हल्ली प्रत्येक जण आपल्याला हटके काय मिळेल किंवा सगळ्यांपेक्षा युनिक काय दिसेल याच्या शोधात असतो. दागिन्यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्रात नववधू पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांना प्राधान्य देताना दिसते. प्रत्यक्ष लग्नविधीसाठी असेच दागिने पारंपरिक साडीवर शोभून दिसतात. मात्र लग्नानिमित्त होणाऱ्या रिसेप्शन, पार्टी, हळद, मेहंदी, संगीत अशा समारंभांसाठी मात्र मराठी मुली आवर्जून काही तरी वेगळे, उठून दिसणारे दागिने निवडू लागल्या आहेत. अनेक छोटय़ा-मोठय़ा डिझायनर्सनी ऑनलाइन सेवा सुरू केल्यामुळे डिझायनर दागिने खास तुमच्या आवडीने तुम्ही निवडू शकता आणि ते बजेटमध्येही बसू शकतात. सध्या बाजारात खूप वेगवगेळ्या प्रकारच्या दागिन्यांची रेलचल आहे. नवरीला लग्नात घालण्यासाठी युनिक दागिने कुठे मिळतील आणि नवरीच्या जवळच्या मैत्रिणी आणि बहिणींसाठी दागिन्यांत काय काय नवीन प्रकार उपलब्ध आहेत त्याविषयी आजचा हा लेख.

अनेकदा आपण टीव्हीवर किंवा फॅशन शोमध्ये वेगवेगळे दागिने बघत असतो, पण लग्नाच्या वेळी मात्र सोन्याचे पारंपरिक दागिने घेतो. खरं तर कधी कधी अस्सल सोन्याच्या दागिन्यांपेक्षा जास्त उठाव अशा डिझायनर किंवा इमिटेशन ज्वेलरीला असतो.  त्यामुळे पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांसोबतच रिसेप्शनादी कार्यक्रमांसाठी असे डिझायर दागिने घ्यायला हरकत नाही.  अनेक नवीन ज्वेलरी डिझायनर लिमिटेड एडिशन कलेक्शन्स सादर करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला हवा तसा युनिक – खास तुमच्यासाठी बनवलेला दागिना घेण्यासाठी थोडा ऑनलाइन सर्च करायला हरकत नाही. मराठी पारंपरिक दागिन्यांसोबतच दाक्षिणात्य धाटणीचे, उत्तर भारतीय ढाच्याचे पारंपरिक दागिने तुमच्या नववधूच्या रूपाला नक्कीच वेगळेपणा देतील.

डिझायनर दिव्या नांबियार आणि त्यांच्या टीमने लग्नसराईसाठी ‘संस्कार कलेक्शन’ लाँच केलं आहे. एकसारखे दोन दागिने त्यांनी क्वचितच निर्माण केल्यामुले नवऱ्यामुलीला हवा तसा युनिकनेस मिळू शकतो. याबाबतीत डिझायनर दिव्या म्हणतात, ‘आपली भारतीय परंपरा, अभिजात संस्कृती तसंच काही दक्षिण भारतीय मंदिरांवरील कलाकुसर या सगळ्यातून प्रेरणा घेऊन आम्ही संस्कारा कलेक्शन तयार केलं आहे. कलाकुसरीसाठी  २२ कॅरेट सोन्याचा मुलामा दागिन्यांना चढवला गेला आहे. निळ्या आणि लाल रंगाचे प्रेशियस स्टोन्स, रोझ क्वार्ट्झ म्हणजेच गुलाबी रंगाचा स्फटिक, मोती या रत्नांच्या सेमी प्रेशियस फॉम्र्सचा वापर आमच्या कलेक्शनमध्ये केला गेला आहे. कलेक्शनची थीम मोर आणि गणपती यांवर आधारित आहे. हे कलेक्शन आमची लिमिटेड एडिशन आहे. अगदी ९९० रुपयांपासून ते १०,२०० रुपयांपर्यंत दागिने उपलब्ध आहेत’ लाइटवेट, कलरफुल आणि नेत्रदीपक भासेल अशी ही ज्युलरी लग्नात नवरी आणि करवल्यांसाठी खूपच मस्त पर्याय आहे. http://unniyarcha.com/product-category/luxury/samskaara-collection/  या साइटवर तुम्ही संस्कारा कलेक्शन ऑर्डर करू शकता. अनेक पारंपरिक सराफांनी लग्नसराईनिमित्त त्यांचे खास कलेक्शन बाजारात आणले आहे. मराठी पारंपरिक दागिन्यांसोबतच उत्तर भारतीय धाटणीचे दागिने या वेळी अधिक दिसतात. मनुभाई ज्वेलर्सनी खास मुघलकालीन दागिन्यांची डिझाइन्स लाँच केली आहेत. जडाऊ नेकपीससाठी हे कलेक्शन अनेक पर्याय देते. गळ्याभोवती भरगच्च दिसणारे चोकर अनेक डिझाइन्समध्ये दिसतात. २२ कॅरेट सोन्याचा मुलामा आणि सेमी प्रेशियस स्टोन्स वापरून जडाऊ  दागिने डिझाइन केले आहेत. शाही हार, चोकर्स, कफ्स, इअरिंग्स यांचा समावेश त्यात आहे.

