नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

एखादं उत्पादन अख्ख्या पिढीची कहाणी सांगतं. ते त्या पिढीचं प्रतीक ठरतं. मराठी नाटकांचा, चित्रपटांचा एक काळ असा होता जिथे गिरणगाव, मध्यमवर्गीय कुटुंब अशी परिस्थिती नेपथ्यातून दाखवताना हमखास वापरलं जाणारं गिमिक म्हणजे त्या कुटुंबाच्या दारात लटकणाऱ्या डालडाच्या डब्यातील तुळस. त्या कुटुंबाविषयीची बरीचशी माहिती त्या एका नेपथ्यातून प्रकट व्हायची. अस्सलतेकडून समंजसतेच्या दुय्यम पर्यायाकडे झालेल्या एका अख्ख्या पिढीचा प्रवास त्या पिवळसर डब्यात दडलेला होता. हा डबा होता ‘डालडा’चा. वनस्पतीजन्य तुपाचा. मुळात हे इतकं भलंमोठं नाव पाठ करायची त्या पिढीला गरजच वाटली नाही. डालडा म्हटलं की काम व्हायचं! अशा या नॉस्टॅल्जिक ब्रॅण्डची कहाणी तितकीच रोचक आहे !

a pineapple seller hairstyle look like a pineapple
तरुणाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी! केली चक्क अननसाची हेअरस्टाईल, अननस विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : कीपॅड फोनवरून खरंच युपीआय पेमेंट करता येते? व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
Watch this video before eating strawberries
स्ट्रॉबेरी खाण्याआधी हा व्हिडीओ एकदा बघाच! पुन्हा आयुष्यात कधीही खाणार नाही

