जिथे मैलावर भाषा बदलते तिथे खाण्याच्या पद्धतीही बदलतातच आणि मग ‘जसा देश तसा वेश’ या उक्तीप्रमाणे आपल्या खाण्याच्या सवयीही बदलाव्या लागतात. कधी गरज म्हणून तर कधी हौस म्हणून जेव्हा नवे काही बनवण्याची वेळ येते तेव्हा साहजिकच पुस्तके चाळली जातात. हल्ली रेसिपींसाठी टीव्ही किंबहुना त्याहीपेक्षा जास्त यूटय़ूबचा आधार घेतला जात असला. तरी ऑनलाइन तंत्राला अजूनही पुस्तकरूपी ‘अन्नपूर्णे’चा प्रभाव कमी करता आलेला नाही, हे वास्तव आहे.

पूर्वी नवविवाहिता सुगरण असो वा नसो तिच्या हातात मंगला बर्वेचे ‘अन्नपूर्णा’ हमखास दिले जायचे. आजही कित्येक घरांमध्ये ‘अन्नपूर्णा’, ‘रुचिरा’सारखी जीर्ण झालेली पण अजूनही मायेने जपून ठेवलेली पुस्तकं सापडतील. पाककृती शिकण्यासाठी सिद्धहस्त सुगरणींनी लिहिलेली ही पुस्तकेच एके काळी अनेक गृहिणींचा आधार होती. इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा पाककलेच्या पुस्तकांना जास्त मागणी होती. तेव्हा फक्त पुस्तकातलं वाचून, कल्पना करून आपल्याला पाककृती करावी लागत होती. कल्पनाच ती त्यामुळे कधी हे प्रयोग फसतसुद्धा.. आणि त्यातून काही नवीन पदार्थाचा उगमही होत असे. आजीच्या-आईच्या तोंडून हे असे अनेक फसलेले किस्से आपण ऐकलेही असतील. आता मात्र पदार्थ फसायचे चान्सेस कमी झाले आहेत. कारण नुसतं वाचून कल्पना करण्यापेक्षा प्रत्यक्ष व्हिडीओ पाहून पदार्थ बनवले जातात.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ

आता इतर अनेक गोष्टींप्रमाणे पुस्तकांची जागा यूटय़ूब, वेगवेगळ्या फूड ब्लॉग्जने, फूड वेबसाइटने आणि अशाच अनेक टेक्नोसॅव्ही गोष्टींनी घेतली आहे. मात्र म्हणून पाक कृ ती सांगणारी ही पुस्तकेच इतिहासजमा झाली आहेत, असा जर समज असेल तर तो समस्त खाद्यप्रेमींनी खोटा ठरवला आहे.

‘पाककलेची पुस्तकं आजच्या व्हिडीओ, इंटरनेटवरच्या अनेक पर्यायामुळे पाठी पडत जात आहेत, हा समज चुकीचा आहे, असे ‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे अशोक कोठावळे सांगतात. ‘अन्नपूर्णा’, ‘पूर्णब्रह्म’सारख्या पुस्तकांच्या अजूनही वर्षांला तीन आवृत्ती बाजारात येतात आणि या पुस्तकांना वाचकांकडूनसुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळतो आहे. पूर्वापार पुस्तकांसोबत नवीन ‘परफेक्टरेसेपी’, ‘हमखास पाकसिद्धी’ अशी पुस्तकंसुद्धा बाजारात येतायेत. या नवीन पुस्तकांमध्ये नव्याने शिकू पाहणाऱ्याला मिठाच्या योग्य प्रमाणापासून ते प्लेटिंगपर्यंत सगळं एका ठिकाणी सापडतं. आमच्याकडे या पाककलेची पुस्तकं अगदी बारकाईने वाचणारे वाचकसुद्धा आहेत. जे पुस्तकं वाचून त्यातल्या िपट्रिंगच्या, शब्दांच्या चुकाही सांगतात, असे कोठावळे म्हणतात. पाककलेच्या पुस्तकांवरचे हे प्रेम फक्त गावागावांतूनच नाही तर शहरांमध्येही तितकेच आहे, असा ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन भरवणाऱ्या लक्ष्मण राठिवडेकर यांचा अनुभव आहे. ‘अजूनही पाककलेची पुस्तकं लोक आवर्जून घेतात. इंटरनेटवर रेसिपी बघितल्या जात असतील तरीसुद्धा पुस्तक हेच त्यांना उत्तम साधन वाटते. आणि आता काळानुसार या पुस्तकांमध्येही खूप वेगळेपण आणि विविधता पाहायला मिळते. लोकांना सोप्पं जावं म्हणून एकाच पदार्थाच्या उदा. अंडय़ाच्या, पावाच्या, चॉकलेटच्या अनेक रेसिपी असणारी छोटेखानी पुस्तकेही बाजारात येतात. त्यामुळे सवडीने वाचून एखादा पदार्थ करण्यासाठी अजूनही पुस्तकांनाच प्राधान्य दिले जाते, असे निरीक्षण राठिवडेकर यांनी नोंदवले.

