‘बघावं तेव्हा मुलांसोबत. जरा जास्तच मॉडर्न मुलगी आहे!’

‘हे काय? जीन्स आणि कुरता घालून देवळात..  ?’

Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

‘भाषा गावठी, तेल लावून वेणी ! गावंढळ कुठची !’

‘ओह! शी डझन्ट नो इंग्लिश..’

‘दररोज वेगवेगळ्या मैत्रिणी याच्या. किती जणींना फिरवणार.. म्हणे ही मॉडर्न लाइफस्टाइल!’

मॉडर्न या संकल्पनेची ही इतकी सारी व्हर्जन्स असतात. मॉडर्न म्हणजे मराठीत आधुनिक.. पण या आधुनिक शब्दाला मॉडर्न शब्दाची धार नाही हेच खरं! कुणी वेस्टर्न पद्धतीचे कपडे घातले तर मॉडर्न ठरतो, तर कुणी मेक-अप केला की मॉडर्न ठरते. कुणी हायफाय इंग्लिश बोलला की मॉडर्न तर कुणाचं एकूण राहणीमानच मॉडर्न. कुणाची भाषा त्याला मॉडर्न ठरवते तर कुणाचे विचार. मॉडर्न म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न सध्या मोठय़ा शहरांत राहणाऱ्या पण मूळच्या छोटय़ा शहरांतून किंवा गावातून आलेल्या काही विद्यार्थ्यांना आणि तरुण प्रोफेशनल्सना विचारला. त्यावर मॉडर्निटीची अनेक व्हर्जन्स समोर आली. या छोटय़ाशा सर्वेक्षणातून तरुण मनांमधली मॉडर्न होण्याची गोष्ट उलगडत गेली.

मूळचा चिपळूणचा आणि सध्या पुण्यात राहणारा इंजिनीयर सौरभ म्हणतो, ‘प्रत्येकाची मॉडर्निटीची व्याख्या वेगळी असते. मॉडर्न असणं ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहे. समोरची व्यक्ती मॉडर्न आहे की नाही हे आपण नुसतं त्या व्यक्तीकडे पाहून ठरवू शकत नाही. तसं ठरवणं अयोग्य आहे.’ मुंबईची अदिती सुखटणकर म्हणते, ‘विचारांनी मॉडर्न होणं आणि बदल स्वीकारणं म्हणजे मॉडर्न होणं. तुमचा पेहराव काळानुसार अप-टू-डेट असला आणि विचार मात्र अंधश्रद्धाळू असतील तर तुम्ही स्वत:ला मॉडर्न म्हणवून घेऊ  शकत नाही.’ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून आलेल्या सरिता थवीच्या मते, आपली भाषा कोणत्या पद्धतीची आहे यावरून आपण मॉडर्न आहोत की नाही हे दिसून येतं. ती म्हणाली की, ‘मी स्वत:ला मॉडर्न म्हणेन. माझ्या गावी बोलली जाणारी कोकणीचा प्रभाव असलेली मराठी भाषा मला पुण्यात आल्यानंतर बदलावी लागली. पुण्यातली भाषा मी आता बऱ्यापैकी शिकले आहे. तरीही माझ्या बोलीभाषेतील काही रूढ झालेले शब्द अजून येतात. मी ते टाळण्याचा प्रयत्न करते.’ पत्रकारितेचं शिक्षण घेणारी साताऱ्याची पल्लवी नराळेला मॉडर्न असणं राहणीमानावरून समजून येतं, असं वाटतं. पल्लवी सांगते, ‘साताऱ्याला असताना मी खूप साधी राहायचे. पुण्यात आल्यानंतर मला इथल्या मुलींचं राहणीमान दिसलं आणि मलादेखील स्वत:मध्ये थोडे बदल करावेसे वाटले. पुण्यात आल्यानंतर मी केस मोकळे सोडायला लागले. मी आता नवीन ट्रेण्डी फ्रेमचा चष्मा लावते. शॉर्ट्स घालते. जीन्सला प्राधान्य देते, कारण ती कम्फर्टेबल वाटते आणि ती स्टायलिश लुकही देते.’

हे झालं राहणीमानाविषयी.. पण आत्मविश्वास हा मॉडर्न असण्याचं मुख्य लक्षण असल्याचं काही मुलींना वाटतं. बार्शीची अमृता पल्लोड आयटी क्षेत्रातला जॉब शोधण्यासाठी पुण्यात आली. तिच्या मते, ‘मी कोणत्याही नवीन गावी सर्वाइव्ह करू शकते म्हणजे मी मॉडर्न आहे.’ प्राध्यापक असलेली नांदेडची वैष्णवी कुलकर्णी सांगते, ‘संस्कृतीची जपणूक करताना तुम्हाला त्यामागची योग्य कारणं माहीत असणं म्हणजे मॉडर्न असल्याचं लक्षण. मी कपाळाला टिकली लावते. बरेच जण त्यामुळे मला जुन्या वळणाची म्हणतात. पण जुन्या वळणाची असल्याने तुमचा मॉडपणा कमी होत नाही. ज्या गोष्टी आपण पाळतो त्या गोष्टींविषयी आत्मविश्वास बाळगणाऱ्याला मी मॉडर्न समजते.’

