रोज नित्यनव्याने येणाऱ्या फॅशनमध्ये होणारे बदल हे खरं म्हणजे जुन्यालाच थोडाफार नवा मुलामा देऊन बाजारात आणण्याचा आणि लोकप्रिय करण्याचा प्रकार असतो. थोडक्यात फॅशन म्हणजेसुद्धा एक चक्रच आहे. म्हणूनच आधीच्या काळात फॅशनमध्ये असणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा फॅशनमध्ये येतातच. त्यांपकीच एक म्हणजे चप्पल.

नेहमीचे आपले कपडे, मेकअप , वेगवेगळ्या ज्वेलरी यांच्यासोबत पायतली चप्पलदेखील तेवढीच महत्त्वाची असते. मुलांसाठी फूटवेअरमध्ये जास्त पर्याय नसले तरी मुलींसाठी भरपूर पर्याय असतात. सध्या हिल्सच्या वापराला फाटा देण्याकडे अनेक सेलिब्रिटीजचा कल आहे. जास्तीत जास्त एखादा फॅशन शो किं वा तत्सम कार्यक्रमासाठीच शक्यतोवर हिल्स वापरले जातात. त्यामुळे हिल्सच्या या फॅशनला चांगलीच फाइट देण्यासाठी मस्त मस्त फ्लॅटस् चप्पल बाजारात आल्या आहेत. आणि त्यातूनही फ्लॅटस् चप्पलमध्ये जास्त बोलबाला कोणाचा असेल तर तो कोल्हापुरी चप्पलचा आहे. आधी कोल्हापुरी चप्पल टिपिकल तपकिरी (ब्राऊन) रंगामध्ये पाहायला मिळायची. पण आता या कोल्हापुरी चपलांवरही रंग चढले आहेत. अगदी पिवळ्या, हिरव्या रंगापासून ते काळ्या, जांभळ्या रंगामध्ये या कोल्हापुरी चपला उपलब्ध आहेत. आणि त्यावरती लावलेल्या गोंडय़ांची तर शानच वेगळी आहे. या गोंडय़ामुळे कोल्हापुरी चप्पलला हटके लुक मिळतो.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

कोल्हापुरी चप्पलची खासियत म्हणजे कोणत्याही पारंपरिक  कपडय़ांवर तर त्या छान दिसतातच पण वेस्टर्न आऊटफिटवरही या चपला खुलून दिसतात. एखाद्या जीन्स आणि टॉप किंवा मग वन पीसवर कोल्हापुरी चप्पल नक्की घालून बघा.    तुम्हाला नक्कीच हटके लुक मिळेल. हे झालं कोल्हापुरी चप्पलबद्दल. या चप्पल सध्या सहज आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत, पण घरी असलेल्या जुन्या फ्लॅट चप्पल, बुटांचं काय? कित्येकदा आपण अशा फ्लॅट चप्पल थोडे दिवस वापरतो आणि ठेवून देतो. मात्र याच फ्लॅट चप्पल्सना साधं साहित्य वापरून घरच्या घरी ‘फॅशनेबल’ लुक देण्याचे हे काही नुस्खे..

  • कलर : फॅ ब्रिक कलर वापरून जुन्या कापडाच्या  शूजला किंवा चप्पलला तुम्ही कलर करू शकता. शक्यतो कलर करताना ब्राइट रंगांचा वापर करावा म्हणजे आधीचा रंग दिसून येत नाही. कलर करताना शेडिंगही करू शकता. दोन कॉन्ट्रास्ट कलर वापरून आणखी उठावदार करता येईल. वेगवेगळ्या आकारांचे टसेही आपण त्यावर काढू शकतो.
  • लेस : जुन्या चप्पलवर त्याच्या आकारानुसार लेस वापरून डेकोरेशन करू शकता. चप्पल नाजूक असेल तर बारीक लेस वापरावी, जाड लेस नाजूक चप्पल वर शोभून दिसत नाही. गोल्डन लेस, शाइन करणाऱ्या लेसचा वापर केला तर चप्पलला सहज पारंपरिक लुक मिळू शकतो.
  • गोंडा किंवा पॉम-पॉम्स : गोंडा हा सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहे. कानातले, ड्रेसपासून ते चप्पलपर्यंत हा गोंडा फॅशनची लेव्हल वाढवत आहे. हा गोंडा आपण घरी सहज बनवू शकतो. त्यासाठी फक्त लोकरीच्या दोऱ्याची गरज असते. मिक्स कलरचे, एकाच कलरचे गोंडे आपण घरी बनवून ते चप्पलवर लावता येतील. फक्त चप्पलवरच नाही तर हे कलरफुल गोंडे शूजवरसुद्धा शोभून दिसतात.
  • खडे, मोती, मणी- चप्पलला पूर्णपणे पारंपरिक लुक देण्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या खड्डय़ांचा, वेगवेगळ्या आकारच्या मण्यांचा, मोतीचा वापर करा.

या सगळ्या डेकोरेशनच्या कल्पनांचा वापर करून तुम्ही नक्कीच हिल्सला बायबाय बोलून सुंदर फ्लॅटस् चप्पलना हाय बोलू शकता. चप्पलला सजावट करून हायफंडू बनवण्याचे अनेक व्हिडीओज सहज यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. ते बघून आणि सोबत स्वत:च्या कल्पना लढवत स्वत:च्या ‘फॅ शनेबल’ चप्पल तयार करा.

viva@expressindia.com