फॅशन ट्रेण्ड कोणते, याची माहिती तर हल्ली अनेक माध्यमांतून आपल्यापर्यंत पोचत असते; पण बडे स्टाइल गुरू सांगतातट्रेण्ड फॉलो करू नका, ट्रेण्ड निर्माण करा.. आंधळेपणाने फॅशन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा स्वत:ची फॅशन शैली निर्माण करण्यासाठी थोडं आऊट ऑफ फॅशनजावं लागतं. त्यासाठीच हे सदर.. तुमची स्वत:ची फॅशन शोधण्याच्या टिप्स देण्यासाठी आणि ट्रेण्डमागचं लॉजिक समजून घेण्यासाठी.

८०च्या दशकातील चित्रपट – ‘बॉनफायर ऑफ व्हॅनिटीज’.. पोस्टरवर सिनेमाची नायिका मेलेनी ग्रिफिथने तोऱ्यात टॉम हँक्सच्या खांद्यावर हात ठेवलाय. मालिका – ‘डायनॅस्टी’.. पोस्टरमध्ये जॉन फोर्सायच्या आजूबाजूला मालिकेतील इतर मुख्य स्त्री-व्यक्तिरेखा ऐटीत बसल्या आहेत. त्यातही उठून दिसतेय जो कॉलिस. सिनेमा, मालिकांच्या पोस्टरवर स्त्री-व्यक्तिरेखा असणं, हे नवीन नाही; पण तरीही या पोस्टर्स आणि त्यावरील नायिकांच्या छबीचा उल्लेख आवर्जून करायला हवा असाच. या नायिकांच्या डोळ्यांत, देहबोलीमध्ये ना मरलीन मन्रोची मादकता होती, ना ऑड्री हेपबर्नचा खटय़ाळ रोमँटिक अंदाज. या नायिकांच्या डोळ्यात गर्व दिसतो सत्ता जिंकल्याचा, माज दिसतो त्यांच्या पदाचा. हा काळ आहे ऐंशीच्या दशकाचा. हातात वॉकमन आणि कानाला हेडफोन लावून जगापासून विभक्त होण्याच्या तरुणाईच्या मानसिकतेची सुरुवात इथूनच झाली. हा काळ ‘डिंक्स’ म्हणजे ‘डबल इन्कम नो किड्ज्स’ जनरेशनचा. करिअरला महत्त्व देत भरपूर पैसा कमवून उंची लाइफस्टाइल जगण्याची धडपड करणाऱ्या जोडप्यांचा. अर्थात झटपट श्रीमंत होण्याची, चैनी आयुष्य जगण्याची हौस केवळ पुरुषांमध्ये नव्हती, स्त्रियासुद्धा या शर्यतीत त्यांना टक्कर देत होत्या. केवळ गरज म्हणून एखादी छोटी नोकरी करण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सक्षम करिअर करण्यासाठी धडपड याच काळात सुरू झाली. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या पलीकडे राजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र सगळीकडेच स्त्रियांचं वर्चस्व जाणवू लागलं होतं. तेव्हाच्या फॅशनमध्ये तो डॉमिनन्स नक्कीच दिसला. पॉवर ड्रेसिंग ऐन फॉर्मात होतं त्या काळात. आज तीच ८०च्या दशकातली फॅशन रेट्रो फॅशन म्हणून पुन्हा येतेय.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
sai tamhankar will next seen in the farhan akhtar dabba cartel
सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळकणार, पहिली झलक आली समोर
man made three different dishes in one vessel at one time video is going viral
VIDEO : गृहिणींनो ‘ही’ पाहा झटपट स्वयंपाकाची सोप्पी ट्रिक; एकाच कुकरमध्ये १० मिनिटांत वरण, भात, भाजी शिजून तयार
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…

मागच्या वर्षांचा लेखाजोखा मांडला तर ते वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांनी गाजवलं हे लक्षात येईल. त्याच वेळी २०१७च्या ट्रेण्ड अलर्टमध्ये ऐंशीच्या दशकातली फॅशन पुन्हा येणार आहे, हे प्रामुख्याने सांगितलं जातंय. आता या दोन काळांतील समान दुवा तुम्हाला लक्षात येईल. दुसरं महायुद्ध, त्यानंतरचा मंदीचा काळ हे सरल्यावर नंतर अचानक आलेली सुबत्ता आणि ऐषोआराम आणि त्यातून नशाबाजीमध्ये वाहवत गेलेली पिढी या सगळ्यांना पार करून ऐंशीच्या दशकातली पिढी कुठे तरी स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात होती. त्यांच्या प्रयत्नांना जोड मिळत होती, नव्या तंत्रज्ञानाची. या पिढीवर मागच्या पिढीच्या अपेक्षांचं ओझं नव्हतं, हल्ली म्हणतात ना, ‘नो स्ट्रिंग्स अटॅच्ड’ तसंच काहीसं. दिवसभर जीव तोडून काम करायचं आणि रात्री तितक्याच जोशात पार्टी करायची. तेच तत्त्वज्ञान आज आपण पाळतोय.