दही, दूध, लोणी, तूप यांचा मुबलक वापर करणाऱ्या या देशात वनस्पतीजन्य हायड्रोजेनेटेड तूप विकणं म्हणजे खरंतर धाडसाचीच गोष्ट, पण सोन्याचा धूर काढणारा हा देश बदलत्या काळात परकीय सत्तेबरोबर अनेक बदलांना सामोरा जात होता. महायुद्धांमधून जगण्यात आलेला कमअस्सलपणा, मंदी ही विविध माध्यमातून समाजात झिरपत होती. अशा काळात अस्सल तुपाकडून कृत्रिम पर्यायाकडे भारतीयांना नेणं फारसं अवघड नव्हतं. १९३० साली डच कंपनी ‘डाडा’ आपलं हे वनस्पतीजन्य तूप विकण्यासाठी भारतात आली. हे हायड्रोजेनेटेड किंवा हायली सॅच्युरेटेड वनस्पती तेल म्हणजे नेमकं काय हे भारतीयांना ठाऊक नव्हतं. घरच्या कढवलेल्या साजूक तुपावर काम भागत होतं. पण प्रसिद्ध ‘लिव्हर ब्रदर्स’ कंपनीला या वनस्पतीजन्य तुपात मार्केट दिसलं. त्यांनी ‘डाडा’ कंपनीकडून नाव तेच राहील या अटीवर तुपाचे हक्क विकत घेतले. पण तरी ‘लिव्हर ब्रदर्स’चा छाप या उत्पादनात दिसला पाहिजे ही खुमखुमी काही जाईना. त्यातून ‘लिव्हर ब्रदर्स’ मधला ‘एल’ या ‘डाडा’च्या मध्ये विराजमान झाला आणि ‘डाडा’चं झालं ‘डालडा’. १९३७ साली ‘डालडा’ने भारतीयांना साद घालायला सुरुवात केली. अस्सल तुपातला शिरा, पुरी आणि तत्सम पदार्थाची रेंगाळणारी चव सोडून डालडाकडे वळणं भारतीयांनी सुरुवातीला नाकारलं. ‘डालडा’समोर तुपासारखंच आपलं उत्पादन आहे हे भारतीयांच्या गळी उतरवण्याचं आव्हान मोठं होतं. ‘डालडा’ची जाहिरात होऊ लागली. त्यात हे तुपासारखं पचायला जड नाही हा मुद्दा ठासून सांगितला गेला. पचायला हलकं आणि खिशालाही परवडणारं तूपसदृश अशी ‘डालडा’ची जाहिरात लोक पाहू लागले. तरी त्यांचा विश्वास बसत नव्हता. मग ‘डालडा’ने शहरात काही ठिकाणी स्टॉल्स लावले. ‘नॉव्हेल्टी’ सिनेमाजवळ हा स्टॉल असायचा त्यात डालडात तळलेले पदार्थ लोकांना खाऊ घातले जायचे. डालडय़ाचा गंध, त्याचा स्पर्श आणि चव या सगळ्या कसोटय़ांवर पारख करण्याची लोकांना मुभा होती. प्रत्यक्ष अनुभवानंतर मात्र लोकांना हा तूप नाही, पण तुपासारखा स्वस्त पर्याय पटू लागला आणि ‘डालडा’चे वापरकत्रे वाढू लागले. ‘लिव्हर ब्रदर्स’नी या तुपाकरता वापरलेले टिन्स, डबे हे खूप महत्त्वाचे ठरले. एकतर हॉटेल किंवा घाऊक वापरासाठी मोठे आणि घरगुती वापरासाठी आवश्यकतेनुसार मिळणारे पॅक हे डालडाचं मोठं वैशिष्ट्य होतं. तो पिवळ्या रंगाचा डबा आणि त्यावरील ताडाचं झाड घराघरांत पसरलं. त्याकाळी क्वचितच एखादं स्वयंपाकघर असेल जिथे हा ‘डालडा’चा डबा पोहचला नसेल. ‘डालडा’ वापरून झाला की त्या डब्याचा तुळशीचं रोप लावण्यापासून टमरेलपर्यंत कसाही उपयोग होत असे. या डब्यांनी ‘डालडा’ची मोठी जाहिरात केली. १९८० पर्यंत ‘डालडा’ची हुकूमत भारतीय बाजारपेठेवर होती. त्यातही मधल्या काळात काही वादळं येऊन गेली. १९५० मध्ये या वनस्पतीजन्य तुपापासून आरोग्यास धोका आहे असा मुद्दा उपस्थित झाला. त्याचा जोर इतका होता की तत्कालीन पंतप्रधानांनी समिती नेमून त्यावर विचार केला. त्याने ‘डालडा’चे फार नुकसान केले नाही तरी शंकेस वाव मिळाला. १९९० मध्ये ‘डालडा’त प्राण्यांची चरबी वापरली जाते असा विवाद निर्माण झाला. त्याचा मोठा धक्का या उत्पादनाला बसला. याच काळात आरोग्यास उपयुक्त अशा रिफाइन्ड तेलाचे पर्याय निर्माण झाले आणि ‘डालडा’ची लोकप्रियता घसरू लागली. २००३ साली ‘हिंदुस्थान लिव्हर’ कंपनीच्या ‘डालडा’चे हक्क अमेरिकन कंपनी ‘बुंगे’ने विकत घेतले. वनस्पतीजन्य तूप आणि डालडा हे समीकरण पुसून काढणे त्यांना अवघड गेले. याच कंपनीने ‘डालडा’ खाद्यतेलं बाजारात आणली. २००७ साली या तेलांची जाहिरात ऌ४२ुंल्लष्टिद्धr(३९)२ ूँ्रूी अशी केली गेली. पण ती क्लिक झाली नाही. २०१३ मध्ये ‘डालडा’ खाद्यतेल पुन्हा नव्याने बाजारात आणले गेले. त्याची टॅगलाइन होती ‘डब्बा खाली पेट फुल’.

आज बाजारात अस्सल तुपासाठी आणि वनस्पतीजन्य तुपासाठीही खूप सारे पर्याय आहेत. त्या तुलनेत ‘डालडा’ हा एक स्वस्त पर्याय म्हणून पाहिला जातो. पूर्वीचा एकहाती सत्तेचा डाव संपला असला तरी ‘डालडा’ हा ब्रँड एका पिढीचं प्रतिनिधित्व नक्कीच करतो. साजूक तुपाची चन न परवडणाऱ्या खिशांना ‘डालडा’ने दिलेला समाधानी पर्याय विसरण्याजोगा निश्चितच नाही. तो किती सुरक्षित, किती आरोग्यदायी हा भाग अलाहिदा ! इतरांच्या घरी येणाऱ्या पक्वान्नांच्या घमघमाटाने अस्वस्थ झालेल्या एखाद्या कुटुंबातील चिल्ल्यापिल्ल्यांना जर त्यांच्या माऊलीने तिच्या ऐपतीनुसार डालडय़ातून तळलेलं काही मायेने वाढलं असेल तर त्या मायेची चव कमअस्सल कशी? खिशात पसे नसतानाही ही खाऊपिऊची हौस पुरी करू द्यायचे काम ‘डालडा’ने सहृदयतेने केले. अनेकांचे सणवार त्याच्या जीवावर पार पडले. तडजोड तर कुणालाच चुकली नाही. जगण्यातल्या अनेक तडजोडींमधली एक समंजस चवदार तडजोड म्हणजे ‘डालडा’.

viva@expressindia.com