हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

आयुष्यात कठीण प्रसंग आणि जबाबदाऱ्या नेहमीच सांगून येत नाहीत. त्या वादळासारख्या येतात. आपल्याला मुळापासून हलवून त्या कालांतराने निघूनही जातात, पण त्या दरम्यान आपण काय करतो आणि कसे घडतो यातून आपलं आयुष्यच बदलून जातं. एका तरुणालाही असेच नियतीने अजमावून पाहिले खरे.. पण शिक्षणाची कास धरत त्याने दिलेले उत्तर एका उद्योगाचे साम्राज्य निर्माण करून गेले. हा यशस्वी ब्रँड म्हणजे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’.

School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली
Mumbai, fire, Devi Dayal Compound,
मुंबई : रे रोडमधील देवीदयाल कंपाऊंडमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

स्टील, वाहन उद्योग, ट्रॅक्टर्स, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांत भरीव योगदान देणारा हा भारतीय ब्रँड आपल्यासाठी नेहमीच विश्वासार्ह ठरलेला दिसतो. शेतीप्रधान देश अशी ओळख असणाऱ्या या देशाला उत्तम ट्रॅक्टर्स पुरवत सर्वोत्तम ट्रॅक्टर्स बनवणाऱ्या जगभरातील तीन कंपन्यांमध्ये आपलं नाव कोरणारा हा ब्रँड आपली मान उंचावतो. मुंबईतील कांदिवली परिसरातील ‘महिंद्रा’ कंपनीचं प्रवेशद्वार पाहताना नेहमीच कुतूहल वाटायचं. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ का? फक्त ‘महिंद्रा’ का नाही?, हा प्रश्न बालसुलभ असला तरी त्यामागेही छोटीशी कहाणी आहे.

१८९२ मध्ये लुधियाना पंजाब येथे जन्माला आलेल्या जगदीशचंद्र महिंद्रा यांचे वडील अकस्मात वारल्याने फार लहान वयात त्यांच्यावर घराची सारी जबाबदारी आली. घरी लहान लहान भावंडं होती. त्यांची संपूर्ण जबाबदारी जगदीशचंद्र ऊर्फ जेसींवर होती. जेसींनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. आपल्या भावंडांचं शिक्षण तर त्यांनी पूर्ण केलंच शिवाय स्वत:ही अभियांत्रिकीची पदवी घेतली. ‘टाटा स्टील’मध्ये त्यांना नोकरी मिळाली. सिनियर सेल्स मॅनेजर पद त्यांनी उत्तम सांभाळले. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तत्कालीन सरकारने त्यांना ‘स्टील नियंत्रक ’ हे जबाबदारीचे काम दिले. देश स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असताना जेसींच्या दूरदृष्टीला भविष्यातील उद्य्ोगव्यवसायाच्या विस्ताराची कल्पना आली. के वळ देश स्वतंत्र झाल्याने प्रगती होणार नाही तर त्याच्या विकासासाठी उद्योगधंद्यांचा विकास झाला पाहिजे हा विचार करून जेसींनी स्टील उद्योगाला सुरुवात केली. टाटांसारख्या उद्योगसमूहाच्या कामाचा अनुभव त्यांच्याकडे होता. केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेऊन आलेला भाऊ कैलाशचंद्र ऊर्फ के सी महिंद्रा आणि गुलाम मोहम्मद यांना जेसींनी भागीदार करून घेतले. १९४६ मध्ये ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ कंपनीची स्थापना झाली. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. सोबतच पाकिस्तानचीही निर्मिती झाली. गुलाम मोहम्मद यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री झाले. ते गेल्यामुळे ‘महिंद्रा आणि मोहम्मद’ कंपनीची जबाबदारी जेसी आणि केसी महिंद्रा यांच्यावर आली. आणि त्यामुळे कंपनीचे नाव झाले ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनी.

केसी उच्च विद्याविभूषित होते. विविध काळात त्यांनी ‘रिझव्‍‌र्ह बँक’, ‘एअर इंडिया’, ‘हिंदुस्थान स्टील’ अशा कंपन्यांचे डायरेक्टरपद भूषवल्याची नोंद वाचल्यावर त्यावरून त्यांच्या ज्ञानाची कल्पना येते. केसींच्या कार्यकुशलतेचा कंपनीला फायदा झाला आणि कंपनीचा कारभार विस्तारला.

स्टील उद्योगात जम बसवल्यानंतर बदलत्या काळासोबत अन्य उद्योगांकडेही ‘महिंद्रा’ ग्रुपने लक्ष केंद्रित केले. १९४९ मध्ये ‘व्हिलीज’ या कंपनीच्या जीप्स ‘महिंद्रा’च्या माध्यमातून भारतीय रस्त्यांवर धावू लागल्या. १९६३ साली ‘हार्वेस्टर’ या अमेरिकन कंपनीच्या सहयोगाने ‘महिंद्रा’चा ट्रॅक्टर अवतरला आणि ट्रॅक्टर म्हणजे ‘महिंद्रा’ असे समीकरण भारतातील गावोगावी जुळले. हा ट्रॅक्टर शेतक ऱ्यांचा दोस्त बनला. ‘बी-२७५’ हे ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’चे पहिलेच मॉडेल यशस्वी ठरले. वर्षांला ८५,००० ट्रॅक्टर्सची निर्मिती होऊ  लागली. ‘महिंद्रा’चा ट्रॅक्टर भारताच्या सीमा ओलांडून परदेशात पोहोचला. लहानपणी कांदिवली हायवेवरून टेस्ट ड्राइव्हसाठी निघालेले ट्रॅक्टर्स पाहताना खूप मौज वाटायची.

त्यानंतर वाहन उद्योगात जीप, दुचाकी, चारचाकी असा ‘महिंद्रा’चा चढता आलेख राहिला. ‘महिंद्रा’च्या चारचाकी गाडय़ांचं वैशिष्टय़ म्हणजे बऱ्याच गाडय़ांचा शेवट ‘ओ’ या इंग्रजी अक्षराने होतो. ‘स्कॉर्पिओ’, ‘बोलेरो’, ‘वेरिटो’, ‘क्झायलो’ हे याचेच उदाहरण म्हणता येईल.

१९८६ मध्ये महिंद्राचा ‘टेक महिंद्रा’ हा आयटी उपक्रम सुरू झाला. देशातील अग्रगण्य आयटी कंपन्यांमध्ये याचे नाव घेतले जाते. ४०,००० कर्मचाऱ्यांसह ‘महिंद्रा’ कंपनी आज १०० देशांसोबत व्यापार करते. महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्राच्या गाडय़ा यांनी ग्राहकांत विश्वास निर्माण केला आहे. शिक्षणाचं महत्त्व जाणलेल्या जेसींनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा ना उद्य्ोगधंद्यांच्या बाबतीत भारत फार पुढारलेला होता ना आसपासची परिस्थिती फारशी अनुकूल होती. पण जेसी आणि केसी या महिंद्रा बंधूंच्या महत्त्वाकांक्षेने उद्यमशीलतेकडे  जाणाऱ्या भारताला निश्चितच हातभार लावला. ‘महिंद्रा’ची टॅगलाइन आहे, ‘फकरए’.  तीदेखील हेच सांगते की आपल्या उत्कर्षांचा मार्ग आपल्या महत्त्वाकांक्षेनेच सिद्ध होणार आहे. संकटं, जबाबदाऱ्या येणार, पण अशा परिस्थितीशी तडजोड करण्यापेक्षा शिक्षणाच्या साथीने स्वत:चा उदय करता येतो. त्यामुळे उठा. सिद्ध व्हा.

viva@expressindia.com