भूषण गोसावी

हैद्राबाद हे असं इतिहास अभिमानाने मिरवणारं शहर. हैद्राबादी बिर्याणी हा खाद्यपदार्थ म्हणजे या भागाची खास ओळखच. पण, आपल्याला माहिती असलेल्या या बिर्याणीपलीकडेही या भागामध्ये खाण्या-पिण्याच्या बाबतीत प्रचंड चंगळ आहे. काहीही झालं तरीही आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडींशी तडजोड न करणाऱ्या या प्रदेशात आठवडय़ाच्या शेवटी किंवा एरवीसुद्धा बाहेर जाऊन चवीने भरपेट खाण्यावर भर दिला जातो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

भारतामध्ये प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार ज्याप्रमाणे राहणीमान आणि वातावरणात बदल होतो अगदी तसाच बदल त्या ठिकाणच्या खाद्यपदार्थावरही होतो. काही ठिकाणांवर तिथे राहणाऱ्या लोकवस्तीचा, लोकांच्या आवडीनिवडींचाही फार परिणाम पाहायला मिळतो. तर काही शहरांवर इतिहासाची मोठी छाप असते. आणि हा इतिहास त्यांच्या राहण्यापासून खाण्यापर्यंतच्या सगळ्या सवयींमधून दिमाखाने वावरतो. हैदराबाद हे असं इतिहास अभिमानाने मिरवणारं शहर. हैद्राबादी बिर्याणी म्हणजे या भागाची खास ओळखच. पण, बिर्याणीपलीकडेही या भागामध्ये खाण्या-पिण्याच्या बाबतीत प्रचंड चंगळ आहे. काहीही झालं तरीही आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडींशी तडजोड न करणाऱ्या या प्रदेशात आठवडय़ाच्या शेवटी किंवा एरवीसुद्धा बाहेर जाऊन चवीने भरपेट खाण्यावर भर दिला जातो.

शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ या भागात पाहायला मिळत असले तरीही ‘मियाँ सामने बिर्यानी हो तो, शाकाहार को छुएगा कौन..’ असाच काहीसा मिजाज असणारी कट्टर हैदराबादी मंडळी आपली शाही खादाडीची सवय जोपासताना दिसतात. हैदराबाद हे शहर चारमिनारसारख्या अनेक ऐतिहासिक  वास्तू, इथे मिळणारे मोत्यांचे दागिने आणि आणखी बऱ्याच कारणांनी प्रसिद्ध आहे. पण, या शहरातील खाद्यपदार्थाची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यापैकीच एक सुरेख पदार्थ म्हणजे बिर्याणी. हैदराबादी बिर्याणी म्हटल्यावर अनेकांच्याच डोळ्यासमोर शाही बिर्याणीच्या दावतीचं चित्रं उभं राहतं. हैदराबादमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे या लज्जतदार पदार्थाची चव चाखण्यासाठी बरीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. त्यापैकीच काही महत्त्वाची ठिकाणं म्हणजे ‘पॅराडाइस बिर्याणी’. याव्यतिरिक्त बेगमपेठ आणि सिकंदराबाद या ठिकाणीसुद्धा सुरेख बिर्याणीची चव चाखता येते. हैदराबादमध्ये खाण्यापिण्याची चंगळ आहे. इथे ‘पॅराडाइस बिर्याणी’ वगळता ‘कॅफे बहार’, आरटीसी रोडजवळील ‘बावर्ची’ या ठिकाणीही उत्तम बिर्याणीचा समाचार घेता येतो. त्यातही आमची शाखा कुठेही नाही असा खाक्या असल्याने हैदराबादमध्ये पोहोचण्याशिवाय पर्याय नाही. ‘पॅराडाइस बिर्याणी’चं हैदराबादमध्ये एक वेगळंच प्रस्थ आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शाखा असून त्या प्रत्येक ठिकाणी इमारतीच्या मजल्याप्रमाणे बिर्याणीची किंमत वाढत जाते. तीनशे रुपयांपासून सुरू झालेली ही बिर्याणी तुम्ही जर का चौथ्या किंवा पाचव्या मजल्यावर बसून मागवली तर तिची किंमत वाढत जाते. चिकन आणि मटन बिर्याणीचं वर्चस्व असतानाच ‘कॅफे बहार’मध्ये मिळणारी फिश बिर्याणी विसरून चालणारच नाही. मासळीचं फारसं चलन नसतानाही ‘कॅफे बहार’ मात्र चवदार फिश बिर्याणीने खवय्यांना तृप्त करत आहे.

