प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
हाय अमित, मी अदिती. मी कॉलेज स्टुडंट आहे. माझी उंची ५.१० असून वजन ६० किलो आहे. ब्रॉड शोल्डर हा माझा प्रॉब्लेम आहे. मला पार्टी, कॉलेज, लग्नसमारंभ, फॉर्मल इव्हेंट्स इत्यादीसाठी चांगले कपडे सुचवा. कधी कधी अ‍ॅक्सेसरीजबद्दल मी कन्फ्युज होते. त्याबद्दलही सांगा.

हाय अदिती,
तू खूप लकी आहेस. मस्त उंच आहेस आणि हा तुझ्यातला प्लस पॉइंट आहे. अनेक मुली चांगली उंची मिळवण्यासाठी धडपड करत असतात. पण तुझ्या बिग बिल्टबद्दल काहीशी नाराज आहेस हे मी समजू शकतो. सुरुवातीला एक महत्त्वाची टीप. असे कपडे अजिबात वापरू नकोस, ज्यात तुझे खांदे ब्रॉड दिसतील. व्ही नेक्स किंवा डीप यु नेक्स तुला सूट होतील. पॅडेड शोल्डर्स किंवा कफ्तान टॉप्ससारखे लूज शोल्डर वापरू नकोस. काऊल नेक्स, डीटेलिंग, एम्ब्रॉडरी, लहान डिझाइन योक नेक इत्यादीमुळे तुझ्या खांद्याकडे जास्त लक्ष जाणार नाही. काहीसे असेच नेकपिसेस वापर ज्यामुळे खांद्यांकडे जास्त लक्ष जाणार नाही. लांबीला मोठे असलेले नेक्पिसेस आणि इयरिरग्समुळेसुद्धा असाच फायदा होईल.
त्यानंतर तुझे ड्रेसेस किंवा टॉप्स हे शेपमध्येच असतील याची काळजी घे. त्यामुळे कमरेकडे तुला व्यवस्थित फिटिंग मिळेल आणि तू ब्लॉकी वाटणार नाहीस. तसेच बॉटम्ससुद्धा व्यवस्थित फिटिंगचे वापर. पलाझो, पटियाला सलवार असे लूज बॉटम्स वापरू नको. त्यामुळे तू बॉक्सी दिसशील. ही गाईडलाइन्स वापरून तू नक्कीच कॉलेजसाठी रेग्युलर टॉप्स, फिटेड कुर्तीज वापरू शकतेस. फॉर्मल वेअरसाठी ट्राउझर्स, फिटेड शर्ट आणि पार्टीसाठी फिटेड वेस्ट वनपीस ड्रेस वापरू शकशील. पॉइंटेड टीप शूज स्टीलेटोज, ओपन फ्लॅट्स अशी फूटवेअर वापर. केस छोटे ठेवण्याऐवजी न कापता वाढवत जा. त्यामुळे तुझे रुंद खांदे झाकले जातील. उंचीमुळे नॅचरली तुला फायदा मिळेलच आणि या इतर गोष्टी फॉलो केल्यास की तू नक्कीच स्मार्ट दिसशील.
अमित दिवेकर
(अनुवाद : प्राची परांजपे )