आपल्याकडे आयफोन असावा असे अनेकांना वाटत असते. स्टेटस सिम्ब़ॉल म्हणून ओळखला जाणारा हा फोन मागील काही दिवसात भारतीयांच्या काहीशा आवाक्यातही आला आहे. मात्र यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे असे जवळपसा१० देश आहेत ज्याठिकाणी भारतापेक्षाही कमी किंमतीत आयफोन ७ उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर या पर्यायांचा नक्की विचार करा…

आता भारतात आणि इतर देशांच्या किंमतीत इतका फरक का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आयात कर आणि इतर गोष्टी यामध्ये समाविष्ट असल्याने हा फरक पडण्याची शक्यता आहे. मात्र भारतातील किंमतीपेक्षा या किंमती बऱ्याच कमी आहेत हे नक्की. या कमी किंमतीमुळे तुम्हाला आपली आयफोनची क्रेझ नक्कीच पूर्ण करता येईल.

जगभरातील मोबाईलच्या किंमतींची चौकशी केल्यावर ही गोष्ट लक्षात आली असून डॉईश बॅंकेने केलेल्या अहवालानुसार हा निष्कर्ष देण्यात आला आहे. चीनमध्ये हा फोन ८९९ डॉलरला उपलब्ध असल्याचे बॅंकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. तर लंडनमध्ये हा फोन ८९८ डॉलरला उपलब्ध आहे. स्वित्झर्लंडमध्ये या फोनची किंमत ८८६ असून ही किंमत अमेरिंकेपेक्षा ९ टक्क्यांनी जास्त आहे. फिलिपिन्समध्ये आयफोन ७ ची किंमत ८८५ डॉलर इतकी आहे.

सिंगापूरमध्ये हाच आयफोन ८७४ डॉलरला असून कॅनडामध्ये याची किंमत डॉलर ८५५ इतकी आहे. मलेशियामध्ये ही किंमत आणखी कमी झाली असून ती ८४६ डॉलरपर्यंत खाली गेली आहे. हीच किंमत हॉंगकॉंगमध्ये ८२१ डॉलर आहे. जपान आणि अमेरिका या देशांमध्ये तर याच आयफोनची किंमत सर्वात कमी म्हणजे ८१५ डॉलर आहे. त्यामुळे जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर या देशांमधून येणाऱ्या तुमच्या नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीणींना आणायला सांगू शकता.