नाशिकची आर्किटेक्ट माधुरी लाठीला वाटतं की, २१ व्या शतकात ज्या काही नवीन गोष्टींना स्थान आहे, त्यांचा स्वीकार करणं म्हणजे मॉडर्न होणं. ती म्हणते, ‘मी शाळेत आणि ज्युनिअर कॉलेजला होते तोपर्यंत अगदी साधी वेशभूषा करायचे. रोज एक पोनी घालायचे. सीनिअर कॉलेजला आल्यानंतर मात्र माझ्या लांबसडक केसांना एक छान कट दिला. मी माझ्या दिसण्याबाबत जागरूक झालेय.’ मूळची डिग्रज गावची आणि आता मुंबईत एका डेटा मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करणारी अमृता माहुरकर म्हणते, ‘मी शिक्षणासाठी पाच र्वष घराबाहेर राहिले. खर्चासाठी आई-वडील पैसे पाठवायचे तेव्हा स्वत:ची आवड-निवड बाजूला ठेवून सतत बचतीचा विचार करावा लागायचा. आता स्वत: कमावत असल्याने मला हवं ते खरेदी करून मी माझी हौस भागवते. हवे तसे कपडे, एक्ससरिज, चप्पल खरेदी करते. आयुष्याचा मला हवा तसा आनंद मी सध्या घेत आहे. स्वत:च्या हिमतीवर उभं कलेलं हे स्वातंत्र्य मला मॉडर्न बनवतं.’

विचारांनी आधुनिक असणं म्हणजे खरं मॉडर्न असणं असंही काही जणांनी आवर्जून सांगितलं. मुंबईतून बीएमएम करणारा प्रसाद पवार म्हणतो, ‘माझ्या दृष्टीने मॉडर्न होणं म्हणजे केवळ कर्मठ विचारांना तिलांजली देणं आणि पुरोगामित्वाच्या नावाखाली स्वैराचाराला प्रोत्साहन देणं नव्हे. या दोन्हींतील सुवर्णमध्य म्हणजे मॉडर्न होणं.’ पुण्यात मानसशास्त्राचा अभ्यास करणारी हर्षदा खळदकर सांगते, ‘मॉडर्न होणं केवळ विचारांतूनच नव्हे तर दृष्टिकोनातूनही कळायला हवं. मुलामुलींची एकमेकांशी असलेली निखळ आणि निर्मळ मैत्री स्वीकारणं हासुद्धा मॉडर्न होण्याचाच एक भाग आहे.’ वसईची दिव्या राऊत आणखी एक व्याख्या सांगते. ‘प्रश्न विचारून उत्तरं शोधणं म्हणजे मॉडर्न होणं. केवळ कुणी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा प्रश्न विचारून स्वत:ला पटलं तरच करावी, नाही तर त्या प्रथेत बदल करावा. यालाच मॉडर्न होणं म्हणता येईल.’

आपल्या आसपासच्या जगात घडणाऱ्या गोष्टींशी जुळवून घेऊन पुढे चाललो नाही तर आपण काळाच्या मागे पडू, काळाबरोबर स्वत:चा वेग समांतर ठेवत चालत राहणं म्हणजे मॉडर्न होणं. जुन्या पण चांगल्या विचारांची जोपासना आणि नवीन बदलांचा स्वीकार, या दोन्हींचा स्वत:च्या बुद्धीने घातलेला मेळ म्हणजे मॉडर्न होणं, असा विचार करणारेही दिसले. गावातून शहरांत आलेल्या अनेक मुली आधुनिक पद्धतीचे कपडे घालायला लागतात. त्या हा बदल आत्मविश्वासाने करतांना दिसतात किंवा या बदलामुळेच त्यांच्यात आत्मविश्वास आला असल्याचंही आपण म्हणू शकतो. आत्मविश्वासाच्या जोरावर दूरदूर एकटीने प्रवास करणं, नात्यांकडे बघण्याचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन, प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ यांच्यात अंतर ठेवण्याचा प्रयत्न आजच्या मुलीला मॉडर्न बनवतो. पु. ल. देशपांडेंच्या गाजलेल्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात त्यांनी मनाच्या, विचारांच्या आणि आचारांच्या सौंदर्याला गौरवलं आहे. आपल्या मनात आणि मेंदूत असणारी ‘मॉडर्न’ असण्याची संकल्पना जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत कितीही नवीन फॅशनचे कपडे घातले तरीही आपल्या विचारांचं जुनेपण झाकलं जाणार नाही.

amruta-pallod  मी मूळची बार्शीची. आयटी क्षेत्रात नोकरी शोधण्याच्या हेतूने पुण्यात आलेय. माझ्या मते, आत्मविश्वास हे मॉडर्निटीचं मुख्य लक्षण आहे. मी कोणत्याही नवीन गावी सर्वाइव्ह करू शकते म्हणजे मी मॉडर्न आहे. – अमृता पल्लोड

 

शिक्षणासाठी पाच र्वष बाहेर राहिले, तेव्हा आई-वडील पैसे पाठवायचे. आता स्वत कमवायला लागल्यावर कपडे, चपला, अ‍ॅक्सेसरीजची हौस भागवतेय.स्वतच्या हिमतीवर मिळवलेलं हे स्वातंत्र्य मला मॉडर्न बनवतंय. amruta-mahulkar – अमृता माहुरकर

 

 

वेदवती चिपळूणकर, शिवानी खोरगडे