आजच्या भाषेत ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’. त्यामुळे त्यांच्या वागणुकीत जबाबदारीसोबतच एकप्रकारचा बेछुटपणा होता. हातात पैसा खेळत असल्याने तोरा होता. या सगळ्याच एकत्रित मिश्रण त्यांच्या कपडय़ांमधून, मेकअपमधून उतरलं. मुख्यत्वे स्त्रियांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरला. मार्गरेट थॅचर, प्रिन्सेस डायना, मॅडोना, जो कॉलिस अशा विविध क्षेत्रांतील स्त्रियांनी हा काळ गाजवला.

फॅशनविश्वातसुद्धा याचे पडसाद उमटले. एकीकडे मार्गारेट थेचर, प्रिन्सेस डायना यांच्यामुळे पॉवर ड्रेसिंगची संकल्पना रुजू होत होती. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पुरुष सहकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांना शोल्डर पॅड लावलेले सूट्स आकर्षित करू लागले होते. निळा, पांढरा, काळा, नेव्ही, हिरवा, लाल असे नजरेत भरणारे रंग या सूट्समध्ये होते. डिझायनर इव्ह साँ लोराँच्या कलेक्शनच्या फोटोमध्ये काळा सूट, खिशात हात आणि ऐटीत सिगारेट ओढणारी तरुणी ही ऐंशीच्या दशकाची प्रातिनिधिक छबी होती. तर दुसऱ्या बाजूला आपल्या मनातील बंड संगीतातून व्यक्त करणारी पॉप सिंगर मडोना तरुणाईला आकर्षित करत होती. अजब अवतारामध्ये पार्टीजमध्ये येणारा बॉब जॉर्ज हा पॉप आयकॉन झालेला. कोणाच्या बापालाही न घाबरता, स्वत:च्या मनाला वाटेल ते करणाऱ्या तरुणांचं प्रतिनिधित्व कॅथरीन हॅम्नेट, विवियन वेस्टवूड या डिझायनर्सनी केलं. राजकीय, सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य करत स्लोगन टीशर्ट्स काढायची सुरुवात कॅथरीनने केली, आणि बिकिनीपासून न्यूड्सपर्यंत समाजाला टॅबू असलेल्या प्रत्येक गोष्टीला रॅम्पवर जागा मिळवून दिली. रंगविलेले, कलर्स करून मोकळे सोडलेले केस, भडक मेकअप, रिप ऑफ (फाडलेले) टीशर्ट्स, जीन्स, बायकर्स जॅकेट्स, हिप्पी स्कर्ट्स, गॉथिक ज्युलरी असा एकूणच या तरुणांचा लुक असे. जेन फोंडा या फिटनेस आणि टीव्ही स्टारने जीमवेअर, लायक्रा पँट, लेग वॉर्मर्ससुद्धा या काळात लोकप्रिय केले. काळाचा संदर्भ सोडला, तर या सगळ्या घटना कुठे तरी आजसुद्धा आपल्याशा वाटतील. तो काळ तरुणाईचा होता, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेचा, अगदी आजच्यासारखा. त्यामुळे इतर सामाजिक घटनांप्रमाणे कपडय़ांवरही याचं प्रतिबिंब उतरणं साहजिक आहेच. आज या ट्रेण्डमध्ये काही बदल झालेत नक्की, पण त्यांचा एकूण आत्मा तोच आहे. म्हणूनच रेट्रो फॅशनचा ट्रेण्ड आहे हे म्हणताना ही पाश्र्वभूमी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता ही फॅशन जशीच्या तशी फॉलो करून उपयोग नाही.

रेट्रो लुक कॅज्युअल आणि फॉर्मलसाठी कसा कॅरी कराल?

  • पॉवर ड्रेसिंग हे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पसंत केलं जातं. शोल्डर पॅडेड शर्ट्स, सूट्स हे याचं वैशिष्टय़ पण यातही एकच सूट घेण्याऐवजी ब्लेझर, शर्ट आणि ट्राऊझर वेगवेगळी घ्या. म्हणजे दर वेळी लुकमध्ये वेगळेपणा आणता येईल.
  • स्ट्राइप्स पँट किंवा पेन्सिल स्कर्टसोबत आकाशी किंवा व्हाइट शर्ट आणि ब्लेझर असं कॉम्बिनेशन करू शकता. नेहमीच्या सूटऐवजी ओव्हरकोट वापरून बघा.
  • शर्ट्समध्येही वेगळेपणा आणता येईल. बलून स्लिव्हचा पेस्टल शेड शर्ट, व्हिक्टोरियन स्टाइल शर्ट नक्कीच वापरू शकता.
  • मेसी हेअरबन आणि रिप ऑफ डेनिम लुक ऐंशीच्या पॉप कल्चरला साजेसा आहे. डेनिम ओव्हरसाइज शर्ट आणि जीन्स किंवा स्कर्टसोबत जंक ज्युलरी कॅरी करू शकता.
  • स्लोगन टी-शर्ट्स, पेन्सिल किंवा टय़ुल स्कर्टसोबत कॉन्ट्रास्ट कलर परफेक्ट आहेत.
  • ब्राइट रंगाची केप्री, स्ट्राइप्ड टी-शर्ट आणि ओव्हरसाइज जॅकेट किंवा मॅक्सी ड्रेस – जॅकेट असा हटके लुक कॉलेजला कॅरी करू शकता. अँकल लेंथ स्कर्टसोबत स्टॉकिंग किंवा स्ट्रेच लेगिंगसुद्धा छान पर्याय ठरेल.

viva@expressindia.com