मनीष अरोरा

‘ब्लेंडर्स प्राईड फॅ शन टूर २०१७’च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वाचा बादशाहो असलेल्या मनीष अरोराकडून दिवाळीच्या निमित्ताने त्याची जादूगरी आणि फॅशनचे ट्रेंड याविषयी जाणून घेण्याची संधी ‘व्हिवा’ला मिळाली.

भारतात जेव्हा फॅ शनच्या प्रशिक्षणक्रमांना नुकतीच सुरूवात झाली होती तेव्हा मनीष अरोरा नामक सर्वसामान्य तरूणाने फार काही माहिती नसताना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तो फॅशन डिझायनर झाला. त्यावेळी लग्नापलिकडे दिल्लीतली फॅशन पोहोचली नव्हती आणि मुंबईत सिनेमाशिवाय फॅशनला स्थान नव्हतं. या वातावरणात आपलं लहानसं लेबल सुरू करणारा हा रंगांचा जादूगार आज आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर म्हणून प्रसिध्द आहे. युरोप, अमेरिका आणि त्याहीपेक्षा फॅशनची मांदियाळी समजल्या जाणाऱ्या पॅरीसच्या मोहनगरीत मनीष अरोरानेच डिझाईन केलेले कपडे घातले जातात.

लहानपणी परीकथेत ‘एक होता जादूगर.. त्याच्याकडे होती एक जादूची छडी’ या दोन ओळी कानावर पडल्यानंतर त्या छोटय़ाशा छडीने अवघ्या जगाला आपल्या मायाजालात अडकवण्याचं सामथ्र्य असणाऱ्या जादुगाराविषयी कोण अप्रुप वाटायचं. अशी जादू माणसासाठी खरंच शक्य आहे का?, या प्रश्नाचं मूर्तिमंत उत्तर मनीष अरोरा हे आहे. फ्रान्सचा जगप्रसिध्द ब्रँड सांभाळणारा, फक्त कपडेच नाही तर घडय़ाळ, दागिने अशा ५४ प्रकारच्या मोठय़ा ब्रँडसाठी त्याने डिझाईनिंग केलं आहे. आणि तरीही ही कुठली जादू नाही. तर रोजच्या कामातून मिळणारा अनुभवच तुमच्या कलेतून ही किमया घडवू शकतो, इतकं साधं आणि प्रामाणिक उत्तर त्याने दिलं. त्याला रंगांचा किमयागार म्हटलं जातं. कारण सतत दोन-चार रंगांशी खेळत राहणं त्याला आवडत नाही. त्याच्या कलेक्शनमधील कपडय़ांची संकल्पना ही अगदी साधी असते. पण त्या साध्या कपडय़ांमध्येही एकाचवेळी १०-१२ रंगांशी खेळत नवा आकार, डिझाईन देत तो आपल्या संकल्पना सतत बदलत राहतो. १९९७ मध्ये त्याने स्वत:चं लेबल सुरू केलं होतं. त्यावेळी काम करता करता परदेशात कलेक्शन सादर करण्याची संधी मिळाली. फ्रान्समधून त्याचं कलेक्शन सादर झालं. आणि तिथे त्याच्या कपडय़ांना खूप दाद मिळाली. तिथल्या जगप्रसिध्द ब्रँडबरोबर पार्टनरशीप करायची संधी मिळाली आणि आता हा भारतीय फॅशन डिझायनर पॅरीसच्या फॅशनवर्तुळातलं मुख्य नाव आहे. हे सगळं सहजसाध्य वाटत असलं तरी त्या काळात ते होण्यासाठी तेवढा वेळ आणि मेहनतही निश्चित करावी लागली, असं तो म्हणतो. स्टाईल म्हणजे त्याने किंवा तिने कुठलेतरी वेगळ्याच पध्दतीचे कपडे घातले पाहिजेत असं नसतं. प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटतं. आणि सौंदर्याची ज्याची त्याची व्याख्याही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतं याचा विचार न करता आपण डिझाईन केलेल कपडे परिधान के ल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपोआप हसू खुललं पाहिजे, इतकं  साधं तत्व डिझाईनिंग करताना मी पाळतो, असं त्याने सांगितलं. मग मनीष अरोराची किमया नेमकी घडते कुठे? पॅरिसमध्ये भारतीय डिझाईनिंग, कपडे यांचा जास्त प्रभाव आहे का?, असे प्रश्न एकापाठोपाठ एक येतात.

