ओट्स डाएटमध्ये असावे, घाईच्या वेळेला अतिशय आरोग्यदायी आणि पोटभरीचा असा हा पदार्थ आहे असे म्हटले जाते. मात्र हे आपल्या देशात पिकणारे अन्न नाही, त्यामधून किती पौष्टीक घटक मिळणार असे प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतात.  घाईच्या वेळेला घराबाहेर पडताना सोबत न्यायला अतिशय पौष्टीक असणारा हा पदार्थ सोयीस्कर होऊ शकतो.

शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक ओट्समधून अगदी सहज मिळतात. हे केवळ सुपर फूडच नाही तर विविध चविष्ट पदार्थ बनविण्यासाठीही ओट्स अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही ओटसच्या सेवनाने करु शकता. ओट्समध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्सही मिसळू शकता. त्यामुळे आहारतज्ज्ञांकडून कायमच ओट्सला प्राधान्य दिले जाते.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

आता या ओट्सचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूया…

१. आरोग्यासाठी पौष्टीक

ओट्समध्ये योग्य प्रमाणात फायबर, खनिजे, प्रथिने आणि फॅटस असतात. त्यामुळे आहारात ओटमीलचा समावेश अतिशय फायदेशीर ठरु शकतो. ओट्समध्ये असणाऱ्या अॅंटीऑक्सिडंटसमुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

२. अॅंटीऑक्सिडंटसचे काम करतात

ओट्समध्ये अॅंटीऑक्सिडंटस असतात त्याचा वाढलेला रक्तदाब कमी होण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय रक्ताभिसरणक्रिया सुधारण्यासाठीही ओट्स उपयुक्त ठरतात. याशिवाय ओट्समध्ये इतरही अनेक उत्तम गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी उपयुक्त असते.

३. कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी होतो

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास ओट्सचा उपयोग होतो. याचा हृदयाशी निगडीत विविध आजारांमध्येही तितकाच उपयोग होतो. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी समतोल राहण्यासही मदत होते.

४. लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध उपाययोजना करतो. मात्र ओट्सचा आहारातील समावेशही लठ्ठपणा कमी कऱण्यास उपयोगाचा असतो. ओट्स घेतल्यास पोट दिर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे सहाजिकच आहार कमी होतो.

५. दम्याचा धोका कमी होतो

ओट्स काही प्रमाणात दाहक असल्याने लहान मुलांमधील दम्याचे प्रमाण कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे लहान मुलांना काही आजारापासून दूर ठेवायचे असल्यास आहारात ओट्सचा समावेश कऱण्यास सांगितले जाते.