आपल्याला नेहमी सोपा मार्ग हवा असतो. म्हणून मग कशाला पुस्तक वाचायचे कष्ट घ्या.. मुलंच नाही तर आई-आजीसुद्धा एखादी डिश करण्यासाठी इंटरनेटवर एखादा व्हिडीओ शोधते. इंटरनेटमुळे अवघड पदार्थही घरच्या घरी बनवणे सोपे वाटू लागले असल्याने तरुण तुर्कासह सगळ्यांचीच पावले इंटरनेटकडे वळली असली तरीही पाककलेच्या पुस्तकांची बाजारपेठ कमी झालेली नाही हे विशेष. त्याची विक्री तुलनेने कमी झाली असली तरी अजूनही मासिकांमध्ये पाककृतींना स्थान आहे, वर्तमानपत्रातून पाककृतींचा कॉलम अजूनही जागा टिकवून आहे. याचं कारण असं की आपण कितीही टेक्नोसॅव्ही झालो तरी मूळ पद्धती विसरता येत नाहीत. अनेकदा आपण रेसिपीचा व्हिडीओ बघूनही त्याचं योग्य प्रमाण किंवा छोटय़ा छोटय़ा गोष्टी आपल्याला समजत नाहीत. अशा वेळी लिखित साहित्याचा आपल्याला मोठा आधार वाटतो. त्यामुळे अनेक नामांकित शेफही आपली पुस्तके बाजारात आणतात. ‘काळानुसार आम्हीही आमच्या प्रकाशनांमध्ये बदल के ले आहेत. परंतु टेक्नोलॉजीचा वापर कितीही केला तरी पूर्वापार चालत आलेल्या पद्धती कधीही नष्ट होत नाही. म्हणूनच अजूनही पाककलेची पुस्तक आम्ही प्रकाशित करतो. आमच्याकडे नवीन पाककलेची पुस्तके लिहिणारे लेखक तसे हातावर मोजण्याइतके येतात. पण आठ ते नऊ वर्षांपासूनचे अनेक जुने लेखक अजूनही नवनवीन पाककलेच्या पुस्तकांसोबत आमच्याकडे येतात. आणि ती पुस्तके व्यवस्थित विकलीही जातात, असे ‘रोहन प्रकाशन’चे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले.

तंत्राचं वारं इथेही शिरलं असल्याने पाककलांवरची अनेक पुस्तकं आज अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाइन साइट्सवरही विक्रीसाठीही आहेत. दुकानातून पुस्तकं, ऑनलाइनवरची पेपरबॅक आवृत्ती अशा अनेक प्रकारे आजही पाककलेवरची ही पुस्तकं गृहप्रवेश करतात. ‘पुस्तकातून बघून केले जाणारे  पदार्थ हे परंपरागत चालत आलेले आहेत. नवीन पिढीसमोर कितीही नवनवीन पर्याय असले तरीसुद्धा अजूनही वाचून रेसिपी बनवण्याचं प्रमाण कुठेही कमी झालेलं नाही. इंटरनेटवरच्या रेसिपीज कित्येकदा सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या नसतात. पण हे पुस्तकांच्या बाबतीत होत नाही. त्यामुळे कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली तरीसुद्धा पाककलेची पुस्तकं  विकत घेतली जाणार, वाचली जाणार, असा विश्वास ‘आयडियल बुक डेपो’च्या मंदार नेरूरकर यांनी व्यक्त केला.

viva@expressindia.com