प्रेमाच्या गोष्टीतली सध्या सगळ्यात इन थिंग म्हणजे डेटिंग अ‍ॅप्स. वू या मॅचमेकिंग अ‍ॅपच्या वतीने दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू शहरांत एक अभ्यास करण्यात आला. या शहरांतील मुली मुलांमध्ये काय शोधतात याचा उलगडा यातून झाला. या शहरांतल्या मुली त्यांच्यासाठी सुटेबल मुलं शोधतात तेव्हा कोणते टॅग जास्त शोधतात यावरून हा अभ्यास केला गेला.

विनोदाची जाण असणारा, उंचापुरा आणि उदारमतवादी मुलगा पार्टनर म्हणून बहुतेक मुलींना हवा आहे. कुठल्या क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करणारा मुलगा हवा, निव्र्यसनी हवा का, नोकरीत जोखीम घेणारा हवा की कायमची नोकरी असणारा हवा, प्रवासाची आवड असणारा हवा की संगीताचा शौकीन, याबाबत या तीन मेट्रो सिटीजमधल्या मुलींची मतं अर्थातच भिन्न आहेत.

in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
BJP leader Suvendu Adhikari (L) with IPS officer Jaspreet Singh (R). (Express)
“पगडी घातली म्हणजे मी खलिस्तानी नाही, माझ्या धर्मावर…”,पोलीस अधिकाऱ्याने भाजपाला सुनावले
Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी

‘आय अ‍ॅम फनी वन’ म्हणणारा आणि कामाबद्दल पॅशनेट असणारा मुलगा दिल्लीच्या ३६ टक्के मुलींना हवाय. बंगळुरूच्या ३१ टक्के मुली समजून घेणारा, त्यांचं ऐकून घेणारा पार्टनर शोधत आहेत, तर मुंबईच्या ३३ टक्के मुली स्वतचे निर्णय न लादणारा पार्टनर हवा असं म्हणताहेत.

मुलांची उंची हादेखील एक महत्त्वाचा फॅक्टर असल्याचं दिसतंय. कारण बंगळुरूच्या ७० टक्के आणि दिल्लीच्या ७६ टक्के मुलींना किमान ५ फूट ८ इंच उंचीचा मुलगा हवा आहे, तर मुंबईच्या मुली किमान ५ फूट ४ इंच उंची तरी हवी यासाठी आग्रही दिसतात.

मुलाच्या नोकरीतील स्थिरतेबाबत मुंबईच्या ३४ टक्के तर बंगळुरूच्या ३१ टक्के मुलींना जोखीम घेणारा मुलगा हवाय. तर याउलट दिल्लीच्या मुली नोकरीत स्थर्य आणि पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या मुलांना पसंती देताना दिसताहेत.

बंगळुरूच्या मुली आयटीईएस, कन्सल्टिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांच्या शोधात असतात, तर मुंबईच्या मुली फायनान्स, कन्सल्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा स्वतचा व्यवसाय करणाऱ्या मुलांना पसंती देतात.

दिल्लीतील ४१ टक्के मुली निव्र्यसनी मुलाच्या शोधात आहेत. बंगळुरूच्या ३३ टक्के मुलींना प्रवासाची आवड असणारा मुलगा हवाय, तर मुंबईच्या ४४ टक्के मुलींना संगीताची आवड असणारा मुलगा हवाय.

viva@expressindia.com