खाण्याच्या बाबतीत कोणतीही विचारणा, चौकशी करायची असली तर इथल्या बऱ्याच दुकानांच्या शाखा नाहीतच. त्यामुळे अस्सल चव चाखण्यासाठी त्या ठिकाणीच तुमची स्वारी न्यावी लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांनी हैदराबादमध्ये राहण्यासाठी आलेल्यांना ही खाद्यसंस्कृती काहीशी नवीन असली तरीही हृदयाच्या फारच जवळची असते. रमजानच्या महिन्यात तर या भागांना विशेष रंगत चढते. इथे रमजानच्या महिन्यात खवय्यांना आणि आचाऱ्यांना कुठून इतकी ताकद येते कोणास ठाऊक.. रमजानच्या महिन्यामध्ये ‘हलीम’ आणि ‘खुबानी का मीठा’ या दोन खाद्यप्रकारांना अनेकांचीच पसंती मिळते. गूळ आणि साखरेच्या पाकात बनलेला हा पदार्थ अनेकांच्याच जिभेवर रेंगाळत राहतो. काही ठिकाणी हा पदार्थ व्हॅनिला आइस्क्रीमच्या साथीने दिला जातो. ‘खुबानी का मीठा’ म्हणजे जर्दाळुपाक किंवा जेलीचं एक वेगळं रूप आहे असं म्हणायला हरकत नाही.

मसालेदार आणि गोडाच्या पदार्थासोबतच हैदराबादमधील नेकलेस रोडवर चटपटीत खाण्याची चंगळही पाहायला मिळते. हा भाग हैदराबादचा मरिन लाइन्सचा भाग म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे कॉलेजियन्सची इथे बरीच गर्दी असते. चाट खाण्यासाठी इथली आणखी एक प्रसिद्ध जागा म्हणजे गोकुल चाट. त्याशिवाय कॅफेचं प्रस्थ पाहिलं तर लाकडी पूर नावाच्या परिसरामध्ये असलेल्या ‘निलोफर कॅफे’मध्ये कधीही बरीच गर्दी पाहायला मिळते. रात्री बारा वाजेपर्यंत हा कॅफे सुरू असतो. त्यामुळे या परिसरातून जाण्याऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या कॅफेला भेट द्यावी. हैदराबादमध्ये नाइट लाइफचं प्रस्थ फारसं नसलं तरीही रात्री खाण्यापिण्यासाठी बरेचजण रस्त्यावर उतरतात. रात्रीच्या वेळी खाण्याचा असाच एक अड्डा म्हणजे युसूफ गुडाचा अंडा डोसा. हा डोसा खाल्ल्याशिवाय अनेकांचा पाय निघत नाही.

हैदराबादमध्ये चायनीज किंवा पंजाबी खाण्याचं फारसं प्रस्थ नाहीये. इथल्या उपाहारगृहांमध्येही अस्सल हैदराबादी चवीचेच पदार्थ खायला मिळतात. बेकरीमध्ये बनलेले पदार्थ खाण्यालाही अनेकांची पसंती मिळते. ‘कराची बेकरी’, ‘अल्फा बेकरी’ या तिथल्या काही प्रसिद्ध बेकऱ्या आहेत. खिशाला न झोंबणारे दर हा हैदराबादमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा विशेष गुण आहे. देशाच्या राजकारणापासून ते अगदी पर्यटकांच्या आवडीच्या ठिकाणापर्यंत आणि खवय्यांच्या चवीपर्यंत सर्वच ठिकाणी हैदराबादचं तसं महत्त्वाचं स्थान आहे. इथलं खाणं, पेहराव, भाषा आणि आपुलकी अनुभवायला तुम्ही कधी जाताय.?

viva@expressindia.com