दररोज आभाळात नवी भरारी घेण्याचं काम करणाऱ्या कॅप्टन अदिती परांजपे यांच्याकडून वैमानिक होऊ इच्छिणाऱ्या अनेक जणींना प्रेरणा मिळाली. हे ध्येय वाटतं तितकं अवघड नाही, हा विश्वास देतानाच अदिती यांनी या क्षेत्रात प्रवेशाची आव्हानंही समजावून सांगितली. करिअर घडवण्याच्या उंबरठय़ावर असणाऱ्या अनेकींनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. त्यांपैकी काहींचे मनोगत..

4अक्षता लोखंडे
कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर जिद्द आणि मेहनत खूप महत्त्वाची असते हे कॅप्टन आदितीकडे बघून समजलं. तिच्यामुळे इन्स्पिरेशन मिळालं. एका अगदी अपरिचित क्षेत्राची ओळख करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’चे मनापासून आभार.

pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Police suspended Wardha
वर्धा : ‘ते’ दोन पोलीस अंमलदार अखेर निलंबित, मद्यधुंद अवस्थेत कार चालवत…
mumbai mcdonald marathi news, all food and license holder foundation marathi news
मुंबई : मॅकडोनाल्डविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

5अवनी डोणगावकर
वैमानिकाचं काम, निर्णयक्षमता याचं महत्त्व अदिती परांजपे यांच्या बोलण्यातून प्रकर्षांनं जाणवलंय. एक पायलट असूनही आदितीची असलेली डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी खूपच भावली. वैमानिकाची लाइफस्टाइल समजली आणि आणि खूप शंकांचं निरसन झालं. छान असा अनुभव होता.

 

6सृष्टी नाईक
मी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. मला पायलट व्हायचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं, कशी मेहनत घ्यायला पाहिजे, आणि काय प्रकारचं शिक्षण आवश्यक आहे त्याबद्दल माहिती मिळाली. मी नक्कीच आदितीने सांगितल्याप्रमाणे फिटनेस टेस्ट करून घेईन. एक सुंदर अनुभव मिळाला.

 

7अदिती देसाई
मलाही लहानपणापासून पायलट होण्याची इच्छा होती; परंतु काही कारणामुळे ती इच्छा अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. माझ्या आईला मी पायलट व्हावं असं नेहमी वाटतं. आजच्या कार्यक्रमामुळे नक्कीच माझ्या इच्छेला एक सेकंड थॉट देण्याचा माझा विचार आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर राहू शकतात हे अदितीकडे बघून समजलं. खूपच छान अनुभव होता.

8सिद्धिका गाढवे
मला मोठं होऊन एअरोनॉटिकल इंजिनीयर व्हायचं आहे. मला एव्हिएशनच्या क्षेत्राविषयी बरीच माहिती आजच्या कार्यक्रमातून मिळाली. क्षेत्र वेगळं असेल तरीही मेहनत केल्यावर काहीही शक्य आहे हे अदितीकडे बघून समजल. कॅप्टन आदितीनं खूप रंजकपणे आणि साधेपणाने बरीच माहिती दिली.

9प्रज्ञा गांधी
पायलट होण्याचं माझं स्वप्न आहे. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न मला पडले होते. त्या सगळ्याची उत्तरं मला आज मिळाली. एक नवा कॉन्फिडन्स मिळाला. जिद्द असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर आपण काहीही करू हाकतो हे अदितीकडे बघून समजलं. माझ्यासाठी ती इन्स्पिरेश बनली आहे. आजच्या कार्यक्रमाचा मला पुढील आयुष्यात खूप फायदा होणार आहे.

 

10कनिष्का गंद्रे
आजचा कार्यक्रम मला खूप आवडला. विमान, वैमानिक याबद्दल नेहमीच आपल्याला काही ना काही प्रश्न असतात. वैमानिकाच्या जॉबविषयी मला प्रचंड उत्सुकता होती. मनातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कॅप्टन अदिती यांच्या संवादातून मिळाली. अतिशय वेगळ्या विषयाची माहिती मिळाली. आदितीच्या कामाबरोबरीनेच तिचं मनमोकळं बोलणं अतिशय भावलं.

11पूजा रेणके
मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. आता करिअर प्लॅनिंगचा क्रुशल निर्णय आहे. आपण आपल्या ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा याचं एक अतिशय चांगलं उदाहरण कॅप्टन अदितीच्या माध्यमातून आम्हाला दिसून आलं. तिच्यामुळे नक्कीच इन्स्पिरेशन मिळालं. खूप वेगळ्या विषयाची माहिती अदिती यांनी सोपी करून सांगितली.

 

(शब्दांकन आणि छायाचित्रे : प्राची परांजपे)