पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे पनीर खाणे आणि त्याचे फायदे लक्षात घेणे आवश्यक आहे.

भुकेवर नियंत्रण राहण्यास उपयुक्त

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

पनीरमध्ये प्रथिने असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक

पनीरमध्ये प्रथिने असते हे आपण नेहमी ऐकतो मात्र त्यामध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.

शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा

शाकाहारी लोक मांस खात नसल्याने त्यांच्यात प्रथिनांची कमतरता असण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी प्रथिनांचा साठा असलेले पनीर अतिशय उपयुक्त आहे. १०० ग्रॅम पनीरमधून १८ ग्रॅम प्रथिने मिळतात. प्रथिनांचे प्रमाण संतुलित असल्याने स्नायू बळकट होतात तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

चरबी कमी होण्यास उपयुक्त

प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

घातक आजारांपासून बचाव

कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पनीर शरीरासाठी पोषक असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत काही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. पण कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे यांच्या मते पनीर योग्य प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)