानाही अनेकजण तल्लीन झाले. उपस्थितांपैकी काही तरुणींच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

TRUPTI-PATILमंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाला भेटायला मिळालं
आजचा कार्यक्रम खूप छान होता. साधनाजींना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांना भेटायलाही मिळालं. खूपच छान अनुभव होता. त्यांचा आवाज खरंच मंत्रमुग्ध करणारा आहे. त्यांनी कार्यक्रमात गायलेल्या गाण्याच्या ओळी अजूनही कानात रुंजी घालताहेत.

– तृप्ती पाटील

 

GAURI-AMBEDKERविनम्रता भावली
साधनाजींबरोबरचा आजचा व्हिवा लाउंज कार्यक्रम मला खूपच आवडला. त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यामुळे फारच मजा आली. त्यांचं मनमोकळं व्यक्तिमत्त्व मनाला भावलं. एवढी र्वष पाश्र्वगायिका म्हणून चित्रपटसृष्टीत वावरूनही आणि एवढय़ा दिग्गजांबरोबर काम करूनही त्या खूप ‘डाउन टू अर्थ’ आहेत, हे जाणवलं.
–  गौरी आंबेडकर

MANSI-JOSHIअनौपचारिक गप्पांनी रंगत वाढली
कार्यक्रम खूप छान वाटला. मला आजच्या कार्यक्रमातून, साधनाजींकडून खूप काही शिकायला मिळालं. पाश्र्वगायनातले बारकावे त्यांनी उलगडून दाखवले. इतर कार्यक्रमांत जे प्रश्न विचारले जात नाहीत ते आजच्या अनौपचारिक गप्पांमधून विचारले गेले आणि त्यामुळे खूपच मजा आली. असा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच अटेण्ड केला आहे. ’ -मानसी जोशी

 

APARNA-SALEKARगायनक्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली
मी पहिल्यांदा व्हिवा लाउंज हा कार्यक्रम अटेण्ड केला. मला साधनाजींना भेटायची संधी मिळाली, त्यामुळे खूप आनंद झाला. मला गाण्याची आवड आहे आणि या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. त्यासाठी ‘प्रेरणा’ या संवादातून मिळाली. त्यासाठी काय मेहनत घ्यावी हे शिकायला मिळालं. गाताना भीती कशी घालवावी हे समजलं. खूप छान अनुभव होता.
–  अपर्णा सालेकर

 

MITHILA-SHETEगोड व्यक्तिमत्त्व भावलं
मी दर वेळी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ अटेण्ड करते. मला हा कार्यक्रम खूप आवडतो. या कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील यशस्वी महिलांना आम्हाला भेटता येतं. तो खूप छान अनुभव असतो. आजचा कार्यक्रम खूपच रंगला. साधनाजींकडून खूप शिकायला मिळालं. त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या गाण्यांप्रमाणेच गोड आहे, हे समजलं. त्यांना भेटून खूप आनंद झाला.

–  मिथिला शेटे

KALYANI-JADHAVलाडक्या गायिकेला भेटून भारावले
मला आजच्या कार्यक्रमातून खूप काही मिळालं. मी स्वत: शास्त्रीय संगीत शिकते आहे. कसा रियाज केला पाहिजे, किती मेहनत घेतली पाहिजे, काय सुधारणा कराव्यात हे साधनाजींमुळे समजलं, तसं या क्षेत्रातलं पूर्वीचं वातावरण आणि सध्याचं वातावरणही उमजलं. साधनाजी माझ्या लाडक्या गायिका आहेत. ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मुळे त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली, खूपच छान वाटलं.

– कल्याणी जाधव

KARNTI-KANETKERध्येयपूर्तीमागची मेहनत उलगडली
आजचा कार्यक्रम खूप छान होता. अत्यंत मोठय़ा व्यक्तिमत्त्वाला भेटायला मिळालं. अशा संधी खूप कमी मिळतायत. तुमची पॅशन, तुमचं ध्येय साध्य करायला किती मेहनत घ्यावी लागते, हे साधनाजींनी सांगितलेल्या अनुभवांमधून समजलं. गाण्यातलं शब्दांचं महत्त्व, वेगवेगळ्या संगीतकारांबरोबरचे, संगीत प्रकारांबद्दलचे उदाहरणासहित दिलेलं स्पष्टीकरण खूपच भावलं.
–  क्रांती कानिटकर

संकलन : प्राची परांजपे, छायाचित्रे : मानस बर्वे