वनौषधींमध्ये आढळलेल्या काही संयुगांमुळे वनौषधींचा अर्क अल्झायमरवरील उपचारांसाठी लाभदायक असल्याचे जपानमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. वनौषधींमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

अल्झायमरवरील उपचारांसाठी सक्रिय संयुगांचा शोध घेणाऱ्या संशोधकांना ड्रायनारिया ऱ्हिझोम या वनौषधीमध्ये ही संयुगे आढळली आहेत. ड्रायनारिया ही पारंपरिक वनौषधी आफ्रिका, दक्षिण आशिया, पूर्व आशिया, ईशान्य आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांत आढळते.

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
five different political parties application to mumbai municipal corporation for shivaji park ground
‘शिवाजी पार्क’वर सभांचा धुरळा; मैदानासाठी पाच पक्षांचे महापालिकेकडे अर्ज
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

संशोधकांनी या प्रयोगासाठी काही उंदरांची निवड केली. त्यांना अल्झायमर आजाराची वैशिष्टय़े असलेली लस टोचण्यात आली. त्यामुळे स्मरणशक्ती घटते, मेंदूत ठरावीक प्रथिने वाढतात. अल्झायमरवर प्रभावी ठरणारी निश्चित संयुगे शोधण्याचा आमचा प्रयत्न होता, असे टोयामा विद्यापीठातील संशोधक चिचिरो तोहडा यांनी सांगितले.

उंदरावर ड्रायनारिया या वनौषधीचा प्रयोग केल्यानंतर मेंदूवर परिणाम करून स्मरणशक्ती घटविणाऱ्या घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे संशोधकांना आढळले. या वनौषधीमधील नारिंगेनिन आणि नारिंगेनिन मेटॅबॉलिटेस ही संयुगे मेंदूतील स्मरणशक्ती वाढविण्यासाठी कार्यरत असल्याचे संशोधकांना आढळून आले. हे संशोधन अल्झायमरवरील पुढील टप्प्यातील संशोधनासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. नव्या औषधांच्या निर्मितीसाठीही या वनौषधींचा फायदा होईल का या दृष्टीने संशोधन सुरू आहे.