इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपला तुफान प्रसिद्धी तरूण वर्गात मिळत आहे. बॉलिवूड, हॉलिवूड स्टारपासून सगळेच इन्स्टाग्राम वापरतात. इतकंच नाही तर या अॅपच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात देखील करायला सुरूवात केलीय. असं हे प्रसिद्ध अॅप नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. ‘फेव्हरेट’ असं या फिचरचं नाव असू शकतं. या फिचरच्या माध्यमातून युजर्स आपले फोटो फक्त आणि फक्त खास व्यक्तींसोबत शेअर करू शकतील. अनेकदा इन्स्टाग्रामच्या अकाऊंटची सेटींग ही ‘पब्लिक’ असल्याने त्या व्यक्तीला फॉलो करणारी कोणतीही व्यक्ती ते फोटो पाहू शकते किंवा डाऊनलोड करू शकते. पण या फिचरच्या मदतीने युजर्स एखादा फोटो त्यांच्या यादीतल्या काही निवडक मित्र मैत्रिणींसोबत शेअर करू शकतात. जेणेकरून यादीतल्या इतर व्यक्तींना हे फोटो दिसणार नाहीत.

या फोटोंची वेगळी टॅबही इन्स्टाग्रामवर तयार होणार आहे. या फेव्हरेटच्या यादीत युजर्स किती लोकांना अॅड करू शकतात हे मात्र अद्याप समजलं नाही, पण ही यादी तीसच्या आसपास असू शकते असं म्हटलं जातंय. युजर्स आपल्या आवडीप्रमाणे मित्र मैत्रिणींना आपल्या यादीत जोडू किंवा कमी करू शकतात. अर्थात जर एखाद्याला तुम्ही यादीतून बाहेर काढलं तर त्या व्यक्तीला ते समजणार नाही, तेव्हा या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहू शकता. हे फिचर लवकर इन्स्टाग्रामवर अपडेट होणार आहे. त्यामुळे युजर्सला त्यांची प्रायव्हसी मिळणार आहे.

Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…