मनीषची किमया ही डिझाईनिंगपेक्षाही त्याच्या क्राफ्टमध्ये आहे. त्याने पहिल्यांदाच जर्मन, फ्रेंच या देशातील नावाजलेली ‘किश’ फॅशन भारतात आणली. परदेशात वापरले जाणारे रंग त्याने भारतीय तसेच वेस्टर्न लुकमध्ये वापरले, फंकी कलर्स सोबत फ्रेंच कलर्स यांचा वापर तो करतो. एम्ब्रोयडरी, पेटिंग, प्रिंट्स, पॅटर्नस, डेकोरेटीव आर्टस, पॉप कल्चर, फोटोमॉन्टाज, मर पेटिंग, स्कल्पचर आणि टॉय पेटिंग या सर्वाचा मोठय़ा खुबीने वापर करत फ्यूजन करणारा अंतरगी डिझानयर म्हणून त्याची ओळख आहे. पॅरीस किंवा कुठेही भारतीय फॅशनचा प्रभाव नाही. मी तिथे कपडे डिझाईनिंग करताना भारतीय फॅशन, लुकचा विचार अजिबात करत नाही. पण भारतीय टेक्निक्स आणि इथली कारागिरी यांचा पुरेपूर वापर करतो. जे तिथल्या फॅशनमध्ये सरस ठरतं. कारण त्यांच्याकडे ती टेक्निक्स नाहीत, असं तो स्पष्ट करतो. माझ्या फॅशनमध्ये मी भारतीय अ‍ॅस्थेटिक्स कधीच विसरत नाही. कारण तो माझा पाया आहे. माझं काम याच पायावर उभं राहिलेलं आहे. पण सतत सर्जनशील राहणं ही कलाकाराची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्या अंगात जन्मत:च कला असली पाहिजे वगैरे सब झूठ आहे, असंही तो सांगतो. आपल्या आजूबाजूच्या गोष्टीच आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यातूनच आपल्याला कल्पना सुचतात, डिझाईन्स मिळतात, पण त्यासाठी सतत त्याचा शोध घेणारी नजर असली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. कल्पनाशक्ती आपल्याला साथ देते त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी रस्त्यारस्त्यावर आपल्या कशी चित्रं मिळतील व त्यातून डिझाईन तयार होईल सांगता येतं नाही. माझ्या बाबतीत हेच खरं आहे, असं सांगणारा मनीष कलाकार हा अनुभवानेच कलेत जास्त मुरत जातो, हे आग्रहाने सांगतो. डिझाईनिंग करताना प्रत्येक ठिकाणची फॅशन, तिथली विचारसरणी आणि राहणीमान या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. माझ्या कपडय़ांवर या सगळ्यांचा एकत्रित विचार केलेला ठळकपणे दिसून येईल. मला जे वाटतं ते मी माझ्या कपडय़ांमधून मांडतो आणि तेच लोकांना जास्त भावतं. तीच माझी खरी ओळख आहे, असं तो सांगतो. जागतिक स्तरावर आता कुठे खऱ्या अर्थाने फॅशनचं आव्हान वाढलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातली स्पर्धा आता अधिक वाढली असल्याचं मत त्याने व्यक्त केलं.

दिवाळीनिमित्ताने मनीष अरोराने सांगितलेले फॅशन ट्रेंड्स –

  • फ्यूजन रंग : रंगावर प्रेम करणाऱ्या लेडी गागानेही मनीषचे हटके रंग ट्राय केले आहेत. या दिवाळीत त्याने डार्क रंगाचा वापर यल्लो, गुलाबी, निळा अशा जांभळ्या रंगांवर केला आहे. त्यामुळे रंगांची सरमिसळ असणारे ड्रेस हे अगदी साडीसारख्या पेहेरावावरही खुलतात. तसे ब्लाऊज व जॅकेटस् मनीषने आणले आहेत.
  • ट्रॅडिशनल स्कर्ट : शॉर्ट स्कर्ट हे अंतरंगी क्राफ्टिंगसोबत असल्याने शर्टवर असे स्कर्ट खूलून दिसतात. यात भारतीय डिझाईन्स असल्याने फेस्टिव्हल वेअरसाठी ते उपयुक्त ठरतील.
  • एम्ब्रॉयडरी : आकाराला महत्त्व देणारा हा डिझानयर असल्याने त्याची एम्ब्रोयडरी ही सेमी सर्कलमध्ये खुलून दिसते. त्यामुळे फॅशनेबली क्लासी दिसण्यासाठी विविध रंगासोबतची एम्ब्रोयडरी व त्यावरची चमकणारी झळाळी ही यावेळच्या कपडय़ांची वैशिष्टय़े ठरतील.
  • लेहेंगा : मनीषने ट्राईबल संस्कृतीत लॉन्ग लेहेंगे आणलेले आहेत. मनीषने कधीच लेहेंग्यावर चोळीचा पेहेराव ठेवला नाही. पण लॉन्ग कुर्ती, स्पेगेटी, डेनिम जॅकेट व लांब कोटचा पर्याय वापरता येतील.
  • ग्लोडन ज्वेलरी : सोनेरी रंग हा आवडता रंग असला तरी ब्रेसलेट घालताना आपण चंदेरी किंवा इतर कलरफूल बांगडय़ाना प्राधान्य देतो. पण मनीषच्या ग्लोडन पॅच असणाऱ्या कंगनमध्ये व्हिल तसेच हटके लटकन वापरता येतील.
  • गाऊ न : सिल्क व वेल्वेट असणारे सुंदर डिझानयर गाऊ न हिरव्या, जांभळ्या व लाल रंगात फेस्टिवलसाठी मनीष घेऊ न आला आहे. कॉस्मिक आर्ट केलेले हे गाऊ न फेस्टिवल वेअर तसेच पार्टी वेअर म्हणून आहेत.

viva@expressindia.com