ज्या बालकांना अस्थम्याचा त्रास होतो अशी बालके पुढे जाऊन लठ्ठ होण्याचा धोका अधिक असतो, असा अभ्यास नुकताच समोर आला आहे. तसेच ‘इनहेलर’ वापरल्यामुळे हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अस्थमाचा झटका आला तर इनहेलर्स वापरणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाचा धोका ४३ टक्क्यांनी कमी होतो. अस्थम्याचे निदान आणि उपाय लवकर झाल्यास लठ्ठपणाचा धोका कमी होतो. अस्थमा आणि लठ्ठपणा शरीरासाठी घातक ठरू शकतात; कारण त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो आणि त्याचे वर्तुळ तयार होते. तसेच हा लठ्ठपणा शरीराची अधिक हालचाल असली तरी आणि आणखी काही उपचार चालू असतील तरीही येऊ शकतो. ज्या अस्थमा रुग्ण असलेल्या मुलांवर संशोधन केले गेले त्यापैकी मोठय़ा प्रमाणात मुले लठ्ठ झाल्याचे सर्वेक्षण समोर आले. १० वर्षांनंतर त्यांच्यात हे बदल झाले होते. या लठ्ठपणामागचे मूळ कारण हे वायुप्रदूषण असल्याचेही समोर आले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)