नवरीसोबतच लग्नसमारंभाची तयारी जोरदार सुरू असते करवल्यांची. जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या लग्नासाठी खास वेगळे दागिने हल्ली आवर्जून खरेदी केले जातात. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांपेक्षा इमिटेड ज्युलरी किंवा सिल्वर, फोम ज्युलरीला प्राधान्य दिलं जातं. आत्मन इंडिया या ऑनलाइन ज्युलरी शॉपिंग पोर्टल वर खास ‘करवली कलेक्शन’ या महिन्याअखेपर्यंत लाँच करणार आहे. या वेबपोर्टलच्या प्रमुख अस्मिता जावडेकर म्हणाल्या, ‘लग्नांमध्ये नवरीच्या दागिन्यांचे बरेच पर्याय सगळीकडेच उपलब्ध असतात. त्यामुळे यंदा आम्ही खास करवल्यांसाठी कलेक्शन लाँच करत आहोत. नवरीच्या दागिन्यांच्या तुलनेत हे कलेक्शन नाजूकसाजूक आणि लाइटवेट आहे. इयररिंग्स, नेकलेस, बांगडय़ा, पैंजण यांचा त्यात समावेश आहे. ९०० रुपये ते ५००० रुपयांपर्यंत करवली कलेक्शन उपलब्ध आहे’. आत्मनच्या पोर्टलवर नववधूसाठीच्या कलेक्शनमध्ये कंबरपट्टय़ांची वेगवेगळी सुंदर डिझाइन्स दिसतात. तसेच मुंडावळ्यांचे कलेक्शनही त्यांनी आणले आहे.  https://www.aatmanindia.com/ या साइटवर ते बघता येईल.

नववधूंसाठी टिप्स

  • सोन्याव्यतिरिक्त वेगळे दागिने नक्की ट्राय करून बघा.
  • तुम्हाला कितपत जड दागिने सहन होतात त्याचा अंदाज घेऊनच दागिने घाला.
  • रॅम्पवर किंवा शोकेसमध्ये दागिने खूप सुंदर दिसतात ते आपण घातले की, कधी कधी खूप मोठे किंवा भरभक्कम दिसतात असं वाटतं, त्यांचं योग्य लेयरिंग केलं गेलं तर तेच दागिने फार सुंदर दिसतील त्यामुळे दागिन्यांचं लेअरिंग अवश्य ट्राय करा.
  • कधी कधी अति दागिने घातल्याने थकवा येऊ शकतो, ते दिसायलाही फार क्लासी वाटत नाही. त्यामुळे प्रमाणातच दागिने असू द्यावेत. दागिन्यांचं वजनही जास्त होणार नाही आणि प्रत्येक दागिना उठून दिसेल.
  • दागिने सोन्याचे घालणार असाल तरीही लेअरिंग करूनच ते घाला. ठुशी, त्याहून मोठं गळ्यातलं, शाही हार अशा पद्धतीचा क्रम असू द्यावा. मंगळसूत्रसुद्धा लेअरिंगमध्येच समाविष्ट करावं. जेणेकरून फोटो काढताना प्रत्येक दागिना वेगळा असा उठून दिसेल.

करवल्या आणि मैत्रिणींसाठी..

  • आपला आऊटफिट कसा आहे, त्याला साजेसेच दागिने घालावेत.
  • भरपूर भरतकाम असलेला ड्रेस किंवा हेवी साडी असेल तर कमीतकमी दागिने वापरा.
  • मोठे झुमके, कुंदन वर्कचे इयररिंग्स घातलेत तर नेकलेस घालणं टाळा किंवा एखादा नाजूक नेकलेस घाला.
  • सध्या चेन, नोज रिंगचा ट्रेण्ड इन आहे. त्या नक्कीच वापरून बघा. हे घातल्यास कानातल्यांऐवजी नेकलेस घालण्याला प्राधान्य द्या.
  • हेवी डिझायनर दुपट्टा घेणार असाल तर शक्यतो नेकलेस घालू नका. दुपट्टाच नेकलेसचं काम करेल. मात्र त्यासाठी दुपट्टा छान सेट करा.
  • कधी कधी मॅचिंगपेक्षा कॉन्ट्रास्ट रंगसंगती खूप सुंदर दिसते दागिने घेताना त्याचा विचार जरूर करा.
  • आपल्या चेहऱ्याला शोभून दिसेल तेवढय़ाच आकाराचे दागिने घाला.